Chandrayaan 3 Moon Landing : चांद्रयान-3 च लँडिंग तुम्ही इथे Live पाहा
Chandrayaan 3 Moon Landing : आज तमाम देशवासियांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. भारत चंद्रावर आपल्या यशस्वी पाऊल खूणा उमटवण्यासाठी सज्ज आहे. मंदिर, मशिद, चर्च सर्वच ठिकाणी फक्त चांद्रयान-3 च्या यशासाठी प्रार्थना सुरु आहेत.
बंगळुरु : तमाम भारतीय ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतायत, त्यासाठी फारच कमी वेळ उरला आहे. संध्याकाळी 5.44 मिनिटांनी विक्रम लँडर ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर इस्रोकडून फायनल कमांड देण्यात येईल त्यानंतर चांद्रयान-3 मधील अत्यंत महत्त्वाचा असा पावर डिसेंट फेज सुरु होईल. 30 किलोमीटर उंचीवरुन पावर डीसेंट स्टार्ट होईल, ज्याला रफ ब्रेकिंग फेस म्हटलं जातं. हाच मिशनमधील सर्वात अवघड टप्पा असेल, जिथे भारतीय शास्त्रज्ञांची कसोटी लागणार आहे. चांद्रयान-2 चा अनुभव लक्षात घेऊन यावेळी आपण सर्वबाजूंनी तयारी केली आहे. पण तो शेवटच्या 15 मिनिटांचा थरार टेन्शन देणारा असेल. चांद्रयान-3 च्या यशासाठी आज देशभरात प्रार्थना सुरु आहेत. तो क्षण आता थोड्याचवेळात येईल. हे सगळ तुम्ही इथे Live पाहू शकता.