उत्तर प्रदेशमध्ये ‘सैराट’, मुलीला गोड बोलून माहेरी आणलं, नंतर गोळी झाडून हत्या, मृतदेह शेतात पुरला

उत्तर प्रदेशमध्ये सैराट या मराठी चित्रपटासारखी हुबेहुब घटना घडली आहे (Brother killed sister for having love marriage).

उत्तर प्रदेशमध्ये 'सैराट', मुलीला गोड बोलून माहेरी आणलं, नंतर गोळी झाडून हत्या, मृतदेह शेतात पुरला
Follow us
| Updated on: Dec 12, 2020 | 8:31 PM

लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये सैराट या मराठी चित्रपटासारखी हुबेहुब घटना घडली आहे. मुलीने पळून जावून आंतरजातीय विवाह केला म्हणून माहेरच्यांनी तिची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या भावाला अटक केली आहे. विशेष म्हणजे मुलीच्या भावाने हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाला शेतात पुरला. मुलीच्या पतीने पोलिसांत तक्रार केल्यानंतर संबंधित प्रकार उघड झाला (Brother killed sister for having love marriage).

अर्जुन जाटव हा तरुण दिल्लीतीच्या त्रिलोकपुरी येथील एका कारखान्यात वायरिंगचं काम करतो. याच कारखान्यात त्याची चांदनी नावाच्या मुलीशी ओळख झाली होती. काही दिवसांनी या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघं एकमेकांना गेल्या आठ वर्षांपासून ओळखत होते. अखेर सहा महिन्यांपूर्वी त्यांनी 12 जून रोजी पळून जावून एका मंदिरात लग्न केलं.

लग्नाच्या तीन महिन्यांनंतर अर्जुन आपल्या पत्नीला दिल्लीत घेऊन आला. चांदनीचे कुटुंबिय तिच्या लग्नावर नाराज होते. त्यांनी 17 नोव्हेंबर रोजी गोड बोलून काही कामाचं कारण सांगत तिला गावी कश्यपनगरला बोलावलं. आपल्या घरच्यांनी लग्नाचा स्वीकार केला या आनंदात चांदनी घरी गेली. मात्र, गावी गेल्यावर तिच्या सख्या भावानेच तिच्यावर गोळी झाडून हत्या केली.

दरम्यान, इकडे दिल्लीला असलेला अर्जुनदेखील कासावीस झाला. त्याचा चांदनी आणि तिच्या कुटुंबियांसोबत संपर्क होत नव्हता. त्याने संपर्क करण्याचा भरपूर प्रयत्न केला. त्यानंतर अखेर तो 23 नोव्हेंबर रोजी आपल्या आई आणि नातेवाईकांना घेऊन चांदनीच्या माहेरी गेला. मात्र, चांदनीच्या नातेवाईकांनी ती दिल्लीला परत गेली, असं सांगितलं.

अर्जुन दिल्लीत परतल्यावर त्याने चांदनीचा भरपूर शोध घेतला. मात्र, चांदनी त्याला सापडली नाही. त्याने शेवटी मयूर बिहार पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्याने चांदनीचे भाऊ सुधीर आणि सुनील यांच्याविरोधात FIR दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने चांदनीचा भाऊ सुधीरला ताब्यात घेतलं. पोलिसांच्या चौकशीत सुधीरने गुन्हा मान्य केला. चांदनीवर गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर स्वत:च्या शेतात तिच्या मृतदेह गाडला, असं त्याने पोलिसांना सांगितलं.

मयूर बिहार पोलीस ठाण्याचे एसआय मनोजकुमार तोमर, एएसआय कैलासचंद्र, राकेश सिंग, हेडकॉन्स्टेबल उपेंद्र आणि विजयकुमार किशिनी पोलीस स्टेशनमध्ये आले. त्यांनी नायब तहसीलदार अनुभवचंद्र, एसएसआय जेकब फर्नांडिस आणि पोलीस दलानसह सुधीरला आपल्या शेतात नेऊन खोदकाम सुरू केलं. दिवसभर शेतात जेसीबीने खोदकाम केल्यानंतर काहीच मिळत नव्हतं. मात्र, संध्याकाळी सहा वाजता चांदनीचा मृतदेह सापडला (Brother killed sister for having love marriage).

हेही वाचा :

Rekha Jare Murder | रेखा जरे हत्येप्रकरणी बाळा बोठेच्या घरावर छापा, पोलिसांच्या हाती ठोस पुरावे

महाराष्ट्र हादरला! विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, अल्पवयीन मुलासह दोघांवर गुन्हा दाखल

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.