जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा रोखणार नाही, तरी आंदोलन 26 जानेवारीपर्यंत सुरु ठेवू, शेतकरी नेत्याचा इशारा

आंदोलनादरम्यान दिल्लीला पुरवले जाणारे अन्नधान्य आणि जीवनाश्यक वस्तुंचा पुरवठा रोखला जाणार नाही, असं किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत स्पष्ट केलं (BKU national spokesperson Rakesh Tiket on Farmers Protest).

जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा रोखणार नाही, तरी आंदोलन 26 जानेवारीपर्यंत सुरु ठेवू, शेतकरी नेत्याचा इशारा
Follow us
| Updated on: Dec 02, 2020 | 5:07 PM

नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन 26 जानेवारीपर्यंत चालू राहील, असा इशारा भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत यांनी ‘टीव्ही 9 भारतवर्ष’सोबत बोलताना दिला. या आंदोलनादरम्यान दिल्लीला पुरवले जाणारे अन्नधान्य आणि जीवनाश्यक वस्तुंचा पुरवठा रोखला जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं (BKU national spokesperson Rakesh Tiket on Farmers Protest).

“सरकार एवढ्या लवकर ऐकणार नाही. आम्ही 26 जानेवारीचा टार्गेट लक्षात घेऊन आंदोलन करत आहोत. कारण त्याआधी सरकार मागण्या मान्य करण्याची शक्यता कमी आहे. 30 वर्षांपूर्वी शेतकरी संघटनेचे नेते महेंद्र सिंह टिकैत यांनी ज्याप्रकारे आंदोलन केलं होतं, अगदी त्याचप्रमाणे हे आंदोलन केलं जाईल’, असं राकेश टिकैत म्हणाले.

“अजूनही अनेक शेतकरी दिल्लीत येणार आहेत. सरकारसोबत बातचित सुरु राहील. केंद्र सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर शेतकरी देखील शांत बसणार नाहीत”, असं देखील राकेश टिकैत यांनी सांगितलं (BKU national spokesperson Rakesh Tiket on Farmers Protest).

कृषी कायदा आणि इतर मागण्यांसाठी पंजाब आणि हरयाणा राज्यातील शेतकरी शेकडोच्या संख्येने दिल्लीच्या सीमेवर दाखल झाले आहेत. गेल्या सात दिवसांपासून त्यांचं आंदोलन सुरु आहे. दरम्यान, आंदोलक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची मंगळवारी (1 डिसेंबर) केंद्र सरकारसोबत बैठक पार पडली. ही बैठक जवळपास तीन तास चालली. मात्र, या बैठकीत तोडगा निघाला नाही. त्यानंतर केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना पुन्हा गुरुवारी (3 डिसेंबर) बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं आहे.

दरम्यान, “केंद्र सरकारसोबत गुरुवारी होणाऱ्या बैठकीत MSP पेक्षा कमी किमतीत शेतीचा माल विकला जाऊ नये, शेतकऱ्याचा काही वाद झाल्यास त्याला कोर्टात धाव घेता यावी, अशाप्रकारच्या काही मागण्या सरकारकडे करु. त्याचबरोबर शेतीमालाच्या आयात आणि निर्यातीवर नियंत्रण कोण ठेवेल? असा सवाल आम्ही करु”, असं राकेश टिकैत यांनी सांगितलं.

हेही वाचा :

केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमधील बैठक निष्फळ; आंदोलन सुरुच ठेवण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.