bipin rawat death prediction : एक वर्षापूर्वीच रावत यांच्या मृत्यूबाबत भाकीत, या जोतिष्याने केली होती भविष्यवाणी
बंगळुरूस्थित एका नियतकालिकाने केलेली आधुनिक ज्योतिषशास्त्राची भविष्यवाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई : सीडीएस बिपीन रावत यांच्या जाण्याने संपूर्ण देश हळहळ व्यक्त करतोय. जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. या अपघातात बिपीन रावत त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि इतर 11 जणांचा मृत्यू झाला आहे. रावत यांच्या मृत्यूनंतर अनेक तर्क समोर आले आहेत. त्यातच बंगळुरूमधील एका मॅगझिनच्या पेजच्या वृत्ताने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. या मॅगझिनने एक वर्षापूर्वीच देशातील बड्या व्यक्तीच्या मृत्यूची भविष्यवाणी वर्तवली होती. देशातील बडा व्यक्ती… मग तो लष्करप्रमुखही असू शकतो, अशी भविष्यवाणी वर्तवण्यात आली होती. रावत यांच्या मृत्यूमुळे या मॅगझिनचं भाकीत खरं ठरल्याचं सांगितलं जात आहे.
मृत्यूचं वर्षभरापूर्वीच भाकीत
बंगळुरूस्थित एका नियतकालिकाने केलेली आधुनिक ज्योतिषशास्त्राची भविष्यवाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. या नियतकालिकाच्या संपादक गायत्री वासुदेव आहेत. त्यांच्या ज्योतिषविद्येचा देशातच नाही तर परदेशातही नावलौकीक आहे. त्यांनी त्यांच्या लेखात लिहले आहे की, देशातील दोन बड्या नेत्यांना धोका असू शकतो. (जे लष्करप्रमुखही असू शकतात) त्यांनी या लेखात लिहले आहे की 26 मे 2021 ते 4 डिसेंबर 2021 हा ग्रहणांचा सर्वात संवेदनशील कालावधी आहे. या काळात गुन्हेगारी डोकं वर काढू शकते, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाची सुरक्षा वाढवली जाणार असल्याचंही त्यात भाकीत आहे. आता सीडीएस प्रमुख रावत यांच्या मृत्यूनंतर हा लेख पुन्हा चर्चेत आला आहे. हा लेख नोव्हेंबर 2020 मध्ये लिहिला आहे.
कोण आहेत गायत्री वासुदेव?
गायत्री वासुदेव यांची ही भविष्यवाणी व्हायरल झाल्यावर गायत्री वासुदेव कोण आहेत याचा शोध सुरू झाला. तर गायत्री वासुदेव या फक्त भारतातच नाही तर जगात ज्यांच्या भविष्यवाणीची चर्चा आहे, त्यांच्या या लेखाने सध्या सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे.