Chandrayaan 3 successfully land on moon LIVE : चांद्रयान-3 लॅंडींग लाईव्ह स्ट्रीमिंगने युट्यूबवर रचला नवा इतिहास
Chandrayaan 3 Isro successfully land on moon LIVE udpates : रशियाला जे जमलं नाही, ते आपण करुन दाखवलय. भारताच्या चांद्रयान-3 ने यशस्वी सॉफ्ट लँडिग केलं. भारताच्या चांद्र मोहिमेकडे जगाच लक्ष लागलं होतं.
बंगळुरु : भारतीयांसाठी आज खूप महत्त्वाचा दिवस आहे. सर्व देशवासियांच्या नजरा चंद्राकडे लागल्या आहेत. चांद्रयान-3 च चांद्रभूमीवर यशस्वी लँडिंग (Chandrayaan 3 Landing LIVE) व्हाव अशी तमाम भारतीयांची इच्छा आहे. भारताकडे आज नवीन इतिहास रचण्याची संधी आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ लँडिंग करणारा भारत जगातील पहिला देश ठरु शकतो. याआधी रशिया, अमेरिका आणि चीन या देशांनी यशस्वी चंद्र मोहिमा केल्या आहेत. चंद्रावर सॉफ्ट लँडिंगमध्ये हे देश यशस्वी ठरले आहेत. आज भारत अशी कामगिरी करणारा जगातील चौथा देश ठरु शकतो.
2019 साली चांद्रयान-2 मिशनमध्ये अगदी शेवटच्या क्षणी अपयश आलं होतं. त्यातून धडा घेत चांद्रयान-3 ची निर्मिती करण्यात आली आहे. यावेळी क्रॅश लँडिंग होऊ नये, म्हणून पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. इस्रोने यावेळी चांद्रयान-3 च्या लँडर डिझाझनमध्ये अनेक बदल केले आहेत. चंद्रावर यशस्वी पाऊल ठेवण्याच तमाम भारतीयांच स्वप्न आज साकार होईल. त्या क्षणाकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. चंद्राच्या पुष्ठभागापासून (Live location Chandrayaan 3) 30 किमी अंतरावरुन लँडिंग प्रोसेस सुरु होईल.
LIVE NEWS & UPDATES
-
Chandrayaan-3 update | नेटीझन्स न्यूयॉर्क टाइम्सची उडवतायत खिल्ली
9 वर्षापूर्वीचा तो अपमान आजही आम्ही विसरलेलो नाही. न्यूयॉर्क टाइम्सने त्यावेळी भारताच्या अवकाश कार्यक्रमाबद्दल काय म्हटलेलं, वाचा सविस्तर….
-
Chandrayaan 3 Moon Landing LIVE : जयशंकर यांनी शेअर केला मोदींचा एक खास फोटो
आज जगभरात भारताच्या चांद्रयान-3 च्या यशाची चर्चा आहे. जगभरातील अनेक वर्तमानपत्रांनी याला ठळक प्रसिद्धी दिलीय. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी जोहान्सबर्ग येथे सुरु असलेल्या ब्रिक्स परिषेदतील पंतप्रधान मोदींचा एक फोटो शेअर केलाय.
As India’s Chandrayaan-3 mission success makes headlines around the world, EAM Dr S Jaishankar shares a picture of PM Modi at the BRICS summit in Johannesburg pic.twitter.com/UYUxQTvBf6
— ANI (@ANI) August 24, 2023
-
-
Chandrayaan 3 Moon Landing LIVE : चांद्रयान-3 लॅंडींग लाईव्ह स्ट्रीमिंगने मोडले सर्व रेकॉर्ड
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लॅंडींग करणारा भारत पहीला देश बनला. दुसरीकडे इस्रोच्या लाईव्ह स्ट्रीमिंग लिंकने देखील युट्यूबवर नवा इतिहास रचला आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातून जेथे कुठे भारतीय राहातात तेथून त्यांनी हा सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवला. वाचा सविस्तर….
-
Chandrayaan 3 Moon Landing LIVE : चांद्रयान 3 च्या यशानंतर ‘या’ कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी
चांद्रयान-3 च्या यशस्वी सॉफ्ट लँडिंगनंतर एयरोस्पेस आणि डिफेन्स क्षेत्राशी संबंधित कंपन्यांचे शेअर्स तेजीत आहेत. सेंटम इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअर्समध्ये 19.69 टक्के वाढ झालीय. पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नोलॉजी लिमिटेडच्या शेअर्समध्ये 17.30 टक्के वाढ दिसून येतेय. MTAR टेक्नोलॉजीच्या शेअरमध्ये 10.32 टक्के वाढ झालीयय HAL च्या स्टॉकमध्येही 2.69 टक्के वाढ दिसतेय.
-
Isro chandrayaan 3 live : प्रज्ञान रोव्हर चंद्रावर पुढचे 14 दिवस काय संशोधन करणार ?
प्रज्ञान रोव्हर विक्रम लँडरच्या बाहेर आला असून त्याने संशोधन कार्य सुरु केलं आहे. चंद्रावर पुढचे 14 दिवस सूर्यप्रकाश असेपर्यंत विक्रम आणि प्रज्ञान नेमकं काय संशोधन करणार? ते वाचा सविस्तर…..
-
-
Isro chandrayaan 3 live : सोनिया गांधींकडून इस्रोच्या प्रमुखांना पत्र
काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांना पत्र लिहून चांद्रयान-3 च्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.
Congress Parliamentary Party Chairperson Sonia Gandhi writes to ISRO chief S Somanath on Chandrayaan-3 success pic.twitter.com/kwYyAD6ovW
— ANI (@ANI) August 24, 2023
-
Chandrayaan 3 Moon Landing LIVE : भारताच चंद्रावर भ्रमण सुरु
विक्रम लँडर चंद्रावर उतरल्यानंतर आता इस्रोने महत्त्वाची अपडेट दिली आहे. प्रज्ञान रोव्हर विक्रम लँडरमधून बाहेर आला आहे. रोव्हरने चंद्रावर भ्रमण सुरु केलय. मेड इन इंडिया, मेड फॉर मून हे इस्रोने आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे. भारताने चांद्रभूमीवर भ्रमण सुरु केलय असं इस्रोने टि्वटमध्ये म्हटलं आहे.
Chandrayaan-3 Mission:
Chandrayaan-3 ROVER: Made in India 🇮🇳 Made for the MOON🌖!
The Ch-3 Rover ramped down from the Lander and India took a walk on the moon !
More updates soon.#Chandrayaan_3#Ch3
— ISRO (@isro) August 24, 2023
-
Chandrayaan 3 Moon Landing LIVE : प्रग्यान रोव्हरने चंद्रावर सुरु केलं संशोधन
चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगनंतर प्रज्ञान रोव्हर विक्रम लँडरमधून बाहेर आला आहे. प्रज्ञान रोव्हरने चंद्रावरील संशोधनाच आपलं काम सुरु केलं आहे. बुधवारी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी इस्रोच्या नियोजनाप्रमाणे विक्रम लँडरने चांद्रभूमीला स्पर्श केला. हा तमाम देशवासियांसाठी अभिमानाचा क्षण होतं. यशस्वी सॉफ्ट लँडिंगनंतर काही तासांनी प्रज्ञान रोव्हर विक्रम लँडरमधून बाहेर आला.
Chandrayaan-3 Mission: ‘India🇮🇳, I reached my destination and you too!’ : Chandrayaan-3
Chandrayaan-3 has successfully soft-landed on the moon 🌖!.
Congratulations, India🇮🇳!#Chandrayaan_3#Ch3
— ISRO (@isro) August 23, 2023
-
Chandrayaan 3 Moon Landing LIVE : चंदावर पोहोचल्यानंतर चांद्रयान-3 कडून पहिला संदेश
‘भारतवासियांनो मी माझ्या ठिकाणी पोहोचलो आणि तुम्ही सुद्धा’, चांद्रयान-3 कडून पहिला संदेश
‘India, I reached my destination and you too!’ : Chandrayaan-3 pic.twitter.com/Esl858RY6X
— ANI (@ANI) August 23, 2023
-
Chandrayaan 3 Moon Landing LIVE : चंद्र मामा एक टूर के हैं
आपण सगळे चंद्राला मामा म्हणतो. चंद्र खूप लांब आहे, असं म्हणायचो. पण आता देशातील मूल म्हणतील चंद्र मामा एक टूर के हैं असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
-
Chandrayaan 3 Moon Landing LIVE : माझ्याकडून टीम इस्रोला मनापासून शुभेच्छा – पीएम मोदी
“प्रत्येक घरात उत्सव सुरु झालाय. ह्दयापासून मी माझ्या देशवासियांसोबत जोडलेलो आहे. मी टीम इस्रो, सगळ्या वैज्ञानिकांना मनापासून शुभेच्छा देतो” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
-
Chandrayaan 3 Moon Landing LIVE : ‘हा अविस्मरणीय क्षण’ – पंतप्रधान मोदी
“हा क्षण अविस्मरणीय आहे. हा क्षण शंखनादाच आहे. नव्या भारताच्या जयघोषणाचा क्षण आहे. अडचणींचा महासागर पार करण्याचा क्षण आहे. हा 140 कोटी देशवासियांच्या सामर्थ्याचा आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
-
Chandrayaan 3 Moon Landing LIVE : भारताच यशस्वी लँडिंग
भारताच्या चांद्रयान-3 ने चांद्रभूमीला यशस्वी स्पर्श केला आहे. वेल डन इस्रो. तमाम भारतीयांच स्वप्न साकार झालय.
-
Chandrayaan 3 Moon Landing LIVE : हॉरिझोन्टल व्हेलोसिटी कमी
लँडरची हॉरिझोन्टल व्हेलोसिटी कमी होत आहे. सर्व सुरुळीत सुरु आहे. सध्या चांद्रभूमीपासून 22 किलोमीटर लँडर आहे.
-
Chandrayaan 3 Moon Landing LIVE : ठरवल्यानुसार सुरुवात
पावर डिसेंट स्टार्टमध्ये ठरवल्यानुसार सर्व सुरु आहे. अजूनपर्यंत सगळ व्यवस्थित आहे. ऑटोमोडमध्ये विक्रम लँडरने काम चालू केलय. ठरवल्यानुसार यानाची गती कमी होत आहे.
-
Chandrayaan 3 Moon Landing LIVE : शेवटच्या 15 मिनिटांचा टेरर स्टार्ट
शेवटच्या 15 मिनिटांचा थरार सुरु झाला आहे. पावर डिसेंट सुरु झालं आहे. पहिला रफ ब्रेकिंग फेज आहे. चांद्रयान-3 लँडिंगच्या जागेपासून 30 किमी अंतरावर असताना हा फेज सुरु झाला आहे.
-
Chandrayaan 3 Moon Landing LIVE : लँडिंगच्या शेवटच्या 15 मिनिटातील चार फेज काय असतील?
पहिला रफ ब्रेकिंग फेज आहे. चांद्रयान-3 लँडिंगच्या जागेपासून 30 किमी अंतरावर असताना हा फेज सुरु होईल.
एटीट्यूड होल्ड हा दुसरा फेज असेल. लँडिंग साइटपासून 32 किलोमीटर लांब यान हॉरिजॉन्टल मोडमध्ये असेल आणि 7.4 किमी उंचीवर हा फेज सुरु होईल.
फाइन ब्रेकिंग हा तिसरा फेज असेल. लँडिंग साइटपासून 28.52 किलोमीटर दूर आणि 6.8 किमी उंचीवर हा फेज सुरु होईल. त्यावेळी सुद्धा यान हॉरिजॉन्टल म्हणजे आडवं असेल.
टर्मिनल डिसेंट हा चौथा फेज असेल. लँडिंग साइटपासून 800 ते 1300 मीटर उंचीवर हा फेज सुरु होईल. या फेजमध्ये चांद्रयान लँडिंग साइटवर उतरेल.
-
Chandrayaan 3 Moon Landing LIVE : मिशन लाइव्ह पाहण्यासाठी TV9 मराठीला पसंती
भारताची चांद्रयान 3 मोहीम लाईव्ह पाहण्यासाठी लोकांनी दिली tv 9 मराठीला पसंती. डोंबिवली शिवसेना शाखेत मोठी स्क्रीन लावत अंतिम टप्पा पाहण्यासाठी शिवसैनिक व नागरिकानी केली मोठी गर्दी. भारत माता की जय, वंदे मातरम आशा घोषणा देत शास्त्रज्ञांनी केलेल्या कामगिरीची कौतुक केले जात आहे.
-
Chandrayaan 3 Moon Landing LIVE : ISRO कडून लाइव्ह कव्हरेज सुरु
इस्रोकडून चांद्रयान-3 च्या लँडिंगच लाइव्ह कव्हरेज सुरु झालं आहे. 5 वाजून 44 मिनिटांनी लँडिंगची प्रक्रिया सुरु होईल. 6 वाजून 4 मिनिटांनी विक्रम लँडर चांद्रभूमीला स्पर्श करेल.
-
Chandrayaan 3 Moon Landing LIVE : ISRO कडून लँडरला अंतिम कमांड
ISRO कडून लँडरला अंतिम कमांड देण्यात आली आहे. चांद्रयान-3 आजच लँडिंग होणार हे स्पष्ट आहे. अंतिम कमांड दिल्यानंतर आता टायमिंगमध्ये कोणातही बदल करता येणार नाही.
-
Isro chandrayaan 3 live : पावर डिसेंट कुठून सुरु होणार?
चांद्रयान-3 ठरल्यानुसार मिशनच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. 30 किलोमीटर उंचीवरुन पावर डीसेंट स्टार्ट होईल, ज्याला रफ ब्रेकिंग फेस म्हटलं जातं. तिथून लँडर चंद्राच्या पुष्ठभागापासून 7.4 किमी उंचीवर पोहोचेल.
-
Isro chandrayaan 3 live : चांद्रयान-3 च्या यशासाठी श्रीनगरच्या मशिदीत नमाज अदा
भारताच चांद्रयान-3 काहीवेळात चंद्रावर पाऊल ठेवणार आहे. चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगसाठी संपूर्ण भारतात प्रार्थना सुरु आहेत. चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगसाठी जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील मशिदीत नमाज अदा करण्यात आली.
#WATCH जम्मू-कश्मीर: चंद्रयान-3 की सफल चंद्र लैंडिंग के लिए लोगों ने श्रीनगर के हजरतबल दरगाह में नमाज़ अदा की। pic.twitter.com/I8yD9R2NfS
— ANI_HindiNews (@AHindinews) August 23, 2023
-
Chandrayaan 3 Moon Landing LIVE : लँडिंगवेळी जगातील दोन मोठ्या स्पेस एजन्सी इस्रोला मदत करणार
चांद्रयान-3 मिशनची सुरुवात 14 जुलैला झाली होती. त्या दिवसापासून जगातील दोन अव्वल अवकाश संशोधन संस्था नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) इस्रोला मदत करत आहेत. आज मुख्य लँडिंगच्यावेळी सुद्धा या दोन संस्था मदत करतील. वाचा सविस्तर…
-
Isro chandrayaan 3 live : चांद्रयान-3 मिशनमध्ये लँडिंग एरिया किती आहे?
चांद्रयान-2 मध्ये 500×500 चौरस मीटरच्या लँडिंग एरियामध्ये यान जास्त गतीने खाली आलं. स्पेसक्राफ्ट उतरण्यासाठी त्यामनाने ही कमी जागा होती. चांद्रयान-3 मिशनमध्ये चंद्रावरील लँडिंग एरिया वाढवण्यात आला आहे. 4 किमी x 2.5 किती असा एरिया आहे.
-
Chandrayaan 3 Moon Landing LIVE : इस्रो फायनल कमांड किती वाजता देणार?
इस्रोच्या मिशन ऑपरेशन सेंटरमधून अपडेट आलीय. लँडिंगसाठी फायनल कमांडची तयारी पूर्ण झालीय. संध्याकाळी 5 वाजून 44 मिनिटांनी कमांड दिली जाईल. त्यानंतर ऑटोमेटिक लँडिंग सीक्वेंस सुरु होईल. संध्याकाळी 5.20 मिनिटांनी लाइव्ह टेलिकास्ट सुरु होईल.
-
Isro chandrayaan 3 live : चांद्रयान-3 च्या यशासाठी मुस्लिमांकडून नमाज अदा
चांद्रयान-3 च्या यशासाठी हिंदू मंदिरात प्रार्थना सुरु आहेत. त्याचवेळी मुंबईत मालाडमध्ये मुस्लिम बांधवांनी चंद्रायान-3 च्या यशासाठी नमाज अदा केली.
-
Isro chandrayaan 3 live : लँडिंग दरम्यान इस्रो स्पीड कसा मोजणार?
चंद्राच्याजवळ 10 मीटर पर्यंत पोहोचल्यानंतर चांद्रयानचा स्पीड 1.68 मीटर प्रति सेकंद असेल. लँडिंग दरम्यान स्पीड मोजण्यासाठी लेजर डॉपलर वेलोसीमीटर बसवण्यात आला आहे. सॉफ्ट लँडिंग यशस्वी करण्यासाठी इस्रोने चांद्रयानच्या लँडिंग अल्गोरिदममध्ये बदल केला आहे.
-
Chandrayaan 3 मिशनबद्दल अमिताभ बच्चन यांचं लक्षवेधी वक्तव्य, म्हणाले, ‘चांदोमामाच्या घरी…’
भारताचं चांद्रयान-3 अंतिम टप्प्यात असल्यामुळे मिशन पूर्ण व्हावं म्हणून प्रत्येक भारतीय प्रार्थना करत आहे. समान्य जनतेपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाचं लक्ष चांद्रयान-3 कडे आहे. अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.. वाचा सविस्तर
-
Isro chandrayaan 3 live : लँडिंगआधी इस्रोकडून महत्त्वाच टि्वट
5.44 ला अपेक्षित पॉइंटला लँडर मॉड्युल पोहोचेल याची प्रतिक्षा आहे. ALS कमांड दिली जाईल. त्यानंतर लँडर मॉड्युल चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण सुरु करेल. या मिशनच लाइव्ह टेलिकास्ट 5.20 मिनिटांनी सुरु होईल.
Chandrayaan-3 Mission: All set to initiate the Automatic Landing Sequence (ALS). Awaiting the arrival of Lander Module (LM) at the designated point, around 17:44 Hrs. IST.
Upon receiving the ALS command, the LM activates the throttleable engines for powered descent. The… pic.twitter.com/x59DskcKUV
— ISRO (@isro) August 23, 2023
-
Isro chandrayaan 3 live : चांद्रयान-2 मध्ये काय चूक झालेली?
“चांद्रयान-2 मिशनमधील लँडरला एकूण पाच इंजिन होते. चंद्रावर उतरताना यानाची गती कमी करावी लागते. त्यासाठी या इंजिनचा वापर करण्यात आला. पण त्यातून यानाला अपेक्षेपेक्षा जास्त धक्के एकप्रकारचे झटके बसले. त्यामुळे अनेक चूका झाल्या. योग्य मार्ग पकडण्यासाठी यानाने जास्त फेऱ्या मारल्या”
-
Chandrayaan 3 Moon Landing LIVE : विक्रम साराभाई यांच्या मुलाची प्रतिक्रिया
“आज खूप मोठा दिवस आहे. फक्त भारतीयांसाठीच नाही, तर पृथ्वीवरील सर्वांसाठी ही सुंदर गोष्ट आहे. आपण चांद्रयान-3 चंद्रावर पाठवताना इतरांपेक्षा वेगळ्या मार्गाने गेलो. सायन्स आणि इंजिनिअरींगमध्ये आपण आपल्या चुकांमधून शिकतो. मानवतेसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण आतापर्यंत कोणीही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरु शकलेलं नाही” असं कार्तिकेय साराभाई यांनी म्हटलं आहे. भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे संस्थापक विक्रम साराभाई यांचे ते सुपूत्र आहेत.
-
Isro chandrayaan 3 live : चांद्रयानच्या यशासाठी शिवसेनेची आरती
चांद्रयान मोहीम यशस्वी व्हावी यासाठी शिवसेनेच्या वतीने आरती करण्यात आली. महाराष्ट्रातील पाचवं शक्तीपीठ एकवीरा देवी मंदिरात महाआरती करण्यात आली. शिवसेना महानगरप्रमुख सतीश महाले यांनी प्रमुख कार्यकर्त्यांसह देवीच्या मंदिरात आरती केली.
-
Chandrayaan 3 Moon Landing LIVE : चांद्र मिशनचा सर्वसामान्यांना फायदा काय?
चांद्र मिशनचा सर्वसामान्यांचा काय फायदा? चंद्रावर यशस्वी लँडिंग झाल्यास तुम्हाला-आम्हाला काय फायदा होईल? ते जाणून घ्या. वाचा सविस्तर…
-
Isro chandrayaan 3 live : इस्रोची चंद्रावर नवीन कासव छाप खेळी, काय आहे हे?
रशियाचं लूना-25 स्पेसक्राफ्ट सशासारख धावत होतं. लवकरच पोहोचण्याच्या घाईत हे यान क्रॅश झालं. यामधून धडा घेत इस्रोने एक कासवछाप चाल खेळली आहे. काय ती चाल वाचा सविस्तर.
-
Isro chandrayaan 3 live : दक्षिण ध्रुवावर लँडिंग कठीण का?
सूर्य नेहमी क्षितिजावर असतो. सावली खूप लांबपर्यंत पडते. सूर्यप्रकाशही पुष्ठभागावर स्पष्ट दिसत नाही. लँडिंगच्यावेळी भरपूर धूळ उडते. त्यामुळे सेंसर आणि थ्रस्टर खराब होण्याची भिती. कॅमेऱ्याच्या लेन्सवर धूळ जमा होऊ शकते.
-
Chandrayaan 3 बद्दल अभिनेत्याची वादग्रस्त पोस्ट, भडकलेल्या हिंदू संघटनांनी उचललं मोठं पाऊल
भारताचं चांद्रयान-3 अंतिम टप्प्यात असल्यामुळे मिशन पूर्ण व्हावं म्हणून प्रत्येक भारतीय प्रार्थना करत आहे. पण एका प्रसिद्ध अभिनेत्याने मात्र भारताचं चांद्रयान-3 बद्दल सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे…. वाचा सविस्तर
-
Chandrayaan 3 Moon Landing LIVE : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर काय आहे?
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मोठे डोंगर आणि खड्डे आहेत. सूर्याची किरणं तिरपी पडतात. बहुतांश भागामध्ये अंधार असतो. अनेक खड्डे अब्जावधी वर्षापासून अंधारात आहेत. अंधारामुळे हे खड्डे खूप थंड आहेत. या भागात तापमान -203 डिग्री सेल्सियस आहे. इथे पाणी आणि खनिज सापडण्याची शक्यता आहे.
-
Isro chandrayaan 3 live : इस्रोचे माजी चेअरमन लँडिंगआधी काय म्हणाले?
“आज प्रत्येकाला चांद्रयान-3 च्या लँडिंगची उत्सुक्ता आहे. भारतीय अवकाश संशोधनाच्या दृष्टीने हा मैलाचा दगड ठरेल. लँडिंगच्या प्रोसेसमधील ती शेवटची 20 मिनिट मिशनच्या इतिहासातील सर्वात आव्हानात्मक असतील” असं इस्रोचे माजी चेअरमन जी. माधवन नायर यांनी सांगितलं.
#WATCH | Chandrayaan-3 mission | Former ISRO Chairman G Madhavan Nair says, “…Everybody is anxiously looking forward to this great event. As far as the Indian space program is concerned, it is going to be the most significant milestone for planetary exploration…The last 20… pic.twitter.com/OiBuUrfQOn
— ANI (@ANI) August 23, 2023
-
Isro 2023 mission live | चांद्रयान मोहिमेच्या यशाबाबत ज्योतिषशास्त्राचा अंदाज काय?
भारताच्या चंद्रयान मोहिमेकडे ज्योतिषशास्त्राचं लक्ष लागून आहे. 14 जुलैला चंद्राकडे झेपावलेलं चंद्रयान 3 यशस्वीरित्या पृष्ठभागावर उतरणार की नाही? याबाबत ज्योतिषशास्त्रात चर्चा सुरु आहे. ज्योतिषशास्त्राचा अंदाज काय? वाचा सविस्तर….
-
Chandrayaan 3 Landing LIVE | चांद्रयान मोहीमेच्या यशसाठी नाशिकमध्ये महापूजा
चांद्रयान मोहीमेच्या यशसाठी नाशिकमध्ये महापूजा करण्यात आली. शिवसेनेच्या वतीने नाशिकच्या चांदीच्या गणपती मंदिरात विशेष पूजा करण्यात आली. चांद्रयान मोहीम यशस्वी होण्यासाठी गणपती बाप्पाला साकडं.
#WATCH | Madhya Pradesh | A large number of devotees arrive at Bageshwar Dham in Chhatarpur, to offer special prayers for the successful lunar landing of Chandrayaan-3.
A devotee, Rajiv Sharma says, “Thousands of devotees have come here to offer prayers…”
Another devotee,… pic.twitter.com/qOGRodloBO
— ANI (@ANI) August 23, 2023
-
Chandrayaan 3 Live | चांद्रयानच्या यशस्वी लँडिंगसाठी अमेरिकेत प्रार्थना
चांद्रयान-3 च चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग व्हाव, यासाठी अमेरिकेत न्यू जर्सी येथील ओम श्री साई बालाजी मंदिर आणि कल्चरल सेंटर येथे प्रार्थना करण्यात आली.
#WATCH | US: Prayers being offered at Om Sri Sai Balaji Temple and Cultural Center in Monroe, New Jersey for the successful landing of #Chandrayaan3Mission
Members of the Indian-American community say, “It’s a proud moment for all of our Indian community. Hopefully, everything… pic.twitter.com/clSH4HBqv8
— ANI (@ANI) August 23, 2023
-
Chandrayaan 3 Live | चांद्रयानच्या यशस्वी लँडिंगसाठी प्रार्थना
चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगसाठी देशभरात प्रार्थना सुरु आहेत.
Prayers across world and in India for successful moon landing of Chandrayaan-3
Read @ANI Story | https://t.co/RXeTZBvasg#Chandrayaan3 #India #Moon #prayers pic.twitter.com/iLfu8viHnG
— ANI Digital (@ani_digital) August 23, 2023
-
Chandrayaan 3 Live | लँडरने लँडिंगसाठी दुसरी जागा निवडली, तर वेळ कितीने वाढेल?
चंद्राच्या पुष्ठभागापासून 30 किमी अंतरावरुन लँडिंगची प्रोसेस सुरु होईल. त्यावेळी यानाची गती कशी नियंत्रित करणार? हॉरिझोंटल ते व्हर्टिकल म्हणजे काय? लँडिंगसाठी दुसरी जागा निवडली, तर वेळ किती वाढेल? या बद्दल जाणून घ्या सविस्तर. इथे वाचा
-
Chandrayaan 3 Live | चंद्रयानच्या यशस्वी लँडिंगसाठी दगडूशेठ गणपतीला महाअभिषेक
भारताची चंद्रयान मोहीम यशस्वी व्हावी या मोहिमेत भारताच्या शास्त्रज्ञाना यश मिळावे, यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने मंदिरात आज पहाटे भालचंद्र गणेशास अभिषेक करण्यात आला. यासाठी दूध दही विविध फळांचे रस सुकामेवा आदींचा वापर करण्यात आला आहे. आज संध्याकाळी भारताचे चांद्रयान चंद्रावर उतरणार आहे. त्याचे लँडिंग सुरक्षित व्हावे यासाठी हा अभिषेक करण्यात आला याशिवाय गणपती बाप्पांचा मुकुटावर चंद्रकोर लावून भालचंद्र शृंगार करत बाप्पाला सजवण्यात आले आहे. त्याचबरोबर मोहीम यशस्वी व्हावी यासाठी गणपती बाप्पाला प्रार्थना करण्यात आली
-
Chandrayaan 3 Live | चांद्रयान-3 चे लँडिंग पाहण्य़ासाठी पुणेकरांसाठी खास सोय
चांद्रयान 3 चे लँडिंग पुणेकरांना पाहता येणार. त्यासाठी शहरात अनेक ठिकाणी सोयी करण्यात आल्या आहेत. काही शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये आणि खासगी संस्थांमध्येही स्क्रिनिंगची सोय करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘एनसीआरए’ सभागृहात सायंकाळी 6 वाजता मोठ्या पडद्यावर पाहण्याची सोय आहे. टिळक रोडवरील न्यू इंग्लिश स्कूलमध्येही हजारो विद्यार्थ्यांना ‘चांद्रयान 3’ लँडिंग लाइव्ह दाखविण्यात येईल. या ठिकाणी दुपारी 4 वाजल्यापासून ते 7 वाजेपर्यंत कार्यक्रम असेल, लॉ कॉलेज रोडवरील एनएफएआय या संस्थेमध्येही चांद्रयान 3 लँडिंग पाहता येईल.
-
Chandrayaan 3 Live | आज किती वाजता चांद्रयान-3 च होणार लँडिंग?
इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 चांद्रभूमीला स्पर्श करेल. लँडिंगच्या दोन तासआधी लँडिंग मॉड्युलची तपासणी केली जाईल. सध्या लँडिंग मॉड्युलधील सर्व यंत्रणा व्य़वस्थित काम करत आहेत.
Chandrayaan-3 Mission:
🇮🇳Chandrayaan-3 is set to land on the moon 🌖on August 23, 2023, around 18:04 Hrs. IST.
Thanks for the wishes and positivity!
Let’s continue experiencing the journey together as the action unfolds LIVE at: ISRO Website https://t.co/osrHMk7MZL YouTube… pic.twitter.com/zyu1sdVpoE
— ISRO (@isro) August 20, 2023
-
Chandrayaan 3 Live | भारताची चांद्रयान-3 मोहीम कधी सुरु झालेली ?
भारताच्या मिशन चांद्रयान-3 ला 14 जुलै रोजी सुरुवात झाली होती. आज तब्बल 40 दिवसानंतर ही मोहीम अंतिम टप्प्यात आली आहे. तमाम भारतीयांच आज मोठ स्वप्न साकार होईल. त्या क्षणाकडे देशवासियांच्या नजरा आहेत.
Published On - Aug 24,2023 7:48 AM