अयोध्येतील पराभव भाजपच्या जिव्हारी, काय होतं पराभवामागचं कारण?

भाजपने राम मंदिराच्या नावावर लोकसभा निवडणुकीत मतं मागितली होती. पण ज्या मतदारसंघात राम मंदिर येतं त्याच मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपला हा पराभव जिव्हारी लागला आहे. आता पराभवाची कारणं शोधली जात आहेत.

अयोध्येतील पराभव भाजपच्या जिव्हारी, काय होतं पराभवामागचं कारण?
ayodhya
Follow us
| Updated on: Jun 13, 2024 | 10:49 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. भाजपनं एनडीएच्या साथीनं तिसऱ्यांदा सत्तेत कमबॅक केलं. पण अयोध्येतला पराभव भाजप समर्थकांच्या जिव्हारी लागला आहे. आपापल्या परीनं लोकांनी अयोध्येतल्या पराभवाची कारणं सांगितली. मात्र एक कारण सर्वाधिक चर्चेत राहिलं ते म्हणजे रामपथासाठी रस्ते रुंदीकरणात तोडलेली हजारो घरं, असंख्य धार्मिक स्थळं आणि दुकानं. त्याचाच भाग म्हणून की काय उत्तर प्रदेश सरकारनं गोरखपूर ते अयोध्या प्रस्तावित उड्डाणपूल रद्द केला आहे. त्यामुळे आता अयोध्येतली इतर छोटी-मोठी धार्मिक स्थळं शाबूत राहणार आहेत.

रामलल्लाचं मंदिर उभं राहत असताना राम पथ, भक्ती पथ, राम जन्मभूमि पथ, पंच कोसी परिक्रमा मार्ग, चौदह कोसी परिक्रमा, अयोध्या उड्डाणपुलाची निर्मिती केली गेली., मात्र या कामात असंख्य दुकानं-घरं-धार्मिक स्थळं तोडावी लागली. या नव्या परिवर्तनाचं लोकांनी स्वागत केलं. पण त्यात काहींना पूर्ण मोबदला न मिळाल्याचा आरोप झाला. काहींना विस्थापित होण्याची वेळ आल्यानं नाराजीही समोर आली.

तोडकामावर नाराजी असली तरी अयोध्यावासियांनी यंदा लोकसभेत भाजपला लीड दिलं, पण 2019 च्या तुलनेत त्यात मोठी घटही झाली. सपाचे उमेदवार अवधेश प्रसाद यांनी भाजपच्या लल्लू सिंहांना ५० हजारांहून जास्तीच्या फरकानं पराभूत केलं.

जसं महाराष्ट्रात एका लोकसभेत 6 विधानसभा येतात, तसं उत्तर प्रदेशात एका लोकसभेमध्ये 5 विधानसभांचा समावेश येतो. अयोध्या लोकसभेत दरियाबाद, रुदौली, मिल्कीपूर, बीकापूर आणि अयोध्या लोकसभेचा समावेश आहे.

रुदौलीत सपाला 11 हजार 703 चं लीड मिळालं.. मिल्कीपूरमध्ये 7 हजार 733 बिकापूरमध्ये 29 हजार 684 दरियाबादमध्ये 10 हजार 94 आणि एकट्या अयोध्येत भाजप 4 हजार 667 मतांनी आघाडीवर राहिली.

मात्र 2019 ला अयोध्येत भाजपला 25 हजार 587 मतांची आघाडी होती., त्यात यंदा जवळपास 21 हजार मताधिक्क्य घटलंय.

याशिवाय भाजपचे उमेदवार लल्लू सिंह स्वतःच्या कामांऐवजी फक्त मोदींच्या नावावर जिंकून येतात, अशीही तक्रार स्थानिकांची राहिली त्यात संविधान बदलाचं विधान करुन लल्लू सिंहांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला. आणि सपानं खुल्या जागेवर दलित उमेदवार दिल्यानं त्याचा अजून मोठा फटका बसला.

2019 ला अयोध्या लोकसभेत भाजप 5 पैकी 4 विधानसभांमध्ये आघाडीवर होती. 2024 मध्ये मात्र 5 फैकी फक्त एका मतदारसंघात लीड राखता आलं.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.