Chandrayaan-3 Update | ISRO कडून रात्री 2 वाजता चंद्रावर 2 मिनिटांचा जगाला थक्क करुन सोडणारा प्रयोग
Chandrayaan-3 Update | ठरलेल्या अजेंड्यापेक्षा इस्रोने वेगळं काहीतरी करत कमाल केली. या टेस्टने भविष्यात भारतासाठी बरेच दरवाजे उघडले आहेत. एक संधी दिसली. इस्रोच्या वैज्ञानिकांनी लगेच ती साधली. इस्रो अशी कमाल दाखवेल अशी कोणी अपेक्षा केली नसेल.
बंगळुरु : भारताच मिशन चांद्रयान-3 स्लीप मोडमध्ये आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने चंद्रावर काम बंद केलय. चंद्रावर आता रात्र आहे. त्यामुळे लँडर आणि रोव्हर कुठलीही एक्टिविटी करणार नाहीत. स्लीप मोडमध्ये जाण्याआधी विक्रम लँडरने जगाला हैराण करुन सोडलय. इस्रोने सोमवारी चंद्रावर होप टेस्ट केल्याच जाहीर केलं. विक्रम लँडरने चंद्रावर 40 सेमीची उडी मारली. दुसऱ्या जागेवर तो स्थापित झाला. हे चंद्रावर विक्रम लँडरच दुसरं सॉफ्ट लँडिंग होतं. चांद्रयान-3 मिशनमध्ये होप टेस्टचा समावेश नव्हता. इस्रोच्या वैज्ञानिकांना स्लीप मोडमध्ये जाण्याआधी एक संधी दिसली. त्यावेळी त्यांनी हा प्रयोग करुन पाहिला. ही एक मोठी रिस्क होती. यात चांद्रयान-3 यशस्वी ठरलं. होप टेस्टमध्ये एक प्रकारची उडी मारली जाते. अशी टेस्ट करुन इस्रोने आता चंद्रावर मानव मिशन आणि अन्य मिशन्स सुरु करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकलय.
रविवारी रात्री दोन वाजता विक्रम लँडरला स्लीप मोडमध्ये टाकण्यात येत होतं. त्यावेळी बॅटरी फुल चार्ज असल्याच लक्षात आलं. त्यावेळी थ्रस्टर ऑन करण्यात आले. त्यामुळे विक्रम लँडरने हवेत उड्डाण केलं. 40 सेमीपर्यंत वर उचललं गेलं. 40 सेमी दूर सॉफ्ट लँडिंग करण्यात आलं. अशा प्रकारने चंद्राच्या पुष्ठभागावर दुसऱ्यांदा सॉफ्ट लँडिंग करण्यात आलं. 2 मिनिटांच्या या प्रयोगाने इस्रोसाठी भविष्यातील अनेक दरवाजे उघडण्यात आले आहेत.1967 साली चंद्रावर पहिल्यांदा होप टेस्ट झाली होती.
अमेरिका आणि इस्रोच्या टेस्टमध्ये फरक काय?
1967 साली चंद्रावर अमेरिकेच्या सर्वेवर-6 ने जवळपास 4 मीटर उंच उडी मारली होती. त्या टेस्टमध्ये सर्वेवरने अडीच मीटर दूर सॉफ्ट लँडिंग केलं होतं. चांद्रयान-3 ची जम्प भले यापेक्षा कमी असेल. पण हा एक यशस्वी प्रयोग होता. भविष्यात चंद्रावर मानव मिशन पाठवण्यात आलं किंवा दुसऱ्या एखाद्या मिशनमध्ये चंद्रावरील सँपल घ्यायच असेल, तर एक जागेवरुन दुसऱ्या जागेवर लँडरला नेता येईल. भारताच्या मिशन चांद्रयान-3 ची 14 जुलैला सुरुवात झाली होती. 23 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी विक्रम लँडरने चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं.