Plastic Ban |केंद्र सरकारचा मोठा निर्णय, सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी, जाणून घ्या नवे नियम

Ban on Single Use Plastic Items : पुढच्या वर्षी म्हणजेच 1 जुलै 2022 पासून सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये सिंगल यूज प्लास्टिकची निर्मिती, विक्री, साठवण तसेच वाहूतक करण्यास बंदी असेल.

Plastic Ban |केंद्र सरकारचा मोठा निर्णय, सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी, जाणून घ्या नवे नियम
Follow us
| Updated on: Aug 13, 2021 | 11:22 PM

मुंबई : देशातील वाढत्या प्लास्टिक प्रदूषणावर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच 1 जुलै 2022 पासून सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी (Ban on Single Use Plastic) घालण्यात आली आहे. यामध्ये सिंगल यूज प्लास्टिकची(Single Use Plastic) निर्मिती, विक्री, साठवण तसेच वाहूतक करण्यास बंदी असेल. पर्यावरणप्रेमींनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सुधारणा नियम 2021 जारी केला आहे. याअंतर्गत वरील निर्णय घेण्यात आला आहे. (central government bans manufacturing sales and use of single use plastic items from July 1 next year)

उत्पादन, आयात, साठवण, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी

नव्या अधिनियमानुसार 1 जुलै 2022 पासून पॉलिस्टीरिन आणि विस्तारित पॉलिस्टीरिनसह सिंगल यूज प्लास्टिकच्या उत्पादन, आयात, साठवण, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी असेल. यामध्ये प्लास्टिकच्या विविध वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. झेंडा, फुगे, आईसक्रीम आणि कँडीसाठी वापरत असलेल्या प्लास्टिकच्या काड्या, सजावटीसाठी वापरण्यात येणारे थर्माकॉल यांचे उत्पान करण्यात बंदी असेल. तसेच प्लेट्स, कप, ग्लासेस, स्वीट बॉक्स, इन्विटेशन कार्ड आणि सिगारेटच्या पॅकेटवरील प्लास्टिकचे रॅप अशा वस्तूंची निर्मिती करण्यासही बंदी असेल.

नव्या नियमांत काय आहे ?

नव्या नियमांनुसार येत्या 30 सप्टेंबर 2021 पासून प्लास्टिक पिशवीची जाडी 50 मायक्रॉनवरून 75 मायक्रॉन केली जाईल. तसेच पुढील वर्षी 31 डिसेंबर 2022 पासून हीच जाडी 120 मायक्रॉनपर्यंत वाढवली जाईल. सध्याच्या नियमानुसार देशात 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडी असलेल्या पिशव्यांचे उत्पादन, साठवण करण्यास बंदी आहे.

निर्णयाचे पर्यावरणप्रेमींकडून स्वागत

दरम्यान, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे पर्यावरण संवर्धानास मोठी मदत मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारच्या या निर्णयाचे पर्यावरणप्रेमींनी स्वागत केले आहे. ठरलेल्या वेळेनुसार या सर्व नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे.

इतर बातम्या :

बंदी असताना बैलगाडा शर्यतीचं आयोजन, गोपीचंद पडळकरांकडून बक्षिसांची खैरात, ठाकरे सरकार कारवाई करणार ?

नाकाबंदी सुरु असताना गाडी थांबवली, वाहतूक पोलिसाला दगडाने मारहाण, कल्याणमधील धक्कादायक घटना

लाँचिंगआधीच Jio Phone Next चे फीचर्स लीक, किंमत फक्त…

(central government bans manufacturing sales and use of single use plastic items from July 1 next year)

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....