ऑटिझमग्रस्त मुलासाठी सांडणीच्या दुधाची गरज, मातेची मोदींना हाक, राजस्थानवरुन मुंबईत दूध दाखल

रेणु कुमारी यांच्या साडेतीन वर्षाच्या मुलाला ऑटिझम या दुर्धर आजाराने ग्रासलं आहे. या मुलाला गाय, म्हैस, शेळीच्या दुधाची अॅलर्जी आहे (Autistic child mother request PM Modi).

ऑटिझमग्रस्त मुलासाठी सांडणीच्या दुधाची गरज, मातेची मोदींना हाक, राजस्थानवरुन मुंबईत दूध दाखल
Follow us
| Updated on: Apr 13, 2020 | 3:36 PM

मुंबई :  कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे (Autistic child mother request PM Modi). मात्र, लॉकडाऊनमुळे अनेकांची गैरसोय होत आहे. मुंबईत वास्तव्यास असलेल्या रेणू कुमारी यांच्या साडेतीन वर्षांच्या मुलाला ऑटिझम या दुर्धर आजाराने ग्रासलं आहे. तो सांडणीचंच दूध पितो. लॉकडाऊनदरम्यान या मुलाला सांडणीचं दूध मिळावं यासाठी मुलाच्या आईने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवरुन साद घातली. प्रशासनाने या महिलेच्या ट्विटची दखल घेत चक्क राजस्थानवरुन थेट मुंबईत सांडणीचं दूध दाखल केलं (Autistic child mother request PM Modi).

मुंबईत राहणाऱ्या रेणु कुमारी यांच्या साडेतीन वर्षाच्या मुलाला ऑटिझम या दुर्धर आजाराने ग्रासलं आहे. या मुलाला गाय, म्हैस, शेळीच्या दुधाची अॅलर्जी आहे. तो फक्त सांडणीचं दूध पितो. राजस्थानच्या साद्री येथून ही महिला सांडणीचं दूध मागवत असे. मात्र, लॉकडाऊनमुळे सांडणीचं दूध मिळवणं अशक्य झालं. त्यामुळे तिने ट्विट करत आपली समस्या सांगितली. या ट्विटमध्ये तिने पंतप्रधान मोदींनादेखील टॅग केलं होतं.

नेहा कुमारींचं ट्विट बघितल्यानंतर आयपीएस अधिकारी अरुण बोथरा यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. बोथरा यांनी अॅडव्हिक फूड्स या कंपनीशीदेखील संपर्क साधला. ही कंपनी सांडणीच्या दूधाचं पावडर बनवते. या कंपनीने दूध देण्यास होकार दिला. त्यानंतर रेल्वे प्रशासनाची मदत घेऊन दूध मुंबईच्या नेहा कुमारींच्या घरी पोहोचवण्यात आलं.

नेहा कुमारींच्या घरी 20 लिटर दूध पोहोचल्यानंतर अरुण बोथरा यांनी काल (12 एप्रिल) ट्विटरवर याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी उत्तर-पश्चिम रेल्वेचे मुख्य प्रवासी वाहतूक व्यवस्थापक तरुण जैन यांचे आभार मानले. कारण त्यांच्या मदतीने नियोजित नसणाऱ्या स्थानकावर रेल्वे थांबवण्यात आली आणि मुंबईत दूध पोहोचवण्यात आलं.

'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.