Chandrayaan-3 update : चंद्राची ही दहा रहस्यं, तुम्हाला माहीती आहेत का ?

भारताची महत्वाकांक्षी मोहीम चंद्रयान-3 चंद्राच्या कधीही न पाहील्या गेलेल्या डार्क साईट दक्षिण ध्रुवावर लॅंडींग करीत आहे. चंद्राची दहा गुपिते काय आहेत ती पाहा

Chandrayaan-3 update : चंद्राची ही दहा रहस्यं, तुम्हाला माहीती आहेत का ?
SOUTH POLEImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Aug 23, 2023 | 7:55 PM

नवी दिल्ली | 23 ऑगस्ट 2023 : भारतीय अंतराळ संस्था इस्रोचे चंद्रयान-3 आता काही वेळातच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लॅंडींग करणार आहे. इस्रोच्या या महत्वाकांक्षी चंद्रयान-3 मोहीमेकडे साऱ्या जगाचे लक्ष आहे. वैज्ञानिक आणि अभ्यासकांसह सामान्य नागरीकांचे देखील लक्ष याकडे लागले आहे. चंद्रयान-3 मोहिमेनंतर चंद्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. अनेकांना चंद्राबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे. तर चंद्राच्या बाबतील काही रहस्य येथे आपण पाहणार आहोत.

1 – चंद्र हा गोल नाही !

– आपल्या पृथ्वीप्रमाणे चंद्र काही गोलाकार नाही. पोर्णिमेला आपल्या गोलाकार चंद्र जरी पाहायला मिळत असला तरी एक पृथ्वीचा एक नैसर्गिक उपग्रह म्हणून त्याचा आकार चेंडूसारखा गोल नाही तर अंडाकार आहे. चंद्राकडे आपण पाहतो तेव्हा त्याचा काहीच भाग आपल्याला दिसतो. त्याचे भूमितीय आकाराचा केंद्र क्रेंद्रपासून 1.2 मैल दूर आहे.

2 – चंद्राचा उजेड

– पोर्णिमेच्या चंद्राच्या तुलनेत सूर्य 14 पट अधिक प्रकाश मान आहे. जर प्रोर्णिमेच्या चंद्राकडून सूर्याएवढा प्रकाश हवा तरप 398,110 चंद्राची गरज लागेल. चंद्राला स्वत:चा प्रकाश नाही. चंद्रग्रहण लागते तेव्हा चंद्र पृथ्वीच्या छायेत येतो. तेव्हा त्याच्या पृष्ठभागाचे तापमान 500 डीग्री फॅरेनहाईट कमी होते. याप्रक्रीयेला 90 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो.

3 – पृथ्वीची गती कमी करतोय चंद्र

– चंद्र जेव्हा पृथ्वीच्या जवळ असतो तेव्हा त्याला पेरिग्री म्हणतात. यावेळी भरती आणि ओहोटीचा स्तर सामान्यापेक्षा जादा असतो. चंद्र पृथ्वीची गती देखील कमी करीत असतो त्यामुळे पृथ्वीची गती दर शताब्दीला 1.5 मिलीसेंकद धीमी होते.

4 – चंद्रावर खड्डे का आहेत ?

  • चीनमध्ये अशी आख्यायिका होती की ड्रॅगनद्वारे सुर्याला गिळल्याने सूर्यग्रहण होते. त्यामुळे चीनी लोक ग्रहणावेळी गोंधळ घालायचे. चीनी असेही मानायचे चंद्रावर बेडूक रहातात ते चंद्राच्या खड्ड्यात असतात. चंद्रावरचे खड्डे चार अब्ज वर्षांपूर्वी आकाशातून उल्का, अशनी कोसळ्याने झाले आहेत.

5 – चंद्रावर सीक्रेट प्रोजेक्ट

  • अमेरिका शीतयुद्धात चंद्रावर अण्वस्र हत्यारांचा वापर करण्याचा विचार करीत होता. याचा उपयोग रशियाला आपली ताकद दाखविण्याचा होता. त्याद्वारे रशियावर दबाव आणण्याचा हेतू होता. या योजनेचे नाव ए स्टडी ऑफ लूनर रिसर्च फ्लाइट्स आणि प्रोजेक्ट ए 119 असे ठेवले होते.

6 – चंद्र कधीच पूर्ण दिसत नाही

  • आपल्याला चंद्राचा केवळ 59 टक्के भागच पृथ्वीवरुन दिसतो. चंद्राचा 41 टक्के भाग आपल्याला पृथ्वीवरुन दिसत नाही. तर तुम्ही अंतराळात गेला नाही त्या 41 टक्के भागावर उभे राहीला तर पृथ्वी दिसणार नाही.

7 – ज्वालामुखीच्या विस्फोटाशी ब्ल्यू मूनचे कनेक्शन

  • साल 1883 इंडोनेशियातील द्वीप क्राकातोआत झालेल्या ज्वालामुखीच्या विस्फोटानंतर चंद्राशी ‘ब्ल्यू मून’ शब्द जुळला गेला. हा पृथ्वीच्या इतिहासातील सर्वात मोठा ज्वालामुखी स्फोट मानला जातो. त्याचा आवाज पश्चिमी ऑस्ट्रेलियाच्या पर्थ आणि मॉरीशसपर्यंत पसरला होता. त्यामुळे आकाशात एवढी राख पसरली की त्यामुळे चंद्र निळा दिसू लागला. त्यानंतर ब्ल्यू मून संकल्पना सुरु झाली.

8 – चंद्राच्या रहस्यमय दक्षिणी ध्रुव

–  चंद्रयान-3 दक्षिणी ध्रुवावर लॅंड करणार आहे. येथे खोल खड्डे आणि पर्वत आहेत. नासाच्या मते या भागातील काही खड्डे इतके खोल आहेत की तेथे अब्जावधी वर्षे सूर्याची किरणे पोहचलेली नाहीत.

9 – लिओनार्दा दा विंचीने शोध लावला

– चंद्राच्या विविध कला आपल्याला दिसतात. चंद्राच्या काही हिस्साच आपल्याला दिसत असतो. पृथ्वी आणि चंद्राच्या परिवलन असे होते. लिओनार्दा दा विंचीने प्रथम सांगितले की चंद्र आंकुचन आणि प्रसरण पावत नाही. तेवढ्याच भागावर सूर्याचा प्रकाश पोहचल्याने तो भाग दिसतो.

10 – चंद्रावर क्रेटरना कोण नाव देते

– चंद्रावरील खड्डे वा क्रेटरना इंटरनॅशनल एस्ट्रॉनॉमिकल युनियन नावे देते, त्यात प्रसिध्द शास्रज्ञ, कलाकार, अंतराळवीर, एक्सप्लोरर्स यांची नावे क्रेटरना दिली आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.