अन् काही क्षणात मृत्यूने गाठलं… डान्स, जिम आणि प्रवास करताना आला हार्ट अटॅक; कुठे घडल्या या घटना?

एक महिन्यापूर्वी उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्येही लग्नाचा सोहळा दु:खात बुडाला होता. या लग्नात नवरदेवाला वरमाला घातल्यानंतर नवरीचा मृत्यू झाला होता.

अन् काही क्षणात मृत्यूने गाठलं... डान्स, जिम आणि प्रवास करताना आला हार्ट अटॅक; कुठे घडल्या या घटना?
अन् काही क्षणात मृत्यूने गाठलं... डान्स, जिम आणि प्रवास करताना आला हार्ट अटॅकImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 08, 2023 | 11:18 AM

नवी दिल्ली: हृदयविकाराने मृत्यू होण्याचं प्रमाण गेल्या काही दिवसांपासून अधिकच वाढलं आहे. तरुणांपासून ते ज्येष्ठ नागरिकांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचं हे प्रमाण वाढलं आहे. विशेष म्हणजे व्यायाम करताना, डान्स करताना, प्रवास करताना आणि चालता चालताही अनेकांना हृदयविकाराच्या झटका येत असल्याचं दिसून आलं आहे. गेल्या काही दिवसात देशाच्या विविध भागात या घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोणत्या भागात या घटना घडल्या त्यावर टाकलेला हा प्रकाश.

उत्तर प्रदेशातली लखनऊमध्ये जिममध्ये वर्कआऊट करताना डॉक्टरची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे ते जमिनीवर कोसळले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना जिमच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना विकास नगर येथील आहे.

हे सुद्धा वाचा

मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी 41 वर्षीय डॉक्टर संजीव पाल हे जिममध्ये वर्कआऊट करत होते. त्यावेळी त्यांची तब्येत अचानक बिघडली. जिममध्ये वर्कआऊट करता करता ते खाली कोसळले. जिममधील लोकांना वाटलं ते बेशुद्ध पडले असावेत. त्यामुळे त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. हृदयविकारामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

इंदौरमध्येही अशीच घटना घडली. जिममध्ये एक्सरसाईज करताना हॉटेलच्या संचालकांना चक्कर आली. तेही कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या मते, त्यांनाही हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे नाव प्रदीप रघुवंशी ऊर्फ मामा रघुवंशी असं आहे. ते भाजपचे महामंत्री कैलाश विजयवर्गीय यांचे निकटवर्तीय होते.

प्रदीप नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी इंदौरच्या लसुडिया परिसरातील गोल्डन जिममध्ये वर्कआऊट करत होते. त्यावेळी ते अचानक खाली कोसळले. त्यामुळे त्यांना तातडीने जवळच्या भंडारी रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं, असं पोलिसांनी सांगितलं.

काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशातील भिंडमध्ये 12 वर्षाच्या मुलाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यावर डॉक्टरांनीही चिंता व्यक्त केली. एवढ्या कमी वयात हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू ओढवण्याची ही पहिलीच घटना असावी, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. 12 वर्षीय मनिष जाटव हा चौथ्या वर्गात शिकत होता. तो आपल्या भावासोबत इटावा येथील शाळेत शिकत होता, असं त्याच्या कुटुंबीयांनी सांगितलं.

भावासोबत ते शाळेत गेला होता. शाळेत त्याने दुपारी जेवण घेतलं. त्यानंतर घरी येण्यासाठी तो शाळेच्या बसमध्ये चढला. बसमध्ये चढताच त्याला चक्कर आली. त्यामुळे तो कोसळला. बसचालकाने शाळेला ही माहिती दिली. त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. पण त्याला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आलं.

उत्तराखंडच्या अल्मोडा येथेही मुलीच्या लग्नात नाचत असताना वडिलांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. त्यामुळे लग्नाचं आनंदाचं वातावरण दु:खाचं झालं. हल्दानीच्या मीइज हॉलमध्ये हे लग्न होणार होतं. त्यामुळे अल्मोडा येथील घरात हळदीपासून ते मेहंदीपर्यंतचा कार्यक्रम सुरू होता. हळदीच्या कार्यक्रमाच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत लोक डान्स करत होते.

यावेळी नवरीच्या वडिलांनीही जोरदार डान्स केला. परंतु नाचता नाचता अचानक त्यांना घाम फुटला आणि ते डान्स करतानाच कोसळले. त्यामुळे त्यांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. हृदयविकारामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

एक महिन्यापूर्वी उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्येही लग्नाचा सोहळा दु:खात बुडाला होता. या लग्नात नवरदेवाला वरमाला घातल्यानंतर नवरीचा मृत्यू झाला होता. मलिहाबाद येथील भदवाना गावात ही घटना घडली होती. राजपाल यांची मुलगी शिवांगी हिच्या लग्नाचा सोहळा होता. बुद्घेश्वरहून वरात आली होती. लग्नाला आलेले सर्वचजण आनंदात होते. लोकांना जेवण केलं. त्यानंतर स्टेजजवळ लग्न सोहळा पाहण्यासाठी लोक जमले.

स्टेजवर नवरदेव आणि नवरी एकमेकांच्यासमोर उभे होते. नवरदेव विवेकने नवरी शिवांगीला हार घातला. त्यानंतर शिवांगीनेही विवेकला हार घातला. विवेकला हार घालताच शिवांगी कोसळली. त्यामुळे तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे तिला मृत घोषित करण्यात आलं. हृदयविकाराने तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं गेलं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.