‘उमेदवारांना सगळ्या संपत्तीचा खुलासा करण्याची गरज नाही, जो पर्यंत…’, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
कुठल्याही मतदाराला उमेदवाराच्या प्रत्येक संपत्तीबाबत जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार नाहीय, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलय. उमेदवाराला गोपनीयतेचा अधिकार आहे. हे निर्देश जस्टिस अनिरुद्ध बोस आणि संजय कुमार यांच्या खंडपीठाने दिलेत.
निवडणूक लढणारे उमेदवार आणि त्यांच्या आश्रितांना मालकीच्या सर्व मूवेबल प्रॉपर्टीचा खुलासा करण्याची आवश्यकता नाही. त्या प्रॉपर्टीची किंमत जास्त नसेल व विलासी जीवनशैलीशी संबंधित नसेल, तर त्या प्रॉपर्टीचा खुलासा करण्याची गरज नाही. एका रिपोर्ट्नुसार, अरुणाचल प्रदेश तेजूमधून अपक्ष उमेदवार कारिखो क्रि यांची निवड कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने हे निर्देश दिलेत.
कुठल्याही मतदाराला उमेदवाराच्या प्रत्येक संपत्तीबाबत जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार नाहीय, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलय. उमेदवाराला गोपनीयतेचा अधिकार आहे. हे निर्देश जस्टिस अनिरुद्ध बोस आणि संजय कुमार यांच्या खंडपीठाने दिलेत. सोबतच गुवाहाटी हायकोर्टाचा तो आदेश सुद्धा रद्द केलाय. ज्यात, कारिखो क्रि ची निवडणूक शून्य घोषित करण्यात आली होती.
कुटुंबाची संपत्ती मानता येणार नाही
कारिखो क्रि च्या प्रतिस्पर्धी उमेदवारने त्याच्याविरोधात याचिका दाखल केली होती. कारिखो क्रि ने उमेदवारी अर्ज दाखल करताना पत्नी आणि मुलाच्या नावावर असलेल्या तीन वाहनांबद्दल कुठलाही खुलासा केला नव्हता. कारिखो क्रि यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी वाहन भेट म्हणून दिले होते किंवा विकले होते. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की, या वाहनांना क्रि कुटुंबाची संपत्ती मानता येणार नाही.
कपडे, बूट याची घोषणा करण्याची गरज नाही
उमेदवाराने त्याच्या सर्व संपत्तीचा खुलासा केला पाहिजे होता, हा सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्याचा दावा सुद्धा फेटाळून लावला. उमेदवारीवर परिणाम होणार असेल, तर उमेदवाराने त्याच्या संपत्तीचा खुलासा केला पाहिजे. हे आवश्यक नाहीय की, उमेदवाराने कपडे, बूट, क्रॉकरी, स्टेशनरी, फर्नीचर या सारख्या प्रत्येक चल संपत्तीची घोषणा केली पाहिजे.