Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चिंता वाढली! उत्तर प्रदेशात दोन वर्षीय मुलीला कोरोनाच्या नव्या विषाणूचा संसर्ग

दोन वर्षाच्या मुलीला कोरोनाच्या नव्या विषाणूचा संसर्ग झालेल्याने मेरठमधील संबंधित परिसर सील करण्यात आला आहे (Britain corona strain found in 2 year old girl in UP).

चिंता वाढली! उत्तर प्रदेशात दोन वर्षीय मुलीला कोरोनाच्या नव्या विषाणूचा संसर्ग
Follow us
| Updated on: Dec 29, 2020 | 11:26 PM

लखनऊ : ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूच्या घातक अवतारामुळे संपूर्ण जग बिथरलं आहे. कोरोना विषाणूच्या या नव्या अवताराने भारतातही एन्ट्री केली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशच्या मेरठमधील दोन वर्षीय मुलीला कोरोना विषाणूच्या नव्या अवताराचा संसर्ग झाला आहे. ही मुलगी आपल्या कुटुंबासह ब्रिटनमधून आली होती. तिच्या कुटुंबातील एकूण चार सदस्यांची चाचणी करण्यात आली. त्यांचे स्वॅब दिल्लीला पाठवण्यात आले होते. त्यानंतर रिपोर्टमध्ये दोन वर्षीय मुलीमध्ये कोरोनाच्या नव्या विषाणूचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली (Britain corona strain found in 2 year old girl in UP).

संबंधित मुलीचे आई-वडिलांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, त्यांच्या शरीरात नव्या कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला नाही. दोन वर्षाच्या मुलीला कोरोनाच्या नव्या विषाणूचा संसर्ग झालेल्याने मेरठमधील संबंधित परिसर सील करण्यात आला आहे (Britain corona strain found in 2 year old girl in UP).

देशातील सहाजण नव्या विषाणूने बाधित

याआधी युकेमधून आलेल्या सहा जणांमध्ये कोरोनाचा नवा विषाणू आढळल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये बंगळुरुच्या NIMHANS मध्ये 3, हैदराबाद येथील CCMB प्रयोगशाळेत 2 आणि पुण्यातील राष्ट्रीय विषाणून संशोधन संस्थेकडे आलेल्या नमुन्यांमध्ये कोरोनाचा नवा विषाणू आढळला आहे. यासर्व 6 लोकांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र, हे रुग्ण देशातील कोणत्या भागातील आहेत याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

ब्रिटनहून 33 हजार लोकांची घरवापसी

ब्रिटनहून 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या एका महिन्याच्या कालावधीत 33 हजार व्यक्ती भारतात परतले आहेत. त्यापैकी 114 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सर्व नागरिकांच्या कोरोनाच्या आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 114 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. 114 मध्ये 6 व्यक्तींच्या अहवालांमध्ये कोरोनाचा नवा घातक अवतार आढळला आहे.

कोरोना विषाणूचा नवा घातक अवतार ब्रिटनमध्ये समोर आला होता. तेव्हापासून कोरोनाचा नवा अवतार 19 देशांमध्ये पसरला आहे. या विषाणूचा संक्रमणाचा वेग जास्त असल्यामुळे जगामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. लंडन आणि साऊथ इंग्लंडमध्ये लॉकडाऊन लावत, ख्रिसमसच्या उत्साहावरदेखील निर्बंध घालण्यात आले आहेत. तर, भारतानं यूके आणि मध्य-पूर्वेतून येणाऱ्या विमान वाहतूकीवर 31 डिसेंबरपर्यंत बंदी घातली आहे.

कोरोनाच्या SARS-COV-2 नव्या अवताराला “VUI-202012/01” किंवा B.1.1.7, असं म्हटलं गेलं आहे. हा विषाणू पूर्वीच्या विषाणूच्या तुलनेत वेगानं संक्रमित होतो. यामुळे ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण वाढले आहेत. कोरोनाच्या नव्या विषाणूच्या संसर्गाची तीन प्रमुख लक्षण आढळून आली आहेत. यामध्ये ताप, सर्दी, खोकला, वास न येणे याचा समावेश आहे.

हेही वाचा : कोरोनाचा नवा अवतार अधिक संसर्गजन्य, काळजी घ्या- आरोग्यमंत्री

VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक
VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक.
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं...
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं....
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं.
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका.
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन.
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल.
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल.
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?.
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक.
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?.