Black Friday: दोन दु:खद बातम्या, एक अपघात.. मोदींच्या आई हीरा बा, फुटबॉलर पेले यांचं निधन, ऋषभ पंतचा अपघात

आजचा दिवस ठरला 'ब्लॅक फ्रायडे'; दिवसाच्या सुरुवातीलाच तीन मोठ्या घटना; दोघांचं निधन तर एकाचा अपघात

Black Friday: दोन दु:खद बातम्या, एक अपघात.. मोदींच्या आई हीरा बा, फुटबॉलर पेले यांचं निधन, ऋषभ पंतचा अपघात
आजचा दिवस ठरला 'ब्लॅक फ्रायडे'; दिवसाच्या सुरुवातीलाच तीन मोठ्या घटनाImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Dec 30, 2022 | 10:58 AM

नवी दिल्ली: आज शुक्रवार आहे. मात्र हा दिवस ‘ब्लॅक फ्रायडे’पेक्षा कमी नाही. सकाळपासून तीन मोठ्या घटना घडल्या आहेत. एकीकडे जगातील सर्वांत महान फुटबॉलपटू पेले यांचं निधन झालं. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीरा बा यांनी पहाटे 3.30 वाजता या जगाचा निरोप घेतला. इतकंच नाही तर क्रिकेटर ऋषभ पंत हा भीषण अपघातात जखमी झाला.

ब्राझीलचे फुटबॉलपटू पेले यांचं निधन

ब्राझीलचे फुटबॉलपटू पेले यांचं वयाच्या 82 व्या वर्षी निधन झालं. पेले यांची मुलगी नॅसिमेंटोने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली. 20 व्या शतकाचे महान फुटबॉलपटू पेले यांना कोलन कॅन्सर होता आणि गेल्या काही दिवसांपासून ते साओ पाऊलो रुग्णालयात दाखल होते. पेले यांचं मूळ नाव एडसन एरंटेस डो नासिमेंटो होतं. दमदार खेळीमुळे ते ब्लॅक पर्ल, किंग ऑफ फुटबॉल, किंग पेले या नावांनीही ओळखले जायचे. पेले हे त्यांच्या काळातील सर्वांत महागडे फुटबॉलपटू होते.

हे सुद्धा वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीरा बा यांनी अहमदाबादमधल्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्या 100 वर्षांच्या होत्या. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अहमदाबादच्या युएन मेहता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हीरा बा यांच्या पार्थिवावर गांधीनगर इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले.

क्रिकेटर ऋषभ पंतचा भीषण अपघात

क्रिकेटर ऋषभ पंतच्या कारचा रुडकी बॉर्डरवरील दिल्ली-देहरादून हायवेवर भीषण अपघात झाला. ऋषभची कार रेलिंगला धडकली आणि त्यानंतर आग लागली. या अपघातात ऋषभ गंभीर जखमी झाला आहे. रुडकी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचारानंतर ऋषभला देहरादूनमधील मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे. अपघातावेळी ऋषभ स्वत: गाडी चालवत होता आणि कारमध्ये तो एकटाच होता. ज्याठिकाणी हा अपघात घडला, ती जागा अपघातप्रवण क्षेत्र असल्याचं म्हटलं जातंय.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.