Rip bipin rawat : सीडीएस बिपीन रावत यांचं पार्थिव दिल्लीत दाखल, पंतप्रधान, राष्ट्रपती वाहणार श्रद्धांजली
बिपीन रावत यांच्या जाण्याने संपूर्ण देश शोकाकूल वातावरणात गेला आहे. दिल्लीच्या पालम विमानतळावर त्यांचं पार्थिव दाखल झाल आहे. रावत यांच्यावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
नवी दिल्ली : सीडीएस बिपीन रावत यांचं पार्थिव दिल्लीत दाखल झालं आहे. रात्री 9 वाजता पंतप्रधान मोदी त्यांना श्रद्धांजली वाहणार आहेत. बिपीन रावत यांच्या जाण्याने संपूर्ण देश शोकाकूल वातावरणात गेला आहे. दिल्लीच्या पालम विमानतळावर त्यांचं पार्थिव दाखल झाल आहे. रावत यांच्यावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सकाळी काही वेळ दिल्लीतील सर्वसामान्य लोक रावत यांना श्रद्धांजली वाहणार आहेत. त्यानंतर दिल्ली कैंट बराड़ स्क्वायरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पंतप्रधान, राष्ट्रपती वाहणार श्रद्धांजली
बिपीन रावत यांचं पार्थिव दिल्लीत दाखल झाले असून त्यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्र 9 नंतर श्रद्धांजली वाहणार आहेत. तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद हेही रावत यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचणार आहेत. रावत यांच्या जाण्याने देशासह सैन्यावरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हेही रावत यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पालम येथे पोहोचणार आहेत. तामिळनाडुतून पार्थिव निघाले त्यावेळी तेथील लोकांनी रुग्णवाहिकेवर पुष्पवृष्टी केली आणि श्रद्धांजली वाहीली आहे. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाल्याचंही दिसून आले.
हेलिकॉप्टर अपघातात 13 जणांचा मृत्यू
- सीडीएस जनरल बिपिन रावत
- मधुलिका रावत (बिपीन रावत यांच्या पत्नी)
- ब्रिगेडियर एल एस लिद्दर
- लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंह
- विंग कमांडर पृथ्वीसिंह चौहान
- स्क्वाड्रन लीडर कुलदीप सिंह
- जेडब्ल्यूओ राणा प्रताप दास
- जेडब्ल्यूओ प्रदीप ए.
- हवलदार सतपाल
- नायक गुरसेवक सिंह
- नायक जितेंद्र कुमार
- लांस नायक विवेक कुमार
- लांस नायक साइ तेजा
दिल्लीतल्या हलचाली वाढल्या
दिल्लीतल्या हलचाली सध्या वाढल्या आहेत. विमानतळावरचा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. याच ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यासाठी राष्ट्रवती आणि पंतप्रधान येणार आहेत. सैन्याच्या तिन्ही दलाचे प्रमुखही रावत यांना श्रद्धांजली वाहणार आहेत. संपूर्ण देशाला चटका लावून जाणारी ही घटना आहे. उद्या सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांचं अंत्यदर्शन घेता येणार आहे. तर त्यांची अंत्ययात्राही निघणार आहे. कधीकाळी रावत यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम केलेले अधिकारी त्यांना निरोप देताना भावूक झाले आहेत