Chandrayaan 3 Successful : अंतराळ यानाभोवती सोनेरी आवरण का असतं? त्याचा उपयोग काय?
Chandrayaan 3 Successfully Landed on Moon : मल्टीलेयर इन्सुलेशन म्हणजे नेमकं काय? अंतराळात पाठवल्या जाणाऱ्या यानाभोवती सोनेरी रंगाचं आवरण का असतं? त्याचा उपयोग काय? चांद्रयान 3 ही मोहिम यशस्वी होत असताना जाणून घ्या काही महत्वपूर्ण गोष्टी...
मुंबई | 24 ऑगस्ट 2023 : चांद्रयान 3 मोहिमेतील अत्यंत खडतर आणि महत्वाचा टप्पा इस्रोने पार केला आहे. हे अंतराळ यान चंद्रावर लँड झाल्यानंतर त्याचे फोटो वेगाने व्हायरल झाले. या फोटोत एका गोष्टीने सगळ्यांचं लक्ष वेधलं. ते म्हणजे चांद्रयान 3 चं लँडरचा रंग… सोनेरी रंगाचं हे लँडर सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे या यानाला देण्यात आलेला सोनेरी रंग चर्चेत आला आहे. अंतराळ यानाला सोनेरी रंग का दिला जातो. त्याचा उपयोग काय? या रंगामुळे यानाला काय फायदा होतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात…
यावर दिसणाऱ्या या सोनेरी रंगाच्या थराला MLI अर्थातच मल्टीलेयर इन्सुलेशन असं म्हणतात. बाहेरून सोनेरी रंग दिसणाऱ्या या MLI चा आतून चंदेरी रंग असतो. यावर अॅल्युमिनियमचा पातळ थर असतो. पॉलिमराईड अॅल्युमनाईज्ड शीट असं म्हणतात.
यानातील रेडिएशनमुळे इजा पोहोचेल अशा भागातच मल्टीलेयर इन्सुलेशन असतं. मल्टीलेयर इन्सुलेशन किती प्रमाणात वापरायचं, याचा अंदाज तो कोणत्या भागात उतरणार आहे, यावर अवलंबून असतं. यानाच्या संवेदनशील भागांचं उष्णतेपासून संरक्षण करणं हे या मल्टीलेयर इन्सुलेशनचं प्रमुख कार्य आहे. वातावरणातील बदलांमुळे यानावर परिणाम होऊ नये, म्हणून मल्टीलेयर इन्सुलेशन कार्य करतं. हजारो किलोमीटरचा प्रवास करून हे यान चंद्राच्या दिशेने झेपावणार असल्याने या प्रवासात धुलीकणांचा यानावर परिणाम होऊ शकतो. त्यासूनही हे मल्टीलेयर इन्सुलेशन संरक्षण करतं.
चांद्रयान 3 चांद्रभुमीवर सॉफ्ट लँड झालं आहे. त्यानंतर सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांचं सर्वच स्तरातून कौतुक होतंय. अशातच आज इस्रोकडून एक ट्विट करण्यात आलं आहे. इस्रोने चांद्रयान-3 मिशनबद्दल टि्वट केलय. मेड इन इंडिया, मेड फॉर द मून चांद्रयान-3 चा रोव्हर लँडरमधून बाहेर आला आहे. भारताने चंद्रावर मूनवॉक सुरु केला आहे. इथून पुढच्या कामाचे लवकरच अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचतील, असं टि्वट इस्रोने केलं आहे.
Chandrayaan-3 Mission: ‘India🇮🇳, I reached my destination and you too!’ : Chandrayaan-3
Chandrayaan-3 has successfully soft-landed on the moon 🌖!.
Congratulations, India🇮🇳!#Chandrayaan_3#Ch3
— ISRO (@isro) August 23, 2023
चांद्रयानाने लँडिंगनंतरचे फोटो पाठवले आहेत. हे फोटो इस्रोने शेअर केलेत.
Chandrayaan-3 Mission: Updates:
The communication link is established between the Ch-3 Lander and MOX-ISTRAC, Bengaluru.
Here are the images from the Lander Horizontal Velocity Camera taken during the descent. #Chandrayaan_3#Ch3 pic.twitter.com/ctjpxZmbom
— ISRO (@isro) August 23, 2023