भारताशी पंगा कॅनेडाला पडला महागात, 800 कंपन्यांनी…
Canada Economy justin tudor and narendra modi: तिसऱ्या तिमाहीत कॅनडाचा जीडीपीमध्ये 1.1 टक्के घसरण झाली होती. सतत दोन तिमाहीत घसरण झाली तर मंदी म्हटले जाते. यामुळे जानेवारी 800 कंपन्यांनी दिवाळखोरीसाठी अर्ज केल्यामुळे कॅनडासमोर संकट निर्माण झाले आहे.
नवी दिल्ली | 20 मार्च 2024 : मालदीवने भारताशी पंगा घेतला. त्यानंतर मालदीवची परिस्थिती बिकट झाली. परंतु मालदीवच नव्हे तर भारताशी पंगा घेणाऱ्या कॅनेडाची अर्थव्यवस्थेवर गंभीर संकट निर्माण झाले आहे. कॅनेडाची अर्थव्यवस्था मंदीत जाण्याची शक्यता आहे. कॅनडामध्ये दिवाळखोरी जाहीर करणाऱ्या कंपन्यांची संख्या वेगाने वाढत आहे. केवळ जानेवारी महिन्यात 800 कंपन्यांनी दिवाळखोरीसाठी अर्ज केले आहे. त्यापूर्वी जानेवारी 2023 मध्ये दिवाळखोरी होणाऱ्या कंपन्यांचे प्रमाण 40 टक्के वाढले होते. गेल्या 13 वर्षांत कॅनडातील दिवाळखोरीचा हा सर्वाधिक आकडा आहे. कॅनडामध्ये कोरोना काळात कंपन्यांना 45,000 डॉलर व्याजमुक्त कर्ज दिले होते. त्याची डेडलाइन जानेवारी महिन्यात संपली. कॅनडामध्ये छोट्या कंपन्यांचा वाटा 33 टक्के आहे.
असे आहे कॅनडासमोर संकट
कॅनडा सरकारच्या दाव्यानुसार, देशातील अर्थव्यवस्था मजबूत आहे. परंतु लहान कंपन्या आणि अन्य ग्राहकांना संघर्ष करावा लागत आहे. डिसेंबर महिन्यात कॅनेडाची अर्थव्यवस्थेत 0.3 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच चौथ्या तिमाहीत ही वाढ 1.2 टक्के असण्याची शक्यता आहे. तिसऱ्या तिमाहीत कॅनडाचा जीडीपीमध्ये 1.1 टक्के घसरण झाली होती. सतत दोन तिमाहीत घसरण झाली तर मंदी म्हटले जाते. यामुळे जानेवारी 800 कंपन्यांनी दिवाळखोरीसाठी अर्ज केल्यामुळे कॅनडासमोर संकट निर्माण झाले आहे.
कॅनाडाने घेतला होता पंगा
कॅनाडाचे राष्ट्रपती जस्टीन ट्रूडो यांनी मागील वर्षी भारताशी पंगा घेतला होता. ट्रूडो यांनी खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंह निज्जर याच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण होते. दोन्ही देशांनी एक-दुसऱ्यांच्या दुतावासातील अधिकाऱ्यांची हाकलपट्टी केली होती. दोन्ही देशांतील वादाला सुरुवात नवी दिल्लीत जी-20 संमेलनापासून सुरु झाली. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जस्टिन ट्रूडो यांच्यात बैठक झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनेडातील अतिरेकी कारवाया रोखण्यासाठी कॅनेडाने ठोस उपाययोजना कराव्या, असे म्हटले होते.
एकंदरीत जागतिक परिस्थितीत सध्या ब्रिटनसह जगातील आठ देश मंदीच्या गर्तेत अडकले आहेत. यामध्ये सहा देश युरोपातील आहेत. जपान मंदीतून थोडक्यात बचावला आहे. तसेच चीनमधील परिस्थितीही बिघडत आहे. अमेरिकेवर कर्ज वाढत आहे.