Chandrayaan 3 | ISRO ने त्यांच्या मिशनसाठी भारतीयांना रोमँटिक असलेला चंद्रचा का निवडला?

Chandrayaan-3 | भारतासाठी आज महत्वाचा दिवस आहे. मागच्या मोहिमेतील शेवटच्या टप्प्यात आलेलं अपयश विसरुन भारत आज नव्या उमेदीने, जिद्दीने पुन्हा चंद्रावर झेपावणार आहे. समस्त भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण असेल.

Chandrayaan 3 | ISRO ने त्यांच्या मिशनसाठी भारतीयांना रोमँटिक असलेला चंद्रचा का निवडला?
ISRO Chandrayaan-3 MissionImage Credit source: isro/pti
Follow us
| Updated on: Jul 14, 2023 | 11:04 AM

मुंबई : पृथ्वीच्या जवळचा ग्रह म्हणजे चंद्र. जगातल्या बहुतांश देशांसाठी चंद्र म्हणजे विज्ञान. भारतासाठी सुद्धा चंद्र म्हणजे विज्ञानच आहे. पण भारतीयांसाठी रोमँटिक दृष्टीकोनातून चंद्राच एक वेगळेपण आहे. भारतातील काही साहित्यिक, कवींनी चंद्राच खूप रोमँटिक वर्णन केलं आहे. लहान मुलांच्या कथा, भारतीय चित्रपट, संगीत आणि पुराण कथा ऐकल्या, तर चंद्राकडे भारतीयांचा पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन आहे. त्यामुळे भावनात्मक दृष्टीने चंद्र भारतीयांना जास्त जवळचा वाटतो.

याच चंद्राच्या दिशेने आज आपण पुन्हा झेपावणार आहोत. मागचं अपयश मागे सोडून नव्या जिद्दीने, उमेदीने चंद्रावर पाऊल ठेवणार आहोत. त्यामुळे कवी, साहित्यिकांनी वर्णन केलेला कवितेचला चंद्र कसा आहे ते जवळून अनुभवणार आहोत.

हे सुद्धा वाचा

मिशनचा उद्देश काय?

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोच चांद्रयान-3 चंद्रावर जाण्यासाठी सज्ज झालं आहे. अमेरिकेचे नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पहिलं मानवी पाऊल ठेवलं. त्यानंतर काही अन्य अंतराळवीरही चंद्रावर जाऊन आले. चंद्राला समजून घेणं, हाच या सर्व मोहिमांचा उद्देश होता. विज्ञानाला चंद्राबद्दल प्रचंड कुतूहल आहे. त्यामुळे प्रत्येक चंद्र मोहिमेकडे जगातील अनेक देश लक्ष ठेवून असतात.

चांद्रयान-3 मध्ये काय साध्य होणार?

आज दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी इस्रोच चांद्रयान-3 चंद्राच्या दिशेने प्रस्थान करेल. मिशन तयारीचा आढावा घेणाऱ्या MRR समितीने बुधवारी दुपारी चांद्रयान-3 च्या लॉन्चला हिरवा कंदिल दाखवला आहे. चांद्रयान-2 मोहिमेत जी उद्दिष्टय होती, तेच चांद्रयान-3 मिशनच लक्ष्य असणार आहे. कारण त्यावेळी चांद्रयान-2 मोहिम शेवटच्या टप्प्यात फसली होती. आपल्याला चंद्रावर योग्य पद्धतीने लँडर उतरवता आला नव्हता. सॉफ्ट ऐवजी हार्ड लँडिंग झालं होतं. म्हणजे लँडर क्रॅश झाला होता. त्यामुळे नियोजित उद्दिष्टय पूर्ण करता आली नव्हती. तेच अपूर्ण काम चांद्रयान-3 मध्ये साध्य करायचं आहे.

मिशनसाठी चंद्रच का निवडला?

चांद्रयान मिशनबद्दल इस्रोने सांगितलं की, “चंद्र हा ब्रह्माण्डांत पृथ्वीच्या जवळ असलेला ग्रह आहे. तिथे जाऊन अवकाश संशोधनाबद्दल बऱ्याच गोष्टींचा उलगडा होऊ शकतो. चंद्रापेक्षा पण दूर अंतरावर असलेल्या ग्रहांच्या मोहिमसाठी कशा प्रकारच्या टेक्नोलॉजीची गरज लागेल, ते लक्षात येऊ शकतं” इस्रोच्या भविष्यातील आंतरग्रह मोहिमांसाठी चांद्रयान-3 ची खूप मदत होऊ शकते. चांद्रयान 3 द्वारे लँडर आणि रोव्हर चंद्रावर जाणार आहे. त्यातून चंद्राबद्दलची बरीच माहिती आपल्याला मिळेल. तिथली जमीन, वातावरण कसं आहे? याच उलगडा होईल.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.