Amrindar Singh Resigns : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा अखेर राजीनामा! आता पुढचं पाऊल काय?
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदस सिंग यांनी अखेर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. कॅप्टन अमरिंगदर सिंग यांनी राज्यपालांची भेट घेऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, अमरिंदर सिंग यांच्या विरोधात 40 आमदारांनी दंड थोपटल्यानंतर आज संध्याकाळी काँग्रेसने तातडीची बैठक बोलावली आहे.
नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली धुसपूस आज वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. कारण, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदस सिंग (Capt. Amrinder Singh) यांनी अखेर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा (Resignation) दिलाय. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राज्यपालांची (Governor) भेट घेऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, अमरिंदर सिंग यांच्या विरोधात 40 आमदारांनी दंड थोपटल्यानंतर आज संध्याकाळी काँग्रेसने तातडीची बैठक बोलावली आहे. यात विधीमंडळ नेता निवडण्यात येणार आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार रवीन ठुकराल यांनी दिली आहे. (Punjab Chief Minister Capt Amarinder Singh’s resignation)
आता हवं त्याला मुख्यमंत्री करा- कॅप्टन
‘दोन महिन्यात काँग्रेस आमदारांची दिल्लीत तिसऱ्यांदा बैठक बोलावण्यात आली आहे. याचा अर्थ असा की आता माझ्यावर विश्वास राहिला नाही किंवा मी सरकार चालवू शकलो नाही. मात्र, यामुळे मला अपमानित झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. आता हवं त्याला मुख्यमंत्री करा’, अशी संतप्त प्रतिक्रिया कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिली आहे. त्यामुळे आता अमरिंदर सिंग काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसंच कॅप्टनबाबत काँग्रेस नेतृत्व काय भूमिका घेणार? याकडेही संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे.
CM Captain Amarinder Singh has met Punjab Governor and submitted his and his council of ministers’ resignation. He will address the media at the Raj Bhavan gate in a few minutes from now: Raveen Thukral, Media Advisor to Punjab CM pic.twitter.com/VwxpGruX74
— ANI (@ANI) September 18, 2021
हिंदू नेत्याकडे सूत्रे?
दरम्यान, आज होणाऱ्या विधीमंडळ नेत्यांच्या बैठकीत पक्षातील हिंदू नेत्याची विधीमंडळ नेतेपदी निवड केली जाण्याची शक्यता आहे. त्यात सुनील जाखड आणि विजय इंद्र सिंगला यांच्या नावाची अधिक चर्चा आहे. तर नवज्योतसिंग सिद्धूही विधीमंडळ नेतेपदाच्या शर्यतीत असल्याचं सांगितलं जात आहे.
नेमका वाद काय?
पंजाबमध्ये एकीकडे विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी होत असताना, काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. पंजाब काँग्रेस दोन गटात विभागली आहे. एक गट नवज्योत सिद्धू यांचा तर दुसरा कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा आहे. अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवण्याची मागणी केली जात होती. त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक आमदारांनी आवाज उठवण्यात आला होता. हे प्रकरण इतकं वाढलं होतं की काँग्रेसच्या केंद्रीय समितीला हस्तक्षेप करावा लागला.
पंजाब काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. त्यामुळे हायकमांडने या 25 आमदार आणि मंत्र्यांना दिल्लीत बोलावलं होतं. या सर्व आमदारांशी काँग्रेसच्या तीन सदस्यांच्या पॅनलने चर्चा केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील झाखड, मंत्री चरणजीत चन्नी, सुखजिंदर सिंह रंधवा आदींचा या बंडखोरांमध्ये समावेश आहे. निवडणुकीच्या काळात राज्यातील जनतेला काँग्रेसकडून आश्वासने देण्यात आली होती. या आश्वासनांची पूर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना सवाल करण्यास सुरुवात केली होती. परिणामी मुख्यमंत्री आणि या आमदारांमध्ये तणाव निर्माण झाला होता. कदाचित याच कारणामुळे अमरिंदर सिंग यांनी राजीनाम दिला आहे.
इतर बातम्या :
Breaking : आधी भाजपात गेले, नंतर संन्यास घेतो म्हणाले आणि आता थेट ममता दिदीच्याच पक्षात, भाजपला झटका
Punjab Chief Minister Capt Amarinder Singh’s resignation