समजा 23 ऑगस्टला चंद्रावर लँडिंग शक्य झालं नाही, मग पुढचा सूर्योदय कधी?, किती महिने थांबाव लागेल?

Chandrayaan-3 Update | 23 ऑगस्टची तारीख चुकली, तर शास्त्रज्ञांच्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरेल का? चांद्रभूमीवर उतरताना लँडरचा स्पीड किती असेल? लँडरमध्ये हेजार्ड डिटेक्शन अँड ओवॉयडेंस सिस्टम आहे.

समजा 23 ऑगस्टला चंद्रावर लँडिंग शक्य झालं नाही, मग पुढचा सूर्योदय कधी?, किती महिने थांबाव लागेल?
Chandrayaan-3 Update
Follow us
| Updated on: Aug 19, 2023 | 1:59 PM

नवी दिल्ली : भारताच चांद्रयान-3 चंद्राच्या जवळ पोहोचलं आहे. चांद्रयान-3 च्या लँडरवर डि-बूस्टिंगचा पहिला फेज पूर्ण झालाय. काल चांद्रयान-3 ने चंद्राचे नवीन फोटो पाठवले. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान-3 चा लँडर मॉड्युल व्यवस्थित काम करतेय. 23 ऑगस्टला संध्याकाळी 5 वाजून 47 मिनिटांनी विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. आता प्रश्न असा आहे की, समजा 23 ऑगस्टला खुशखबरी मिळाली नाही, तर इस्रोची सर्व मेहनत पाण्यात जाईल का ?

चंद्रावर पुढची सकाळ कधी होणार?

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, विक्रम लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. चांद्रयान-3 च्या लँडिंगमध्ये काही समस्या आल्यास एक महिन्यानंतर म्हणजे सप्टेंबरमध्ये लँडिंगचा प्रयत्न केला जाईल. 23 ऑगस्टला विक्रम लँडर आणि रोव्हरच चंद्रावर लँडिंग झालं नाही, तर पुन्हा पुढची सकाळ सूर्योदयाची वाट पहावी लागेल. चंद्रावर पुढची सकाळी 28 दिवसांनी होईल. म्हणजे लँडिंग सप्टेंबरमध्ये कराव लागेल.

आता लँडरला संकट आधीच कळणार?

इस्रोच्या माहितीनुसार, आता विक्रम लँडरकडे प्रत्येक संकटाची आगाऊ माहिती मिळवण्याची आणि त्यातून सही सलामत निसटण्याची टेक्नोलॉजी आहे. याला हेजार्ड डिटेक्शन अँड ओवॉयडेंस सिस्टम म्हणतात. त्याशिवाय लँडर नेवीगेशन अँड गायडेंस कंट्रोल आणि थ्रस्टर सिस्टम सुद्धा आहे.

चांद्रभूमीवर उतरताना लँडरचा स्पीड किती असेल?

चांद्रयान-2 च्या तुलनेत चांद्रयान-3 चा लँडर मजबूत बनवण्यात आला आहे. त्याचे पाय बळकट बनवण्यात आले आहेत. लँड करताना लँडरचे सेंसर फेल झाले, तरी सहजतेने लँडिंग प्रोसेस होईल. गतीच मापन करण्यासाठी दोन नवीन सेंसर जोडण्यात आले आहेत. चंद्राच्या पुष्ठभागाला टच करण्याआधी लँडरचा स्पीड प्रतितास 8 किमी असेल. चांद्रयान-3 दक्षिण ध्रुवावर किती वाजता पोहोचेल?

चांद्रयान-3 23 ऑगस्टला दुपारी 2 वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचेल. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजून 47 मिनिटांनी सॉफ्ट लँडिंग होईल. 14 जुलैला भारताच मिशन चांद्रयान-3 सुरु झालं होतं. 40 दिवसानंतर तो ऐतिहासिक क्षण येणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.