Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मध्य रेल्वे @ 70; उद्यापासून 71व्या गौरवशाली वर्षात पदार्पण

सध्या मध्य रेल्वेवर मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर आणि पुणे असे 5 विभाग आहेत. मध्य रेल्वेचे नेटवर्क महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यांमध्ये 4,151 मार्ग किमीवर पसरलेले असून एकूण 471 स्थानके आहेत.

मध्य रेल्वे @ 70; उद्यापासून 71व्या गौरवशाली वर्षात पदार्पण
मध्य रेल्वे @ 70; उद्यापासून 71व्या गौरवशाली वर्षात पदार्पण
Follow us
| Updated on: Nov 04, 2021 | 11:44 PM

नवी दिल्ली : जीआयपी रेल्वेच्या उत्तराधिकारी असलेल्या मध्य रेल्वेच्या स्थापनेला गौरवशाली 70 वर्षे पूर्ण झाली असून 5 नोव्हेंबर रोजी 71वे वर्ष सुरू होत आहे. अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांनी त्यांचा स्थापना दिनाचा संदेश देताना मध्य रेल्वेच्या 71 व्या स्थापना दिनानिमित्त रेल्वे प्रवासी, वापरकर्ते आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

आशियातील (आणि भारतातील) पहिली ट्रेन शनिवारी, 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान धावली. जसजशी वर्षे उलटली, तसतशी ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेचा विस्तार होत गेला. 1900 मध्ये जीआयपी रेल्वे कंपनीमध्ये इंडियन मिडलँड रेल्वे कंपनीचे विलीनीकरण झाल्यानंतर, तिची सीमा उत्तरेला दिल्ली, ईशान्येला कानपूर आणि अलाहाबाद आणि पूर्वेला नागपूरपासून दक्षिण-पूर्वेला रायचूरपर्यंत वाढवण्यात आली. अशा प्रकारे, बॉम्बे द्वारे भारताच्या जवळजवळ सर्व भागांशी संपर्क साधला गेला. जीआयपीचे रूट मायलेज 2,575 किमी होते.

5 नोव्हेंबर 1951 रोजी निजाम राज्य, सिंधिया राज्य आणि ढोलपूर राज्य रेल्वे यांचे एकत्रीकरण करून मध्य रेल्वेची स्थापना करण्यात आली. सध्या मध्य रेल्वेवर मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर आणि पुणे असे 5 विभाग आहेत. मध्य रेल्वेचे नेटवर्क महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यांमध्ये 4,151 मार्ग किमीवर पसरलेले असून एकूण 471 स्थानके आहेत.

मध्य रेल्वेने गेल्या 70 वर्षांत अनेक कामगिऱ्या सर्वप्रथम केल्या आहेत. त्यापैकी काही उल्लेखनीय कामगिऱ्या पुढीलप्रमाणे आहेत:

पहिली शताब्दी एक्सप्रेस, पहिली जन शताब्दी एक्सप्रेस, पहिली तेजस एक्सप्रेस आणि गेल्या वर्षी पहिली किसान रेल. मध्य रेल्वे विकासात सतत आघाडीवर आहे. मूळ लोडिंग जी निर्मितीच्या वेळी 16.58 दशलक्ष टन होते, तीच आता 2020-21 मध्ये 62.02 दशलक्ष टन झाले आहे. 2021-22 या वर्षात एप्रिल-ऑक्टोबरमध्ये 41.02 दशलक्ष टन मालवाहतुकीचे आतापर्यंतचे सर्वोच्च प्रमाण गाठले. उपनगरीय सेवा देखील 1951 मधीलसे 519 वरून 2021 मध्ये 1814 पर्यंत वाढल्या आहेत.

मुंबईची उपनगरीय सेवा ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. मध्य रेल्वेने उपनगरीय नेटवर्कमध्ये सातत्याने वाढ केली असून आज चार मार्गिका आहेत. 3 डब्यांपासून सुरू झालेल्या उपनगरीय सेवा हळूहळू 9 डब्यांच्या, 12 डब्यांच्या आणि 15 डब्यांच्या काही सेवांपर्यंत वाढल्या आहेत. प्रवास अधिक सोयीस्कर आणि आरामदायी करण्यासाठी एसी उपनगरीय सेवाही सुरू करण्यात आल्या आहेत. याशिवाय नवीन रेल्वेमार्ग बांधणे, दुहेरीकरण, अनेक ठिकाणी तिरा रेल्वेमार्ग, विद्युतीकरण, पूल बांधणे, नवीन स्थानके बांधणे आदी पायाभूत सुविधांची कामे वेगाने सुरू आहेत.

मध्य रेल्वेनेही अनेक संकटांचा सामना केला आहे आणि ती मजबूत झाली आहे. मुसळधार पाऊस असो, 26/11 दहशतवादी हल्ला असो किंवा कोविड-19 चे गंभीर आव्हान असो, आमच्या समर्पित कर्मचाऱ्यांनी या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि त्यावर मात करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत. अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक म्हणाले की, मध्य रेल्वे आपल्या प्रवाशांना आणि ग्राहकांना आगामी काळात सुरक्षित आणि वक्तशीर सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. (Central Railway’s unbeaten 70 years; Debuting in 71st year from tomorrow)

इतर बातम्या

आद्य शंकराचार्यांच्या मूर्तीचे पंतप्रधानांच्या हस्ते केदारनाथमध्ये अनावरण, 82 तीर्थक्षेत्री कार्यक्रम होणार

श्रीनगर-शारजाह विमानासेवेसाठी मार्ग मोकळा करावा, भारताने पाकिस्तानला केली विनंती

सुनीता विल्यम्स 'ग्रह'वापसी, बघा अवकाशातून पृथ्वीवर परण्याचा प्रवास
सुनीता विल्यम्स 'ग्रह'वापसी, बघा अवकाशातून पृथ्वीवर परण्याचा प्रवास.
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.