Budget 2024 : देशाच्या अर्थसंकल्पाशी संबंधित 10 मनोरंजक तथ्य
यापूर्वी अर्थसंकल्प संध्याकाळी 5 वाजता सादर केला जात होता. देशाच्या दोन पंतप्रधानांनीही अर्थसंकल्प सादर केला आहे. 26 सप्टेंबर 1947 रोजी देशाचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
Budget 2024: 2024-25 चा अर्थसंकल्प उद्या 23 जुलै रोजी सादर केला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करून विक्रम करणार आहेत. नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. सोमवारी, अर्थमंत्र्यांनी लोकसभा आणि राज्यसभेत 2023-24 आर्थिक सर्वेक्षण सादर केले. ज्यामध्ये अर्थमंत्र्यांनी 2023-24 मध्ये भारताचा GDP 6.5 ते 7 टक्क्यांच्या दरम्यान राहण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
आर्थिक पाहणीत महागाईचा दर ४.५ टक्के राहण्याची अपेक्षा अर्थमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी शेतकरी, महिला, व्यापारी, युवक या सर्वांना अर्थसंकल्प 2024 मध्ये दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. 2024 चा अर्थसंकल्प येण्यापूर्वी देशाच्या अर्थसंकल्पाविषयी काही तथ्ये जाणून घेऊया.
देशाच्या अर्थसंकल्पाशी संबंधित मनोरंजक तथ्ये
- 26 सप्टेंबर 1947 रोजी देशाचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता.
- आरके षणमुघम चेट्टी हे अर्थसंकल्प सादर करणारे पहिले अर्थमंत्री होते.
- देशाचा पहिला अर्थसंकल्प १९७.१ कोटी रुपयांचा होता.
- तत्पूर्वी सायंकाळी ५ वाजता अर्थसंकल्प सादर करण्यात आला. 1999 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सकाळी 11 वाजताची वेळ निश्चित केली होती.
- 1958 मध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी अर्थसंकल्प सादर केला होता.
- 1969 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अर्थसंकल्प सादर केला.
- 2017 मध्ये रेल्वे अर्थसंकल्प सामान्य बजेटमध्ये विलीन करण्यात आला.
- यंदा 92 वी वेळ अर्थसंकल्प सादर होणार आहे.
- माजी अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक म्हणजे १० वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे.
Watch Union Finance Minister Smt. @nsitharaman present the Union Budget 2024-25 in Parliament 👇
⏰ 11.00 am
🗓️ 23rd July 2024
Stay tuned and watch out for LIVE updates on👇
Facebook ➡️ https://t.co/GVfVncu4Ok#ViksitBharatBudget2024_25 pic.twitter.com/16O7frtX2l
— Ministry of Finance (@FinMinIndia) July 21, 2024