चंद्राबाबू नायडू यांचा आंध्रात ‘उद्धव ठाकरे पॅटर्न’; शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदी येणार
आंध्रप्रदेशात पुन्हा एकदा चंद्राबाबू नायडू यांचं सरकार आलं आहे. चंद्राबाबू नायडू यांनी घवघवीत यश मिळवलं आहे. आज ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत पवन कल्याण हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी चंद्राबाबू आंध्रात ठाकरे पॅटर्न राबवणार आहेत.
तेलगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू आज आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. चंद्राबाबू नायडू हे आंध्रप्रदेशचे चौथ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत. त्यांच्यासोबत 24 आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शपथ घेणाऱ्या आमदारांची नावेही फायनल झाली आहेत. विजयवाडा येथे हा शपथविधी सोहळा होणार आहे. या सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.
चंद्राबाबू नायडू यांचा शपथविधी सोहळा आज सकाळी 11 वाजून 27 मिनिटांनी विजयवाडा येथे पार पडणार आहे. चंद्रबाबू नायडू यांनी आपल्या मंत्रिमंडळात जातीय समीकरणावर अधिक भर दिला आहे. चंद्राबाबूंच्या मंत्रिमंडळात खुल्या वर्गातील 13 मंत्री असणार आहेत. 7 ओबीसी, एससी वर्गातील दोन आणि एसटी तसेच अल्पसंख्याक वर्गातील प्रत्येकी एका मंत्र्याचा समावेश असणार आहे. शपथ घेणाऱ्या सर्वच्या सर्व 24 जणांचे नाव फायनल करण्यात आलेलं आहे.
पवन कल्याण यांना मोठी ऑफर
चंद्राबाबू यांनी आपल्या मंत्रीमंडळात पवन कल्याणही मंत्री होणार आहेत. पवन कल्याण यांना चंद्राबाबूंनी उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. त्यामुळे पवन कल्याण हे राज्याचे उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंध्र प्रदेश विधानसभेत एकूण 175 सदस्य आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह एकूण 26 मंत्री होऊ शकतात. चंद्राबाबू यांच्या मंत्रिमंडळात भाजपच्या मंत्र्यांनाही संधी दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
ठाकरे पॅटर्न
उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली होती. ते स्वत: मुख्यमंत्री झाले होते. तसेच त्यांनी त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांना आपल्या मंत्रिमंडळात मंत्री केले होते. चंद्राबाबूंनीही हाच ठाकरे पॅटर्न आंध्रात राबवला आहे. चंद्राबाबू स्वत: मुख्यमंत्री होणार आहेत. तर त्यांचे चिरंजीव नारा लोकेश हे त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होणार आहे.
मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्री
पवन कल्याण
नारा लोकेश
किंजरापु अचेन नायडू
कोल्लू रवीन्द्र
नाडेंडला मनोहर
पी नारायण
वांगलापुडी अनिता
सत्य कुमार यादव
डॉ. निम्मला राम नायडू
एनएम फारूक
अनम रामनारायण रेड्डी
पय्यावुला केशव
अनागनी सत्य प्रसाद
कोलुसु पार्थसारधि
डॉ. डोला बालवीरंजनेय स्वामी
गोत्तीपति रवि कुमार
कंडुला दुर्गेश
गुम्मदी संध्यारानी
बीसी जर्नादन रेड्डी
टीजी भरत
एस सविता
वासमसेट्टी सुभाष
कोंडापल्ली श्रीनिवास
मंडिपल्ली राम प्रसाद रेड्डी