80 कोटी लोकांना 2 रुपयात गहू आणि 3 रुपयात तांदूळ मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

केंद्र सरकारने देशातील 80 कोटी नागरिकांना दर महिन्याला प्रती व्यक्ती 27 किलो रुपयांचे गहू अवघ्या 2 रुपयांना आणि प्रती किलो 34 रुपये किंमतीचे असणारे तांदूळ फक्त 3 रुपयांत देण्याचा निर्णय घेतला आहे (Prakash javadekar on Cabinet decision).

80 कोटी लोकांना 2 रुपयात गहू आणि 3 रुपयात तांदूळ मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Mar 25, 2020 | 4:40 PM

नवी दिल्ली : कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. मात्र, घरातून बाहेर न पडल्यास घरात पैसे कसे येणार आणि पोट कसं भरणार? असा प्रश्न उपस्थित होणाऱ्या गरिब, होतकरु कुटुंबांना सरकारने दिलासा दिला आहे (Prakash javadekar on Cabinet decision). केंद्र सरकारने देशातील 80 कोटी नागरिकांना दर महिन्याला प्रती व्यक्ती 27 किलो रुपयांचे गहू अवघ्या 2 रुपयांना आणि प्रती किलो 34 रुपये किंमतीचे असणारे तांदूळ फक्त 3 रुपयांत देण्याचा निर्णय घेतला आहे (Prakash javadekar on Cabinet decision).

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेतला. या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा केली. केंद्र सरकाने सर्व राज्य सरकारला तीन महिन्यांचा अॅडवान्स सामान खरेदी करण्याची सूचान दिली आहे, अशी माहिती प्रकाश जावडेकर यांनी दिली.

मंत्रिमंडळ बैठकीत कंत्राटी कामगारांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय झाला. या कंत्राटी कामगारांनाही संपूर्ण वेतन मिळणार असल्याची घोषणा प्रकाश जावडेकर यांनी केली. यावेळी प्रकाश जावडेकर यांनी जनतेला काळजी घेण्याचंदेखील आवाहन केलं.

प्रकाश जावडेकर नेमकं काय म्हणाले?

“कोरोनामुळे देशावर मोठं संकट ओढवलं आहे. या आजारामुळे अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशात लॉकडाऊनची घोषणा करावी लागली. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी सरकारने देशातील जनतेला घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. मात्र, जीवनाश्यक वस्तू खरेदीसाठी बाहेर पडण्याची मुभा सरकारने दिली आहे. याशिवाय सर्व जीवनाश्यक सेवा सुरु असून किराणा, रेशनचे दुकान सुरु असणार आहेत”, अशी ग्वाही प्रकाश जावडेकर यांनी दिली.

“कोरोनापासून वाचायचं असेल तर 21 दिवसांच्या लॉकडाऊनचा उपाय महत्त्वाचा आहे. हा लॉकडाऊन आपल्यासाठी आणि आपल्या परिवारासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळेच सर्वांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. सर्वांनी पुढचे 21 दिवस घरात राहा, दिवसात 15 ते 20 वेळा हात धुवावे, ताप, खोकला आणि सर्दी झालं तर तातडीने रुग्णालयात जावे आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवावं”, असं आवाहन जावडेकर यांनी केलं.

संबंधित बातम्या : Corona | भारतात फक्त 27 टक्के नागरिक घरात लॉकडाऊन, सर्व्हेत धक्कादायक माहिती

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.