Chandrayaan-3 | हॉरिजॉन्टल ते व्हर्टिकल हेच ISRO च्या वैज्ञानिकांसमोर मुख्य चॅलेंज, मागच्यावेळी चूक इथेच झालेली

Chandrayaan-3 | South Pole वर लँडिंग इतकं कठीण का? लँडिंगच्या शेवटच्या 15 मिनिटातील चार फेज काय असतील? मागच्यावेळी क्रॅश लँडिंगला काय कारण ठरलेलं? चंद्रावरची धूळ सुद्धा बिघडवू शकते खेळ. जाणून घ्या.

Chandrayaan-3 | हॉरिजॉन्टल ते व्हर्टिकल हेच ISRO च्या वैज्ञानिकांसमोर मुख्य चॅलेंज, मागच्यावेळी चूक इथेच झालेली
Chandrayaan-3 Update
Follow us
| Updated on: Aug 23, 2023 | 10:36 AM

बंगळुरु : भारताची चांद्रयान-3 मोहीम अंतिम टप्प्यात आली आहे. सर्वकाही सुरळीत राहिलं, तर 23 ऑगस्टला संध्याकाळी 6.04 मिनिटांनी चांद्रयान-3 लँड करेल. सर्वकाही ठरल्यानुसार चालू आहे, अशी इस्रोने मंगळवारी टि्वट करुन माहिती दिली. सिस्टिमची रेग्युलर तपासणी सुरु आहे. पण तुम्हाला माहित आहे का? लँडिंगआधीचा 15 मिनिटांचा वेळ महत्त्वाचा असेल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर असं काय आहे? तिथे लँडिंग कठीण का आहे? ते जाणून घ्या.

लँडिंगच्या शेवटच्या 15 मिनिटातील चार फेज काय असतील?

पहिला रफ ब्रेकिंग फेज आहे. चांद्रयान-3 लँडिंगच्या जागेपासून 30 किमी अंतरावर असताना हा फेज सुरु होईल.

एटीट्यूड होल्ड हा दुसरा फेज असेल. लँडिंग साइटपासून 32 किलोमीटर लांब यान हॉरिजॉन्टल मोडमध्ये असेल आणि 7.4 किमी उंचीवर हा फेज सुरु होईल.

फाइन ब्रेकिंग हा तिसरा फेज असेल. लँडिंग साइटपासून 28.52 किलोमीटर दूर आणि 6.8 किमी उंचीवर हा फेज सुरु होईल. त्यावेळी सुद्धा यान हॉरिजॉन्टल म्हणजे आडवं असेल.

टर्मिनल डिसेंट हा चौथा फेज असेल. लँडिंग साइटपासून 800 ते 1300 मीटर उंचीवर हा फेज सुरु होईल. या फेजमध्ये चांद्रयान लँडिंग साइटवर उतरेल.

चंद्रावर वातावरण नाहीय

मागच्यावेळी जी चूक झाली, ती पुन्हा होऊ नये, यासाठी तयारी पूर्ण करण्यात आली आहे. पण काही आव्हान आहेत. त्याचा सामना चांद्रयान-3 ला करावा लागणार आहे. चांद्रयानाची दिशा हे सॉफ्ट लँडिंगच्यावेळी मुख्य आव्हान आहे. कारण चांद्रयान हॉरिजॉन्टलमधून खाली 90 डिग्री व्हर्टिकल उतरणार आहे. चांद्रयानाचा वेग हे एक आव्हान असेल. चंद्रावर वातावरण नाहीय, त्यामुळे वेग नियंत्रित करण चॅलेंज आहे.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर काय स्थिती आहे?

तिथे मोठे डोंगर आणि खड्डे आहेत.

सूर्याची किरण तिरपी पडतात.

बहुतांश भागामध्ये अंधार असतो.

अनेक खड्डे अब्जावधी वर्षापासून अंधारात आहेत.

अंधारामुळे हे खड्डे खूप थंड आहेत.

या भागात तापमान -203 डिग्री सेल्सियस आहे.

इथे पाणी आणि खनिज सापडण्याची शक्यता आहे. दक्षिण ध्रुवावर लँडिंग कठीण का?

सूर्य नेहमी क्षितिजावर असतो.

सावली खूप लांबपर्यंत पडते.

सूर्यप्रकाशही पुष्ठभागावर स्पष्ट दिसत नाही.

लँडिंगच्यावेळी भरपूर धूळ उडते.

त्यामुळे सेंसर आणि थ्रस्टर खराब होण्याची भिती

कॅमेऱ्याच्या लेन्सवर धूळ जमा होऊ शकते.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.