शिवसेनेने शिवाजी पार्कवरील राजकीय सभांचा अधिकार गमावलाय, महापालिकेचा कोर्टात जोरदार युक्तिवाद; दिला ‘हा’ दाखला

दोन्ही गटाला मैदान मिळण्याचा अधिकार नाही. शिवाजी पार्क हे सायलन्स झोन आहे. शिवाजी पार्क पालिकेच्या ताब्यात आहे. महापालिकेने मैदानासाठी परवानगी नाकारल्याने कुणाच्या अधिकाराचा भंग होणार नाही.

शिवसेनेने शिवाजी पार्कवरील राजकीय सभांचा अधिकार गमावलाय, महापालिकेचा कोर्टात जोरदार युक्तिवाद; दिला 'हा' दाखला
शिवतीर्थावर आता शिवसेनेचाच मेळावा होणार असुून विरोधकांकडून शिंदे गटाला टार्गेट केले जात आहे.Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 23, 2022 | 1:59 PM

कृष्णा सोनारवाडकर, मुंबई: दसरा मेळाव्यासाठी  (Dussehra Melava) शिवाजी पार्क मैदान कुणाला द्यावे? याबाबतचा जोरदार युक्तिवाद कोर्टात केला आहे. शिवसेना (Shiv sena)आणि मुंबई महापालिकेच्या (bmc) वकिलांनी या मुद्दयावरून जोरदार युक्तिवाद करत एकमेकांचे मुद्देही खोडून काढले आहेत. शिवसेनेच्या वकिलांनी शिवाजी पार्क मैदान मिळावं म्हणून शिवसेनेच्या परंपरेचा दाखला दिला आहे. तर शिवसेनेने शिवाजी पार्कवर राजकीय सभा घेण्याचा अधिकार गमावल्याचा दावा मुंबई महापालिकेच्या वकिलांनी केला आहे. त्यासाठी महापालिकेने 2012च्या एका दसरा मेळाव्याचा दाखलाही दिला आहे. त्यामुळे शिवाजी पार्क मैदान शिवसेनेला मिळणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं म्हणून शिवसेना आणि शिंदे गटाच्या वकिलांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर आज उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली. सुरुवातीला शिवसेनेच्या वकिलांनी युक्तिवाद केला. त्यानंतर पालिकेचे वकील मिलिंद साठ्ये यांनी जोरदार युक्तिवाद केला.

दोन्ही गटाला मैदान मिळण्याचा अधिकार नाही. शिवाजी पार्क हे सायलन्स झोन आहे. शिवाजी पार्क पालिकेच्या ताब्यात आहे. महापालिकेने मैदानासाठी परवानगी नाकारल्याने कुणाच्या अधिकाराचा भंग होणार नाही. पोलिसांनी सांगितलं परवानगी देऊ नका, कायदा सुव्यवस्था राखण्याचं पोलिसांचं काम आहे. झालेल्या घटनांचा पोलिसांनी आम्हाला रिपोर्ट दिलाय, असं महापालिकेने कोर्टाला सांगितलं.

हे सुद्धा वाचा

शांततेत लोक मैदानात जमू शकतात. रॅली, सभा देऊ नये. तसा पालिकेचा नियम आहे. शिवाजी पार्कात ज्या कार्यक्रमाला परवानगी दिली जाते ते शांततेत होतात. हीच जागा हवी असा अधिकार कुणालाही गाजवता येणार नाही, असा युक्तिवादही पालिकेने केला.

2012 साली शिवसेनेने बीकेसी मैदानावर मेळावा घेतला होता. त्यामुळे 2013 पासून शिवसेनेने मैदानावरचा राजकीय सभांचा अधिकार गमावलाय, असं दावाही महापालिकेने कोर्टात केला आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.