Chandrayaan 3 Moon Landing LIVE Updates | चांद्रयान-3 चं लँडिंग 23 ऑगस्ट ऐवजी 27 ऑगस्टला होणार? इस्त्रोचे वैज्ञानिक बघा नेमकं काय म्हणाले
Chandrayaan 3 Isro moon landing mission Live Updates | भारताची चांद्रयान-3 मोहीम निर्णायक टप्प्यावर आहे. 14 जुलैला सुरु झालेलं मिशनमध्ये येत्या 23 ऑगस्टला ऐतिहासिक पान जोडलं जाईल. या मिशनच्या सगळ्या अपडेट इथे जाणून घ्या.
नवी दिल्ली : भारताच्या अवकाश संशोधनाच्या दृष्टीने पुढचे दोन दिवस खूप महत्त्वाचे आहेत. सगळ्या देशवासियांच्या नजरा चंद्राकडे लागल्या आहेत. भारताची महत्त्वकांक्षी चांद्रयान-3 मोहीम (chandrayaan 3 live updates today) अंतिम टप्प्यात आहे. 23 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी भारताच स्पेसक्राफ्ट चांद्रभूमीला स्पर्श करेल. रविवारी मध्यरात्री 2 वाजता चांद्रयान-3 वर शेवटची डिबूस्टिंगची प्रक्रिया पार पडली. डिबूस्टिंगमध्ये यानाची चंद्राच्या दिशेने झेपावण्याची गती यशस्वीरित्या कमी करण्यात आली.
रशियाची लूना-25 मोहिम फसल्यामुळे संपूर्ण जगाच लक्ष (chandrayaan 3 live updates) चांद्रयान-3 कडे लागलं आहे. रशियन स्पेस एजन्सीचा शनिवारी लूना-25 बरोबर संपर्क तुटला. रविवारी रशियान अवकाश संशोधन संस्थेने लूना-25 च चंद्रावर क्रॅश लँडिंग झाल्याच जाहीर केलं. त्यामुळे आता सगळ्या जगाच लक्ष चांद्रयान-3 मिशनकडे आहे. भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड करणारा जगातील पहिला देश ठरु शकतो.
चांद्रयान-3 आता 25 किलोमीटर x 134 किलोमीटरच्या (live location of chandrayaan 3) कक्षेत भ्रमण करत आहे. चांद्रयान-3 मधील उपकरणं सौरऊर्जेवर चालणारी आहेत. त्यामुळे चंद्रावर सूर्योदयानंतरच लँडिंग कराव लागेल.
LIVE NEWS & UPDATES
-
Chandrayaan-3 Update | लँडिंगच्या दिवशी दोन मोठ्या स्पेस एजन्सी असणार इस्रोच्या मदतीला
प्रत्यक्ष लँडिंगच्या दिवशी खासकरुन शेवटच्या 15 मिनिटात जास्त काळजी घ्यावी लागेल. त्यावेळी दोन मोठ्या स्पेस एजन्सी इस्रोच्या मदतीला असतील. वाचा सविस्तर…
-
Chandrayaan-3 Live | चंद्रयान 23 ऑगस्टला चंद्रावर लँड होणार की नाही? इस्त्रोच्या वैज्ञानिकांची महत्त्वाची प्रतिक्रिया
अहमदाबाद | “चंद्रयानाला चंद्रावर उतरवण्याच्या दोन तास आधी आम्ही लँडर आणि चंद्राच्या परिस्थितीचा अभ्यास करु. चंद्रावरील वातावरणाचा अभ्यास करु. त्यानंतर लँडरला चंद्रावर लँड करण्याचा निर्णय घेऊ. आम्हाला वाटलं की, लँडर आणि चंद्राची स्थिती लँडरसाठी योग्य नाही तर आम्ही 27 ऑगस्टपर्यंत सर्व प्रक्रिया पुढे ढकलू. पण त्याआधी 23 ऑगस्टला आम्ही लँडरला चंद्रावर लँड करण्यासाठी प्रयत्न करु”, असं इस्त्रोचे शास्त्रज्ञ निलेश एम. देसाई यांनी सांगितलं.
#WATCH चंद्रयान के चांद पर उतरने से 2 घंटे पहले हम लैंडर और चांद की स्थिति का जायजा लेंगे और उसके बाद लैंडर के चांद पर लैंड कराने पर फैसला लेंगे। अगर हमें लगेगा की लैंडर या चांद की स्थिति उतरने के लिए ठीक नहीं है तो हम इसे 27 अगस्त तक के लिए आगे बढ़ा देंगे। हम 23 अगस्त को लैंडर… pic.twitter.com/iS2MKnUkVY
— ANI_HindiNews (@AHindinews) August 21, 2023
-
-
Chandrayaan-3 Update | मागच्या 70 वर्षात चंद्रावर एकूण किती मिशन्स झाले?
मागच्या 70 वर्षात एकूण 111 चांद्र मोहीमा करण्यात आल्या. त्यात किती मिशन्समध्ये यश मिळालं? किती मोहिमा फेल झाल्या? किती मिशन्समध्ये आंशिक यश मिळालं? वाचा सविस्तर….
-
Chandrayaan 3 Live | चांद्रयान-3 चा चांद्रयान-2 मिशनमधील उपकरणाशी संपर्क प्रस्थापित
चांद्रयान-3 मधील विक्रम लँडरचा ऑर्बिटरशी संपर्क प्रस्थापित झाला आहे. चांद्रयान-2 मिशनमध्ये ऑर्बिटरचा वापर करण्यात आला होता. मागच्या चार वर्षांपासून ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत भ्रमण करत आहे,
-
Chandrayaan 3 | ‘चांद्रयान 3’ मिशनची खिल्ली उडवल्याने ‘सिंघम’ फेम अभिनेता ट्रोल
अभिनेते प्रकाश राज हे नेहमी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे तर कधी ट्विट्समुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर येतात. सत्ताधारी पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात ते अनेकदा ट्विट करत असतात. रविवारी त्यांनी असंच एक ट्विट केलं असून त्यामुळे नेटकरी त्यांच्यावर खूप नाराज झाले आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी इस्रोच्या चांद्रयान – 3 मिशनची खिल्ली उडवल्याचा आरोप नेटकरी करत आहेत, वाचा सविस्तर..
-
-
Chandrayaan 3 Live | सॉफ्ट लँडिंगच्यावेळी पंतप्रधान मोदी कुठे असणार?
23 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान 3 च चंद्रावर सॉफ्ट लँडिंग होईल. त्यावेळी मोदी कुठे असतील? हा अनेकांच्या मनात प्रश्न आहे. त्याचं उत्तर इथे वाचा.
-
Chandrayaan 3 LIVE updates | चंद्रावरील दूरवरच्या अंतरावरचे चांद्रयान 3 ने टिपलेले काही खास PHOTOS
चांद्रयान 3 ने चांद्रभूमीचे काही फोटो टिपले आहेत. इस्रोने आज हे फोटो रिलीज केले. इथे क्लिक करुन हे सर्व फोटो पाहू शकता.
-
Chandrayaan 3 LIVE updates | चांद्रयान -3 मिशनबद्दल इस्रोच्या माजी प्रमुखांकडून महत्त्वाची माहिती
मागच्यावेळी लँडिंग प्रोसेसनंतर आम्ही सर्व डाटाची तपासणी केली. त्या आधारावर आम्ही चांद्रयान-3 मिशनमध्ये सुधारणा केल्या आहेत. चांद्रयान-2 मशिन शेवटच्या टप्प्यात फेल झालं होतं. आम्ही चांद्रयान-3 मध्ये अजून बरच काही केलं आहे. यावेळी लँडिंग एरियाची जागा वाढवली आहे असं सिवन यांनी सांगितलं.
-
Chandrayaan 3 LIVE updates | चांद्रयान 3 मधील लँडर आणि रोव्हरच्या नावाची गोष्ट
– चांद्रयान-3 मधील लँडरला विक्रम नाव देण्यात आलं आहे. डॉ. विक्रम साराभाई यांचं नाव लँडरला दिलं आहे. भारतीय अवकाश संशोधनाचे जनक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.
– रोबोटिक गाडीला ‘प्रग्यान’ नाव दिलं आहे. हा संस्कृत शब्द आहे. या सहाचाकी गाडीमध्ये विविध उपकरणं सामावलेली आहेत. चंद्राच्या पुष्ठभागावरील महत्त्वपूर्ण माहिती या रोव्हरमुळे समजणार आहे.
-
Chandrayaan 3 live updates | रात्रीच्या अंधारात आपण लँडिंग का करु शकत नाही?
रशियाच लूना-25 क्रॅश झालं. पण त्यांना चंद्रावर सॉफ्ट लँडिंगसाठी 23 ऑगस्टपर्यंतची प्रतिक्षा करण्याची गरज नव्हती. पण तेच चांद्रयान-3 ला 23 ऑगस्टशिवाय पर्याय नाही, असं का? वाचा सविस्तर….
-
Luna-25 Crash | पुतिन यांना लूना-25 मिशनबद्दल काय कल्पना दिली होती?
जून महिन्यात रशियन अवकाश संशोधन संस्था रॉसकॉसमॉसचे प्रमुख युरी बोरीसोव्ह यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी मिशनच्या यशाबद्दल काय सांगितलेलं? वाचा सविस्तर….
-
Chandrayaan 3 Live | भारत चंद्रावर, पण पाकिस्तानची SUPARCO कुठे?
भारताच्या आधी पाकिस्तानचा स्पेस कार्यक्रम सुरु झाला होता. 1961साली पाकिस्तानने SUPARCO स्पेस एजन्सीची स्थापना केली होती. पाकिस्तानच्या स्पेस कार्यक्रमाची सद्या स्थिती काय आहे? ते जाणून घ्या. वाचा सविस्तर….
-
Chandrayaan 3 Live | रशियाच स्वप्न भंगल, जगाच लक्ष भारतावर
रशियाच चंद्रावर सॉफ्ट लँडिंगच स्वप्न भंग पावलं. लूना-25 या त्यांच्या स्पेसक्राफ्टच चंद्रावर क्रॅश लँडिंग झालं. भारताच्या चांद्रयान-3 आधी लूना-25 च चंद्रावर लँडिंग होणार होतं. पण या मिशनमध्ये काय चूकलं ते जाणून घ्या. वाचा सविस्तर….
-
Chandrayaan 3 Live | इस्रोकडून चांद्रयान-3 मिशनबद्दल महत्त्वाची अपडेट
चांद्रयान-3 23 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रावर लँड करेल. तुमचा पाठिंबा, शुभेच्छांसाठी धन्यवाद असं इस्रोने आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.
Chandrayaan-3 Mission:
🇮🇳Chandrayaan-3 is set to land on the moon 🌖on August 23, 2023, around 18:04 Hrs. IST.
Thanks for the wishes and positivity!
Let’s continue experiencing the journey together as the action unfolds LIVE at: ISRO Website https://t.co/osrHMk7MZL YouTube… pic.twitter.com/zyu1sdVpoE
— ISRO (@isro) August 20, 2023
-
Chandrayaan 3 Mission | इस्रोकडून चांद्रभूमीवरील नवीन फोटो रिलीज
इस्रोने चांद्रभूमीवरील नवीन फोटो प्रसिद्ध केले आहेत. चंद्रावरील लांब अंतरवरचे, दूर अंतरावरचे हे फोटो आहेत. लँडरवरील हझार्ड डिटेक्शन अँड एव्हॉयडन्स कॅमेऱ्याने हे फोटो काढले आहेत. चंद्रावर सुरक्षित लँडिंगसाठी हा कॅमेरा मदत करणार आहे.
Chandrayaan-3 Mission:
Here are the images of Lunar far side area captured by the Lander Hazard Detection and Avoidance Camera (LHDAC).
This camera that assists in locating a safe landing area — without boulders or deep trenches — during the descent is developed by ISRO… pic.twitter.com/rwWhrNFhHB
— ISRO (@isro) August 21, 2023
Published On - Aug 22,2023 7:00 AM