हात मिळवण्यासाठी पुढे आला आणि खासदाराच्या पोटात सुरा खुपसला
एका अज्ञात व्यक्तीने हस्तांदोलन करण्यासाठी खासदाराकडे हात पुढे केला. पण हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न करत असताना त्याने अचानक चाकू काढला आणि थेट खासदाराच्या पोटावर वार केला. यामध्ये खासदार गंभीरपणे जखमी झाले आहेत.
Attack on MP : तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका खासदारावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. प्रचार करत असताना खासदाराला भेटण्यासाठी हल्लेखोर पुढे आहे. प्रचारादरम्यान एका पुजाऱ्याच्या घरी जात असताना खासदारावर हा हल्ला झाला. खासदाराला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खासदाराच्या कार्यकर्त्यांनी आरोपीला पकडून बेदम मारहाण केली. कोठा प्रभाकर रेड्डी हे बीआरएसचे खासदार आहेत.
कसा झाला हल्ला?
सिद्धीपेठ परिसरात प्रचार करत असताना खासदार कोठा प्रभाकर रेड्डी हे एका पुजाऱ्याच्या घरी जात असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. प्रथम त्यांना त्यांना हात मिळवला यानंतर हस्तांदोलन करताना सुरा काढून खासदाराच्या पोटात वार केला. खासदारावर वार होताच ते खाली पडले. बीआरएस कार्यकर्त्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.
खासदाराची प्रकृती स्थिर
सिद्धीपेटचे पोलीस आयुक्त एन स्वेथा यांनी सांगितले की, हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले आहे. ते म्हणाले की, मेडक लोकसभा मतदारसंघातील खासदाराच्या पोटात दुखापत झाली आहे. त्यांना गजवेल शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
#WATCH | Telangana: BRS MP Kotha Prabhakar Reddy was stabbed in the stomach by an unidentified person during his campaign in Siddipet.
MP Kotha Prabhakar Reddy is safe. The incident took place in Surampally village of the Daulatabad mandal. He has been shifted to Gajwel. The… pic.twitter.com/MI0BvbFxDJ
— ANI (@ANI) October 30, 2023
बीआरएसने खासदार कोठा प्रभाकर रेड्डी यांना दुब्बका येथून उमेदवार म्हणून घोषित केले आहे. रघुनंदन हे दुब्बका येथील भाजपचे आमदार आहेत. के. चंद्रशेखर राव 2014 मध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री झाल्यानंतर, प्रभाकर रेड्डी लोकसभा निवडणूक जिंकून संसदेत पोहोचले. यावेळी ते विधानसभा निवडणुकीत बीआरएसचे उमेदवार आहेत.