सर्वसामान्यांच्या एका चुकीमुळे शासनाने कमवले दोन हजार 125 कोटी
Income Tax | सर्वसामान्यांची एक चूक शासनासाठी फायदेशीर ठरली आहे. सामान्यांच्या या चुकीमुळे सरकारची चांगली कामाई झाली आहे. तब्बल दोन हजार 125 कोटी रुपये जुलै ते डिसेंबर या कालावधी केंद्र सरकारने कमावले आहे. सामान्यांची ही चूक पॅन आणि आधार लिंक न करण्याची आहे.
नवी दिल्ली, दि.26 डिसेंबर | आपली कामे वेळेत करण्याचा प्रयत्न अनेकांचा असतो. परंतु कधी विविध कारणांमुळे ही कामे होत नाही. सर्वसामान्यांची एक चूक शासनासाठी फायदेशीर ठरली आहे. सामान्यांच्या या चुकीमुळे शासनाला तब्बल दोन हजार 125 कोटींची कमाई झाली आहे. केंद्र सरकारने पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी 30 जून 2023 मुदत दिली होती. या मुदतीत पॅन आणि आधार लिंक न करणाऱ्यांना 1 जुलैपासून दंड आकारला जात आहे. या मुदतीनंतर पॅनकार्ड धारकाकडून सरकारने 1 हजार रुपये दंड वसूल केला. हा दंड आता 2,115 कोटी रुपये झाला आहे. या काळात दोन कोटी 12 लाख लोकांनी दंड भरून पॅन आणि आधार कार्ड लिंक केले आहे.
वेळेवेळी वाढवली होती मुदत
केंद्र सरकारने पॅन-आधार कार्ड लिंक करण्यासाठी पाच वेळा मुदत दिली होती. 31 मार्च 2023 पर्यंत दिलेली मुदत 30 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आली. त्यानंतर 1 जुलैपासून पॅन आणि आधार कार्ड जोडण्यासाठी दंड घेतला जाऊ लागला. 1 जुलै नंतर पॅन आणि आधार लिंक करणाऱ्या व्यक्तीकडून आतापर्यंतरुपयांचा दंड वसूल केला. हा दंड 2 हजार 125 कोटींवर पोहचला आहे. आधार आणि पॅन लिंक नसेल तर आयकरचे रिफंड मिळणार नाही.
किती कार्ड निष्क्रिय
आधार आणि पॅन जोडले नाहीत, तर किती पॅनकार्ड निष्क्रीय करण्यात आले, त्यावर अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की, आधारशी पॅन जोडले नाही म्हणून एकही पॅनकार्ड निष्क्रिय केले नाही. परंतु आधारशी लिंक नसलेले पॅनकार्ड व्यवहारासाठी ग्राह्य धरले जात नाही. 30 जूनपर्यंत 54 कोटी 67 लाख 74 हजार 649 पॅनकार्ड आधार कार्डला जोडले गेले आहेत. पॅन आणि आधार लिंक नसेल तर करदात्यावर कर देय असेल तर त्याला जास्त दंड घेतला जात आहे. देशात सुमारे 70 कोटी लोकांनी पॅन कार्ड घेतले आहेत. त्यापैकी 60 कोटी जणांनी पॅन कार्ड आधार लिंक केले आहे.