Indian Air Force | अमेरिकेला जमलं ते भारतही करुन दाखवणार, बनवणार असं फायटर विमान, जे….

Indian Air Force | भारताने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीने एका महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. भारत पाचव्या पिढीच फायटर जेट विकसित करणार आहे. ही विमान किती घातक असतात? त्यांचे वैशिष्ट्य काय असतं? ते जाणून घ्या.

Indian Air Force | अमेरिकेला जमलं ते भारतही करुन दाखवणार, बनवणार असं फायटर विमान, जे....
AMCA Fighter Jet
Follow us
| Updated on: Mar 08, 2024 | 8:52 AM

Indian Air Force | शेजारी देशांकडून असलेला धोका, भविष्यातील युद्ध स्थिती लक्षात घेऊन भारताने रणनितीक दृष्टीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भारत स्वबळावरच पाचव्या पिढीच फायटर विमान विकसित करणार आहे. आकाशात झेप घेतल्यानंतर सुपरसॉनिक क्रूझ स्पीडने हे विमान शत्रूवर तुटून पडेल. या एकूण प्रोजेक्टचा सुरुवातीचा खर्च 15 हजार कोटीपेक्षा जास्त आहे. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाला मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीने मंजुरी दिली आहे. पाचव्या पिढीच लढाऊ विमान बनवताना स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे एकूण पाच प्रोटोटाइप विकसित करण्यात येणार आहेत. DRDO चा ADA विभाग या अत्याधुनिक विमान निर्मितीवर काम करणार आहे. सध्या अमेरिकेकडे F-22 हे पाचव्या पिढीच फायटर विमान आहे. पाचव्या पिढीच्या फायटर विमानाच वैशिष्ट्य म्हणजे स्टेल्थ तंत्रज्ञान. या विमानांमध्ये रडारला चकवा देण्याची क्षमता असते.

पाचव्या पिढीच्या फायटर विमानाच्या AMCA प्रोटोटाइपासाठी चार वर्षांची वेळ ठरवण्यात आली आहे. त्यानंतर पुढच्यावर्षी या विमानची हवाई चाचणी होईल. विमान विकसित करुन सर्व प्रोटोटाइपच्या चाचण्या पार पडल्यानंतर AMCA च्या उत्पादनाला HAL ला 9 ते 10 वर्षांचा वेळ लागेल. 2035 नंतर ही विमान इंडियन एअर फोर्समध्ये दाखल होतील, असं सूत्रांच म्हणणं आहे. सात स्क्वाड्रन म्हणजे 126 AMCA फायटर विमानांचा समावेश करण्याची इंडियन एअर फोर्सची योजना आहे. पहिल्या दोन स्क्वाड्रनसाठी भारत अमेरिकन कंपनीच्या मदतीने GE-F414 इंजिन विकसित करत आहे.

भारताकडे सध्या कुठलं अत्याधुनिक फायटर विमान आहे?

तेजस हे भारताने स्वबळावर विकसित केलेलं पहिल फायटर विमान आहे. इंडियन एअर फोर्सने या विमानांचा वापर सुरु केला आहे. आता तेजस मार्क-2 चा कार्यक्रम सुरु आहे. हे 4.5 जनरेशनच फायटर विमान आहे. म्हणजे पहिल्या तेजसपेक्षा मार्क-2 मध्ये अधिक अत्याधुनिक यंत्रणा असेल. भारताने फ्रान्सकडून विकत घेतलेली राफेल ही सध्या भारताकडे असलेली 4.5 जनरेशनच फायटर विमान आहे. राफेल हे सध्याच्या घडीला भारतीय हवाई दलातील सर्वात अत्याधुनिक फायटर विमान आहे. भारतातूनच शत्रू देशात खोलवर हल्ला करण्याची राफेलची क्षमता आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.