बँकेत ग्राहकांच्या खात्यात अचानक आले 850 कोटी रुपये, CBI ची पुण्यासह 67 ठिकाणी छापेमारी

UCO Bank CBI Raid: मागील वर्षी 10 ते 13 नोव्हेंबर दरम्यान युको बँकेच्या 41,000 खाते धारकांच्या खात्यात अचानक पैसे जमा झाले. सर्व खातेदारांची मिळून ही एकंदरीत रक्कम 850 कोटी रुपये होती. ज्या बँक खात्यांमधून हा व्यवहार दाखवण्यात आला होता, त्यातून पैसे कापले न जाता युको बँकेच्या खात्यात पैसे दिसू लागले.

बँकेत ग्राहकांच्या खात्यात अचानक आले 850 कोटी रुपये, CBI ची पुण्यासह 67 ठिकाणी छापेमारी
Follow us
| Updated on: Mar 08, 2024 | 3:54 PM

नवी दिल्ली, पुणे | दि. 8 मार्च 2024 : देशातील मोठ्या सरकारी बँकेच्या 850 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI ) छापेमारी सुरु केली आहे. एकाच वेळी देशातील 67 ठिकाणी छापेमारी करण्यात आली. त्यात राजस्थानमधील जोधपूर, जयपूर, जालोर, नागौर आणि बाडमेरसह महाराष्ट्रातील पुणे येथील युको बँकेच्या शाखांचा समावेश आहे. या प्रकरणी मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. IMPS द्वारे ग्राहकांच्या खात्यात 850 कोटी रुपये वर्ग झाले होते.

सीबीआयने विविध ठिकाणी केलेल्या छापेमारीत 130 डॉक्यूमेंट्स, 40 मोबाइल, 2 हार्ड डिस्क आणि एक इंटरनेट डोंगल जप्त केला आहे. तसेच सीबीआय याने छापेमारी दरम्यान 30 संशयित जणांची चौकशी केली आहे.

काय आहे प्रकरण

मागील वर्षी 10 ते 13 नोव्हेंबर दरम्यान युको बँकेच्या 41,000 खाते धारकांच्या खात्यात अचानक पैसे जमा झाले. सर्व खातेदारांची मिळून ही एकंदरीत रक्कम 850 कोटी रुपये होती. ज्या बँक खात्यांमधून हा व्यवहार दाखवण्यात आला होता, त्यातून पैसे कापले न जाता युको बँकेच्या खात्यात पैसे दिसू लागले. त्यामुळे तपास यंत्रणांना धक्का बसला. हे सर्व व्यवहार केवळ IMPS द्वारेच होत होते. यामुळे तपास यंत्रणा सतर्क झाल्या. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला.

हे सुद्धा वाचा

पैसे जमा होताच लोकांनी काढली रक्कम

खात्यात पैसे जमा होताच अनेक लोकांनी रक्कम काढून घेतली. या प्रकरणी युको बँकेकडून तक्रार देण्यात आली. त्यानंतर दोन अभियंते आणि इतर काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सीबीआयने त्या लोकांची तपासणी केली. त्यावेळी त्यांच्याकडून मोबाइल फोन, लॅपटॉप, कॅम्यूटंर, डेबिट आणि क्रेडीट कार्ड जप्त करण्यात आले.

या प्रकरणी युको बँकेने स्वत: तक्रार केली होती. बँकेने आधी सांगितले की हा अपहार सुमारे 1.53 कोटी रुपयांचा आहे. त्यानंतर बँकेने शेअर बाजाराला सांगितले की तांत्रिक बिघाडामुळे ही चूक झाली. त्यानंतर तांत्रिक बिघाडाचा फायदा घेत ई-मित्र ऑपरेटर आणि बँक कर्मचाऱ्यांनी मिळून 850 कोटी रुपये काढल्याचे उघड झाले. बँकेने 649 कोटी रुपये वसूल केले आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.