रेल्वे तिकीटांच्या वेटींग लीस्टला रामराम, लगेच तिकीट कन्फर्म होणार

आता टीसींच्या हाती नविन एचएचटी मशिन आल्याने टीसींना आरएसी आणि प्रतिक्षा यादीतील प्रवाशांना रिकामी असलेली आसने वाटणे सोपे होणार आहे.

रेल्वे तिकीटांच्या वेटींग लीस्टला रामराम, लगेच तिकीट कन्फर्म होणार
WESTERN RAILWAYImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Feb 27, 2023 | 5:39 PM

मुंबई : रेल्वेचा लांबपल्ल्याच्या प्रवास म्हटला की तिकीटांसाठी मोठमोठ्या रांगा आणि हातात पडणारी भलीमोठी प्रतिक्षा यादी…हे चित्र लवकरच बदलणार आहे. रेल्वेने ( RAILWAY ) आता आपल्या तिकीट तपासनीसांकडे हॅण्ड हेल्ड टर्मिनल मशिन ( HHT )  सोपवल्याने चमत्कार होणार आहे. आता या हॅण्डहेल्ड मशिनमुळे रेल्वे तिकीटांची प्रतिक्षायादी ( WAITING LIST ) संपण्यास मदतच होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या ( WESTERNRAILWAY ) सर्व गाड्यांवर ही योजना लागू करण्यात आली आहे.

रेल्वे गाड्यांच्या तिकीटांना उन्हाळी सुट्या किंवा सणासुदीला खुपच मागणी असते. त्यामुळे तिकीटांची वेटींग लिस्ट खूपच मोठी असते. शेवटच्या क्षणापर्यंत तिकीट कन्फर्म होईल की याची प्रवाशांनी चिंता लागलेली असते. यावर उपाय म्हणून रेल्वेने आधुनिकतेचा मंत्र जपला आहे. पश्चिम रेल्वेने आपल्या सर्वच्या सर्व ट्रेनच्या टीसींकडे हॅण्ड हेल्ड टर्मिनल मशिन सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वेटींगची तिकीटे कन्फर्म होण्यासाठी सहाय्य मिळणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सूमित ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे पंतप्रधानांचे डिजीटल इंडीया व्हीजनचे स्वप्न साकार करण्यास मदत मिळत आहे.

पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या सर्व 298 मेल-एक्सप्रेस ट्रेनमध्ये ट्यूडी बजावणाऱ्या तिकीटतपासनीसांकडे हैंड हेल्ड टर्मिनल ( HHT ) सोपविण्यात आले आहेत. मेल आणि एक्सप्रेसमध्ये कार्यरत एकूण 1385 तिकीट तपासनीसांना हे हैंड हेल्ड टर्मिनल मिळाले आहेत. त्यामुळे तिकीट तपासण्याचे आणि दंड आकारण्याचे काम डीजिटल होणार आहे. तसेच पश्चिम रेल्वेवरून जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमधील तिकीट तपासण्याचे काम टीसी आता या हॅण्ड हेल्ड टर्मिनल मशिनद्वारे करणार आहेत.

असा मिळणार दिलासा

एचएचटी मशिन हाती आल्याने टीसींना आरएसी आणि प्रतिक्षा यादीतील प्रवाशांना रिकामी असलेली आसने वाटणे सोपे होणार आहे. या मशिन ऑनलाईन सर्व्हरशी कनेक्ट असल्याने सीट/बर्थची ऑक्‍यूपन्सी बाबत ताजी माहिती ऑनलाईन पाठवतील, त्यामुळे गाडीच्या आगामी स्थानकातून बुकींग करणाऱ्या प्रतिक्षा यादीतील प्रवाशांची तिकीटे कन्फर्म करणे सोपे होईल. एचएचटी मशिन्स जीपीआरएसद्वारे प्रवासी आरक्षण केंद्रांना ( पीआरएस ) रियल-टाइम माहिती पाठवतील त्यामुळे पुढे येणाऱ्या स्थानकावरील प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना रिकामी आसने (बर्थ ) मंजूर करता येतील.

अधिक पारदर्शक पद्धतीने कारभार

काही वेळा प्रवाशांची ट्रेन चुकते, किंवा काही प्रवासी चार्ट तयार होण्यापूर्वीच तिकीट रद्द करतात अशावेळी ही रिकामी आसने अशा वेटींगच्या प्रवाशांना देण्याचे काम या मशिन्समुळे अधिक पारदर्शक पद्धतीने होईल. पूर्वी मॅन्युअली होणारे हे काम आता संगणकीय पद्धतीने होईल. या नव्या तंत्रामुळे कागदावर चार्ट छापण्याची पद्धत बंद होऊन सर्व कारभार पेपरलेस होण्यास मदत मिळणार आहे. 2018 मध्ये ऑगस्त क्रांती राजधानी एक्सप्रेसमध्ये पश्चिम रेल्वेनेच प्रथम टीसींच्या हाती टॅबलेटच्या रूपात एचएचटी मशिन दिल्या होत्या.

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....