Chandrayaan 3 Moon Landing LIVE Tracking : चांद्रयान 3 च यशस्वी लाँन्च, भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण
Chandrayaan 3 Moon Landing ISRO Mission LIVE Updates : आज भारतीयांचे डोळे आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोट्टा येथील सतिश धवन अवकाळ तळाकडे लागले आहेत. भारताच्या अत्यंत महत्वकांक्षी चांद्रयान - 3 मोहिमेला आज प्रारंभ होईल.
नवी दिल्ली : भारतीय अवकाश संशोधनाच्या दृष्टीने आज खूप महत्वाचा दिवस आहे. भारत पुन्हा एकदा नव्या उमेदीने, जिद्दीने चंद्रावर झेपावणार आहे. आज दुपारी आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोट्टा येथील सतिश धवन अवकाळ तळावरुन दुपारी 2.35 वाजता एलव्हीएम-एम4 या प्रक्षेपक रॉकेटद्वारे चांद्रयान-3 च प्रक्षेपण होणार आहे. चार वर्षांपूर्वी शेवटच्या टप्प्यात चांद्रयान-2 मिशनला झटका बसला होता. 2019 मध्ये लँडर आणि रोव्हर चंद्रावर उतरवण्यात अपयश आलं होतं. 14 जुलै रोजी दुपारी 2 वाजल्यापासून चांद्रयान-3 मोहीमेचे लाईव्ह इव्हेंट पाहता येईल. चंद्रयान-3 लॉन्चिंगच (how to watch chandrayaan 3 launch live ) संपूर्ण मिशन तुम्ही इस्रोच्या वेबसाईटवर ( https://www.isro.gov.in ) आणि youtube चॅनलवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.
मिशनचे ठरवलेले सर्व निकष इस्रोला साध्य करता आले नव्हते. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत पुन्हा चांद्र मोहिम करेल, अशी घोषणा केली होती. आज भारत पुन्हा एकदा चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे. भारताच्या चांद्रयान 3 ला चंद्रावर पोहोचण्यासाठी महिन्याभरापेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. 23 किंवा 24 ऑगस्टला चंद्रावर सॉफ्ट लँडिंगच इस्रोच लक्ष्य आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
Chandrayaan 3 LIVE : चांद्रयान 3 च्या यशस्वी लाँन्चिंग नंतर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
भारताच्या अवकाश प्रवासात चांद्रयान 3 ने एक नवीन अध्याय लिहिला आहे. पंतप्रधान मोदींनी वैज्ञानिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Chandrayaan-3 scripts a new chapter in India’s space odyssey. It soars high, elevating the dreams and ambitions of every Indian. This momentous achievement is a testament to our scientists’ relentless dedication. I salute their spirit and ingenuity! https://t.co/gko6fnOUaK
— Narendra Modi (@narendramodi) July 14, 2023
-
Chandrayaan 3 LIVE : चांद्रयान 3 मोहिमेत काय अवघड टप्पे आहेत?
“चांद्रयान 3 चा पहिला टप्पा यशस्वी झाला आहे. पण अजून अनेक कठीण चाचण्या बाकी आहेत” याची कल्पना चांद्रयान 3 चे प्रोजेक्ट डायरेक्टर पी. वीरामुथूवेल यांनी दिली. चांद्रयान 3 ला चंद्राच्या कक्षेत पाठवण्याआधी पृथ्वीच्या कक्षेत अनेक चाचण्या करण्यात येणार आहेत. मॉड्युलपासून लँडरच वेगळं होणं तसेच लँडिंगच्यावेळी गती नियंत्रण हे सगळे अवघड टप्पे असतील, याची कल्पना प्रोजेक्ट डायरेक्टर पी. वीरामुथूवेल यांनी दिली आहे.
#WATCH | ISRO chief S Somanath says, “Chandrayaan-3 has started its journey towards the moon. Our dear LVM3 has already put Chandrayaan-3 craft into the precise around earth…Let us wish all the best for the Chandrayaan-3 craft to make its farther orbit raising manoeuvres and… pic.twitter.com/S6Za80D9zD
— ANI (@ANI) July 14, 2023
-
-
Chandrayaan 3 LIVE : चांद्रयान 3 ची हेल्थ कशी आहे?
ठरवलेल्या योजनेनुसार, प्रक्षेपणानंतर चांद्रयान 3 LVM रॉकेटपासून वेगळं झालं. त्यानंतर अत्यंत योग्य कक्षेत चांद्रयान 3 स्थापित झालं. चांद्रयानचा चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु झालाय. चांद्रयान 3 च आरोग्य उत्तम आहे.
Chandrayaan-3, in its precise orbit, has begun its journey to the Moon. Health of the Spacecraft is normal.
— ISRO (@isro) July 14, 2023
-
Chandrayaan 3 LIVE : चंद्रापासून 2.1 किमी उंचीवर जे घडलेलं, तसं पुन्हा घडू नये, म्हणून ISRO ने काय केलय ते वाचा
चांद्रयान 2 मिशनमध्ये झालेल्या चुकांमधून धडा घेऊन इस्रोने चांद्रयान 3 साठी काही बदल केले आहेत. टेक्नोलॉजी चांद्रयान 2 च्या वेळचीच असणार आहे. मग नेमकं बदललय काय? ते जाणून घ्या. वाचा सविस्तर…..
LVM3 M4/Chandrayaan-3 Mission: LVM3 M4 vehicle? successfully launched Chandrayaan-3?️ into orbit.
— ISRO (@isro) July 14, 2023
-
Chandrayaan 3 LIVE : चांद्रयान अवकाशातील अपेक्षित कक्षेत स्थापित
LVM रॉकेटद्नारे चांद्रयान 3 च यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं आहे. चांद्रयान 3 अवकाशातील अपेक्षित कक्षेत स्थापित झालं आहे. इस्रोच्या अध्यक्षांनी या मिशनवर काम करणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांच अभिनंदन केलं, त्यांना शुभेच्छा दिल्या.
-
-
Chandrayaan 3 LIVE : चंद्रावर उतरताना अचानक गती वाढली तर काय?
LMV-3 रॉकेटद्वारे चांद्रयान 3 च प्रक्षेपण करण्यात आलं आहे. यावेळी अचानक गती वाढली, तरी समस्या येऊ नये, अशी व्यवस्था आहे. ऊर्जा निर्मितीची क्षमता वाढवण्यात आली आहे. अतिरिक्त सेन्सर्सचा वापर करुन दबाव झेलण्याची क्षमता वाढवण्यात आली आहे. टेक्नोलॉजीत फार सुधारणा केलेली नाही. पण चंद्रावरच्या स्थितीशी जुळवून घेण्यासाठी लँडरच्या डिजायनिंगमध्ये बदल केला आहे. रोव्हरची टेक्नोलॉजीही तिच असेल.
-
Chandrayaan 3 LIVE : दक्षिण ध्रुवाच्या दिशेने चांद्रयान 3 झेपावलं
ठरवलेल्या निकषानुसार चांद्रयान 3 च प्राथमिक उड्डाण झालं आहे. चंद्रयान यशस्वीरित्या अवकाशाच्या दिशेने झेपावलं आहे. इस्रोच्या कार्यालयात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. स्टेज 1 यशस्वी झालं आहे.
-
Chandrayaan 3 LIVE : रोव्हरच्या टेक्नोलॉजीत काय बदल केला?
चांद्रयान 3 मध्ये सहाचाकी लँडर आणि रोव्हर आहे. रोव्हर चंद्रावर माती आणि दगडाचा अभ्यास करेल. चंद्रावरच्या स्थितीशी जुळवून घेण्यासाठी लँडरच्या डिजायनिंगमध्ये बदल केला आहे. रोव्हरची टेक्नोलॉजीही तिच असेल.
-
Chandrayaan 3 LIVE : चांद्रयानच्या यशासाठी मुंबईत होमहवन
चांद्रयान 3 च्या लॉन्चिंगला आता फक्त काही मिनिट उरली आहेत. देशाच्या वेगवेगळ्या भागात प्रार्थना सुरु झाल्या आहेत. मुंबईमध्ये चांद्रयान 3 च्या यशासाठी होमहवन सुरु आहे.
-
महत्वाकांक्षी चंद्रयान-३ मोहिम तीन कामे करणार – ‘इस्रो’
श्रीहरिकोट्टा येथील सतिश धवन अंतराळ केंद्रातून भारताची महत्वाकांक्षी चंद्रयान-३ मोहिम थोड्याच वेळात सुरु होत आहे. यंदाच्या मोहिमेची तीन उद्दीष्ठे आहेत. एक चंद्रावर सुरक्षित आणि सॉफ्ट लॅंडींग करणे, दुसरे चंद्रावर सुरक्षितपणे रोव्हर उतरविणे आणि तिसरे चंद्राच्या पृष्ठभागाचा शास्रीय प्रयोगात्मक अभ्यास करणे असे भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ यांनी म्हटले आहे.
-
Chandrayaan 3 LIVE : चांद्रयान 3 पृथ्वीभोवती किती प्रदक्षिणा घालणार
“चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाली की, भारत दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा जगातला पहिलाच देश ठरेल. चंद्रावरचे शोध विक्रम लँडरच्या माध्यमातून लावता येणार. या मोहिमेसाठी एकुण 615 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. चंद्रावरच्या साऊथ पोलवर विक्रम लँडर लँड होणार आहे. पृथ्वीभोवती 5 वेळा फिरून नंतर चांद्रयान 3 चंद्राकडे झेपावणार आहे” असं लीना बोकील यांनी सांगितलं.
-
Chandrayaan 3 LIVE : चांद्रयान-3 मिशनसाठी ‘या’ तारखा महत्वाच्या
14 जुलै 2023 : चांद्रयान 3 श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश तळाच्या लॉन्चपॅडवरुन उड्डाण करेल.
23/24 ऑगस्ट 2023 : इस्रोच्या वैज्ञानिकांनी 23-24 ऑगस्ट या दोन तारखांना चंद्रावर सॉफ्ट लँडिंगची योजना बनवली आहे.
-
chandrayaan 3 LIVE : चंद्रयान-3 च लाइव्ह लॉन्चिंग
चांद्रयान 3 च्या लॉन्चिंगला आता फक्त काही वेळ बाकी उरला आहे. देशाचं लक्ष इस्रोच्या सतीन धवन अवकाश तळाकडे लागलं आहे. भारताची मोहिम यशस्वी झाल्यास अमेरिका, चीन आणि रशियानंतर अशी कामगिरी करणारा भारत जगातील चौथा देश ठरेल. तुम्ही चांद्रयान 3 च लाइव्ह लॉन्चिंग येथे पाहू शकता.
-
chandrayaan 3 LIVE : चंद्रापासून 2.1 किमी उंचीवर जे घडलेलं, तसं पुन्हा घडू नये, म्हणून ISRO ने काय केलय ते वाचा
Chandrayaan 3 | चांद्रयान 2 मिशनमध्ये झालेल्या चुकांमधून धडा घेऊन इस्रोने चांद्रयान 3 साठी काही बदल केले आहेत. टेक्नोलॉजी चांद्रयान 2 च्या वेळचीच असणार आहे. मग नेमकं बदललय काय? ते जाणून घ्या. वाचा सविस्तर….
-
chandrayaan 3 LIVE : पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान 3 मिशनसाठी इस्रोला शुभेच्छा दिल्या आहेत. “14 जुलैचा दिवस भारतीय इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल. चांद्रयान 3 मिशनसाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो” असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.
Chandrayaan-2 was equally pathbreaking because data from the Orbiter associated with it detected the presence of chromium, manganese and sodium for the first time through remote sensing. This will also provide more insights into the moon’s magmatic evolution. pic.twitter.com/K1KP7Yyvm5
— Narendra Modi (@narendramodi) July 14, 2023
-
chandrayaan 3 LIVE : रेडी स्टेडी गो..घरबसल्या चांद्रयान-3 चे लॉंचिंग लाईव्ह पाहा
14 जुलै रोजी दुपारी 2 वाजल्यापासून चांद्रयान-3 मोहीमेचे लाईव्ह इव्हेंट पाहता येऊ शकणार आहे. चांद्रयान-3 मोहिम साठी इस्रोच्या सर्वात विश्वासू अशा एलव्हीएम -3 या प्रक्षेपकाचा वापर केला जाणार आहे तुम्हाला इस्रोच्या वेबसाईटवर (https://www.isro.gov.in ) आणि youtube चॅनलवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहण्याची सोय करण्यात आली आहे. वाचा सविस्तर….
-
Chandrayaan 3 | अमेरिका, रशियापेक्षा पण भारताच मिशन चांद्रयान-3 सर्वात कठीण का? ISRO ने दक्षिण ध्रुवच का निवडला?
Chandrayaan 3 | चांद्रयान 2 मिशनमध्ये लँडिंग जिथे फसलं होतं. तिच जागा इस्रोने पुन्हा एकदा लँडिंगसाठी निवडली आहे. इस्रोने तीच जागा निवडण्यामागच कारण काय आहे? इस्रोने दक्षिण ध्रुवावरच आपलं लक्ष्य का केंद्रीत केलय? वाचा सविस्तर….
-
Chandrayaan-3 : चंद्रयान-3 मोहीम जुलै महिन्यात का होते ? या मोहीमेचे बजेट किती ? सर्व प्रश्नांची उत्तरे
चंद्रयान-3 प्रक्षेपण शक्तीशाली रॉकेट LVM3 ( पूर्वीचे GSLV MkIII ) द्वारे होणार असून त्याचा सक्सेस रेट शंभर टक्के आहे. इस्रोचे शास्रज्ञ त्याला फॅट बॉय म्हणतात. त्याने लागोपाठ सहा मोहिमा यशस्वी केल्या आहेत. वाचा सविस्तर….
-
Chandrayaan-3 | ISRO ने त्यांच्या मिशनसाठी भारतीयांना रोमँटिक असलेला चंद्रचा का निवडला?
Chandrayaan-3 | भारतासाठी आज महत्वाचा दिवस आहे. मागच्या मोहिमेतील शेवटच्या टप्प्यात आलेलं अपयश विसरुन भारत आज नव्या उमेदीने, जिद्दीने पुन्हा चंद्रावर झेपावणार आहे. समस्त भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण असेल. वाचा सविस्तर…..
-
Chandrayaan-3 | भारताच्या मिशन लॉन्चला एक दिवस उरलेला असताना चीनकडून चांद्र मोहिमेसंदर्भात मोठी घोषणा
Chandrayaan-3 | चीनने या घोषणेमधून आपण सुपर पॉवर असल्याच दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय. नेमकी ही घोषणा काय? आता पुन्हा चंद्र मोहिमा इतक्या का वाढल्या ? त्यामागे काय कारण आहे? वाचा सविस्तर…..
-
Chandrayaan-3 | भारत चंद्रावर झेंडा रोवणार, अमेरिकेची भारताच्या Moon Mission वर सर्वाधिक नजर असेल, कारण….
Chandrayaan-3 | असं काय कारण आहे की, ज्यामुळे अमेरिकेची भारताच्या मून मिशनवर सर्वात जास्त नजर असेल. या मिशन अंतर्गत भारत चंद्रावर काय-काय पाठवणार आहे? चांद्रयान 3 ला चंद्रावर पोहोचायला किती दिवस लागतील? मिशनची इनडिटेल माहिती जाणून घ्या एका क्लिकवर. वाचा सविस्तर….
-
Chandrayan-3 | मिशन चांद्रयान-3 मध्ये एका महिला ऑफिसरवर मोठी जबाबदारी, कोण आहे रितु कारिधाल?
रितु कारिधाल या उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊशी संबंधित आहेत. त्या रॉकेट वुमन ऑफ इंडिया म्हणून ओळखल्या जातात. अवकाश क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन त्यांना चांद्रयान-3 चं मिशन डायरेक्टर बनवण्यात आलं आहे. वाचा सविस्तर….
-
किती वाजता प्रक्षेपण?
आज दुपारी आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोट्टा येथील सतिश धवन अवकाळ तळावरुन दुपारी 2.35 वाजता एलव्हीएम-एम4 रॉकेट चांद्रयान-3 ला घेऊन अवकाशात झेपावेल.
Get ready Chandrayaan 3 ❤️ On 13th July.? So excited ?#Chandrayaan3 #ISRO pic.twitter.com/MjEt2Vv2xN
— Omkar?? (@omkarl007) July 5, 2023
Published On - Jul 14,2023 8:09 AM