Chandrayaan-3 Update | ‘Smile Please…’, चंद्रावर कसा दिसतो विक्रम लँडर? प्रज्ञानने काढला फोटो
Chandrayaan-3 Update | चंद्रावर विक्रम लँडरचा प्रज्ञान रोव्हरमधील कॅमेऱ्यामधून फोटो काढण्यात आला आहे. ISRO ने हा फोटो रिलीज केलाय. इस्रोने या फोटोला कॅप्शन सुद्धा दिलं आहे. भारताच्या मिशन चांद्रयानमधील अनेक उद्दिष्टय यशस्वी होत आहे.
बंगळुरु : भारताच मिशन चांद्रयान-3 यशस्वी ठरलं आहे. 23 ऑगस्टला विक्रम लँडरने चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं. इस्रोकडून दरदिवशी या मिशनबद्दल नवीन अपडेट दिली जात आहे. मंगळवारी इस्रोकडून विक्रम लँडरचा फोटो शेअर करण्यात आला. प्रज्ञान रोव्हरने हा फोटो काढला आहे. Smile Please असं इस्रोने या फोटोला कॅप्शन दिलं आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऑक्सिजनसह अन्य तत्व असल्याची इस्रोने मंगळवारी पुष्टी केली. मिशनमधील हे एक मोठ यश आहे. इस्रोने बुधवारी टि्वट केलं. ‘Smile Please’ प्रज्ञान रोव्हरने विक्रम लँडरचे फोटो क्लिक केले. हे फोटो प्रज्ञान रोव्हरच्या नेविगेशन कॅमेऱ्यातून काढण्यात आले आहेत.
NavCam कॅमेरा Laboratory for Electro-Optics Systems (LEOS) सिस्टिमने तयार केला आहे. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, 30 ऑगस्टला सकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी प्रज्ञान रोव्हरने हा फोटो क्लिक केलाय. 14 जुलैला चांद्रयान-3 मिशनची सुरुवात झाली होती. 23 ऑगस्टला विक्रम लँडरने दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं. चंद्राच्या पुष्ठभागावर यशस्वीपणे उतरणारा भारत जगातील चौथा आणि दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश ठरला. भारताच्या आधी अमेरिका, रशिया आणि चीन या तीन देशांनीच चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलय.
इस्रोला आतापर्यंत चंद्रावर काय सापडलय?
चांद्रयान-3 मधील विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्रावर सातत्याने संशोधन करतोय. काल चंद्रावर ऑक्सिजन, आयरन, क्रोमियम, टायटेनियम, एल्युमिनियम, कॅल्शियम, मॅगनीज, सिलिकॉन, सल्फर असल्याची पुष्टी केली. आता प्रज्ञान रोव्हर इथे हायड्रोजनचा शोध घेण्याचा प्रयत्न करतोय.
Chandrayaan-3 Mission:
Smile, please📸!
Pragyan Rover clicked an image of Vikram Lander this morning.
The ‘image of the mission’ was taken by the Navigation Camera onboard the Rover (NavCam).
NavCams for the Chandrayaan-3 Mission are developed by the Laboratory for… pic.twitter.com/Oece2bi6zE
— ISRO (@isro) August 30, 2023
अजून महत्त्वाचे शोध अपेक्षित
चंद्राच्या तापमानाबद्दल सुद्धा काही महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. चंद्राच्या पुष्ठभागापासून 10 सेंटीमीटर आत मायनस तापमान आहे. पुष्ठभागावर तेच तापमान 50 डिग्रीपेक्षा जास्त असते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाबद्दल अजूनपर्यंत या गोष्टी माहित नव्हत्या. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरमधील उपकरण अजून काही महत्त्वाचे शोध लावू शकतात.