मुसलमान RSS जॉईन करू शकतात का? मोहन भागवत पहिल्यांदाच बोलले; मोठं विधान काय?
Can Muslims Join RSS: मुसलमान हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात RSS मध्ये सामील होऊ शकतात का ? असा प्रश्न संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना नुकताच विचारण्यात आला होता. त्यावर भागवतांनी दिलेलं उत्तर चर्चेत आहे. काय म्हणाले मोहन भागवत ?

Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे( RSS) प्रमुख मोहन भागवत हे चार दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर गेले होते. त्याच वेळी त्यांना विचारण्यात आलेला एक प्रश्न आणि त्यावर भागवतांनी दिलेल्या उत्तराची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. मुसलमान हे आरएसएस जॉईन करू शकतात का असा प्रश्न विचारण्यात आल्यावर मोहन भागवतांनी पहिल्यांदाच या विषयावर उत्तर दिलं. नेमकं काय म्हणाले मोहन भागवत ?
जे मुसलमान भारत माता की जय हा नारा देतात आणि भगव्या झेंड्याचा मान राखतात, ते (मुसलमान) संघाच्या शाखेमध्ये सामील होऊ शकतात, अशी अट सांगत भागवत यांनी हे महत्वाचं विधान केलं . रविवारी 6 एप्रिल रोजी मोहन भागवतांच्या या विधानामुळे सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.
मुसलमान RSS जॉईन करू शकतात का?
वाराणसीच्या दौऱ्यावर असलेले मोहन भागवत हे नगर कॉलनीमधील RSS च्या एका शाखेत गेले होते. यावेळी त्यांनी जातिभेद दूर करणे, पर्यावरण आणि अर्थव्यवस्था तसेच सशक्त समाज स्थापन करण्यासह अनेक मुद्यांवर भाष्य केलं. दरम्यान याच कार्यक्रमात एका स्वयंसेवकाने आरएसएस प्रमुखांना असा प्रश्न विचारला की, मुस्लिम आरएसएसमध्ये सामील होऊ शकतात का ?, त्यावर मोहन भागवत यांनी स्पष्टपणे जे उत्तर दिलं त्याची चर्चा सगळीकडे आहे.
ही अट करावी लागेल पूर्ण
RSS प्रमुखांच्या म्हणण्यानुसार, ‘ शाखेत( RSS) सर्व भारतीयांचे स्वागत आगहे. मात्र त्यासाठी केवळ एक अट आहे, ती म्हणजे शाखेत सामील होण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ‘भारत माता की जय’ असा नारा देताना कोणताही संकोच करू नये. तसेच त्यांनी भगव्या झेंड्याबद्दलही आदर दाखवला पाहिजे’ अशी अट मोहन भागवत यांनी सांगितली असून त्यांचं उत्तर सध्या बरच चर्चेत आहे.
शाखेत सर्वांचे स्वागत
आपल्या भारत देशात लोकांचे धर्म जरी वेगळे असले तरी सर्वांची संस्कृति एकच आहे, असे मोहन भागवत यांनी नमूद केलं. भारतातील सर्व धर्म, पंथ आणि जातीच्या लोकांचे प्रत्येक शाखेत स्वागत करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितलं. लाजपत नगरमधील कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी मोहन भागवत यांची शनिवारी 5 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी काशीच्या वैदिक विद्वानांसोबत बैठक झाली. तेथे त्यांनी भारताला जागतिक नेता बनवण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करण्यासंदर्भात विद्वानांशी चर्चा केली.