Accident | भीषण अपघात, डंपरला धडकल्यानंतर बस पेटली, 12 प्रवाशी जिवंत जळाले

Accident | बसमधील मृतदेह बाहेर काढण्यात येत आहे. घटनास्थळी 6 पेक्षा जास्त रुग्णावाहिका पाठवण्यात आल्या आहेत. बजरंगगढ परिसरातील ही घटना आहे. दोहाई मंदिराजवळ हा अपघात झाला. मदत आणि बचाव कार्य सुरु आहे.

Accident | भीषण अपघात, डंपरला धडकल्यानंतर बस पेटली, 12 प्रवाशी जिवंत जळाले
Bus accident
Follow us
| Updated on: Dec 28, 2023 | 8:04 AM

भोपाळ : एक भीषण अपघात झालाय. रात्री 9 च्या सुमारास डंपर आणि बसमध्ये जोरदार धडक झाली. त्यानंतर बसमध्ये आग लागली. बसमधील 12 प्रवासी जिवंत जळाले. या प्रवाशांना रुग्णालयात नेताना आणि रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. काळाजाचा थरकार उडवणारा हा भीषण अपघात आहे. 15 प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. बसमध्ये जवळपास 40 प्रवासी होते. पोलीस घटनास्थळी पोहोचले. आसपासच्या लोकांनी बचावकार्यात मदत केली. घटनास्थळी पोलीस असून फायर ब्रिगेडकडून जोरात बचावकार्य सुरु आहे. मध्य प्रदेशातील गुना येथे हा भीषण अपघात झाला.

गुनाचे एसपी विजय कुमार खत्री यांनी सांगितलं की, “या भीषण अपघातात होरपळलेल्या 12 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. 14 प्रवाशांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलय” अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या बचाव पथकाने बसमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं. यात 12 प्रवाशांचा मृत्यू झाला. 12 पेक्षा जास्त प्रवासी आगीमध्ये होरपळले आहेत. त्यांना 6 पेक्षा जास्त रुग्णवाहिकांमधून हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आलं. बजरंगगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोहाई मंदिराजवळ हा अपघात झाला. बसच अनफिट होती, हे सुद्धा अपघातामागच एक कारण आहे. म्हणजे बसची स्थिती खूपच खराब होती. पण तरीही प्रवासी वाहतुकीसाठी वापर सुरु होता.

किती लाखांची मदत?

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या भीषण अपघातावर दु:ख व्यक्त केलय. राज्य सरकारने मृतांना 4 लाख आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केलीय. या अपघाताची सर्व बाजूंनी चौकशी होईल. असे अपघात पुन्हा होणार नाहीत, याची खबरदारी घ्या असे त्यांनी राज्याच्या परिवहन विभागाला निर्देश दिले आहेत.

ज्योतिरादित्य सिंधिया यांचं ट्विट

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सुद्धा टि्वट करुन दु:ख व्यक्त केलं. घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी गुना कलेक्टरसोबत चर्चा केली. मदत आणि बचाव कार्य सुरु करण्याचे निर्देश दिले.

“या भीषण अपघातात प्राण गमावणाऱ्या नागरिकांच्या आत्म्याला ईश्वर शांती देओ. त्यांच्या नातेवाईकांना हा आघात सहन करण्याची शक्ती मिळो. अपघातात जखमी झालेल्या नागरिकांच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम मिळो. मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. घटनास्थळी सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत” असं ज्योतिरादित्य सिंधिया यांनी टि्वटमध्ये म्हटलय.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.