उत्तर प्रदेशात हापुडमध्ये प्लास्टिक फॅक्टरीत बॉयलर फुटला, जळाल्याने आणि श्वास कोंडल्याने ८ मजुरांचा मृत्यू २० जण होरपळले
फॅक्टरीत प्लास्टिक गाळण्याचे काम सुरु होते. याच काळात फॅक्टरीत बॉयलर फुटल्याने आग लागली. आग लागल्याने प्लास्टिक पाघळले आणि मजुरांच्या शरिरावर पसरल्याचे सांगण्यात येते आहे. त्यामुळे अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. मजुरांच्या मृत्यूचे एक कारण हे श्वास कोंडणे असेही सांगण्यात येते आहे.
हापुड – एका प्लास्टिकच्या फॅक्टरीत बॉयलर फुटल्याने लागलेल्या आगीतल ८ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. हापुड येथील फॅक्टरीत हा प्रकार घडला. यातील ६ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या आगीत २० जण होरपळले आहेत. हा स्फोट इतका भयंकर होता की आजूबाजूच्या परिसरातही या स्फोटाचा आवाज ऐकू आला. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचल्या असलून मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
Uttar Pradesh | A blast happened in a boiler in a chemical factory in Hapur district. Multiple fire tenders at the spot. pic.twitter.com/WUGwiRKuvn
हे सुद्धा वाचा— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) June 4, 2022
जळून आणि श्वास कोंडल्याने मृत्यू
या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. या आठही जणांच मृत्यू हा आगीत जळून आणि श्वास कोंडून झाल्याचे सांगण्यात य़ेते आहे. घटनास्थळी अद्यापही आगीच्या ज्वाळा असून, धुराचे लोट आकाशात परसले आहेत.
प्लास्टिक गाळण्याचे सुरु होते काम
फॅक्टरीत प्लास्टिक गाळण्याचे काम सुरु होते. याच काळात फॅक्टरीत बॉयलर फुटल्याने आग लागली. आग लागल्याने प्लास्टिक पाघळले आणि मजुरांच्या शरिरावर पसरल्याचे सांगण्यात येते आहे. त्यामुळे अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. मजुरांच्या मृत्यूचे एक कारण हे श्वास कोंडणे असेही सांगण्यात येते आहे.
मुख्यमंत्री योगींनी व्यक्त केलं दु:ख
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हापुड बॉयलर दुर्घटनेबाबत आणि मजुरांच्या झालेल्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला आहे. दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर तातडीने योग्य उपचार करण्यात यावेत, असे आदेश त्यांनी दिले आहेत. मृतांच्या नातेवाईंकांच्या शोकात सहभागी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहचण्याचे आणि चौकशीचे आदेश योगींनी दिले आहेत.