AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिम कार्ड खरेदीचा बदलला नियम, नाहीतर विक्रेत्यांवर अशी होणार कारवाई

SIM Cards | सिम कार्ड खरेदीबाबत केंद्र सरकारने मोठा बदल केला आहे. सिम कार्डच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्याचा ग्राहकांना पण फटका बसणार आहे. तर विक्रेत्यांना नियमांचे उल्लंघन करणे अंगलट येणार आहे. सिमकार्ड विक्रेत्यांची नोंदणी आता बंधनकारक असेल. त्यामुळे ऑनलाईन फसवणूकीला आळा घालता येईल.

सिम कार्ड खरेदीचा बदलला नियम, नाहीतर विक्रेत्यांवर अशी होणार कारवाई
Follow us
| Updated on: Nov 07, 2023 | 9:14 AM

नवी दिल्ली | 7 नोव्हेंबर 2023 : केंद्र सरकारने सिमकार्ड खरेदी-विक्रीच्या नियमात बदल केला आहे. काही देशविघातक कामासाठी बोगस ओळखपत्राआधारे सिमकार्डचा वापर करण्यात आल्याचे उघड झाले. अशा आरोपींपर्यंत पोहचणे अवघड झाले. सिमकार्ड विक्रेत्यांचा पण अनेकदा अशा प्रकरणात हात असल्याचे उघड झाले. काही व्यक्तींच्या नावे अनेक सिम कार्ड आढळले. त्यामुळे विक्रेत्यांना केंद्राने लगाम घातला आहे. नवीन नियमांनुसार, सिम कार्ड विक्रेत्यांना नोंदणीपूर्वी आणि सिस्टममध्ये सहभागी होण्यापूर्वी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यांची अगोदर नोंद होईल. नवीन नियमांच्या अंमलबजावणीनंतर एका ओळखपत्रावर सिम खरेदीला बंधन येतील. अतिरिक्त सिम खरेदीवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

2 महिन्यांचा अतिरिक्त वेळ

केंद्राने सिमकार्ड ऑगस्ट महिन्यात खरेदी-विक्रीचा नियम बदलला. हा नियम देशभरात 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू होणार होता. पण टेलिकॉम कंपन्या आणि विक्रेत्यांना पुरेशा अवधी हवा होता. त्यामुळे त्याची अंमलबजावणी पुढे ढकलण्यात आली. दूरसंचार कंपन्यांच्या विनंती नंतर दूरसंचार विभागाने या नियमाच्या अंमलबजावणीस कंपन्यांना 2 महिन्यांचा अतिरिक्त वेळ दिला. दोन महिन्यांनी म्हणजे 1 डिसेंबर 2023 रोजीपासून हा नियम लागू होणार आहे.

हे सुद्धा वाचा

तर 10 लाखांचा दंड

नवीन नियम लागू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात सिम खरेदी करणाऱ्यांना त्याचा फटका बसेल. त्यांच्यावर कडक कारवाई होईल. या नियमांचा फटका टेलिकॉम कंपन्यांना पण बसेल. त्यांनी विक्रेत्याची नोंदणी करणे आवश्यक आहे. विना नोंद विक्रेता सिम कार्ड विक्री करताना आढळला तर 30 नोव्हेंबरनंतर टेलिकॉम कंपनीवर कडक कारवाई होईल. 10 लाख रुपयांचा दंडाचा फटका बसू शकतो. सर्व डिलर्सनी 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. जुजबी अथवा तोंडी नोंदणी अमान्य आहे. सिम कार्ड विक्रेता आणि संबंधीत दूरसंचार कंपनी यांच्यात लेखी करार बंधनकारक आहे.

देशात इतके सिमकार्ड विक्रेते

देशात अनेक सिमकार्ड विक्रेते आहेत, ज्यांची ना पडताळणी झालेली आहे ना त्यांची कुठे नोंद आहे. हे सिमकार्ड विक्रेते कोणत्याही पडताशिवाय, दुसऱ्याच्या ओळखपत्रावर सिम कार्डची विक्री करत होते. बनावट सिम कार्ड आणि आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी केंद्राने नवीन नियम केले आहेत. नवीन नियमानुसार, टेलिकॉम कंपन्यांवर कारवाई होईल. तशी सिमकार्ड विक्रेत्यांवर कारवाई होईल. त्यांचा सहभाग आढळल्यास तीन वर्षांसाठी सिमकार्ड विक्री करता येणार नाही. काळ्या यादीत टाकण्यात येईल. तसेच इतर कायद्यान्वेय कारवाई होईल. देशात सध्या 10 लाख सिमकार्ड विक्रेते आहेत.

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.