Chandrayaan 3 Update | ISRO ने करुन दाखवलं, मध्यरात्री मिशनमधील अवघड टप्पा यशस्वी, नेमकं काय केलं?
Chandrayaan 3 | इस्रोने रात्री 12 ते 1 दरम्यान नेमकं काय केलं? चांद्रयान 3 चा पुढचा प्रवास कसा असेल, जाणून घ्या. याआधी चांद्रयान 3 पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करत होतं. त्यावेळी टप्याटप्याने चांद्रयान 3 चा कक्षा विस्तार करण्यात आला.
बंगळुरु : चांद्रयान 3 मोहिमेतील अवघड टप्पा मंगळवारी रात्री पार पडला. 14 जुलैपासून सुरु झालेल्या चांद्रयान 3 मोहिमेतील एक महत्त्वाच मॅन्यूव्हर होतं. चांद्रयान 3 ने ट्रान्सलुनार ऑरबिटमध्ये प्रवेश केला आहे. सोप्या शब्दात सांगायच झाल्यास चांद्रयान 3 ने पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु केला आहे. पृथ्वी आणि चंद्र या दोघांच्या कक्षेमधील भागाला ट्रान्सलुनार ऑरबिट म्हणतात. चांद्रयान 3 ने अजून चंद्राच्या कक्षेत प्रवेश केलेला नाही. फक्त ते आता चंद्राच्या दिशेने मार्गस्थ झालं आहे.
याआधी चांद्रयान 3 पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करत होतं. त्यावेळी टप्याटप्याने चांद्रयान 3 चा कक्षा विस्तार करण्यात आला. आता यानाचा पुढचा स्टॉप चंद्र असेल, असं इस्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
चंद्राच्या कक्षेत कधी पोहोचणार?
सध्या चांद्रयान 3 मोहिमेत सर्व शेड्युलनुसार चालू आहे. यानाच आरोग्य व्यवस्थित आहेत. 5 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान 3 ला चंद्राच्या कक्षेत पोहोचवण्याच नियोजन आहे. 1 ऑगस्टच्या रात्री 12 ते 12.30 दरम्यान इस्रोकडून हे मॅन्यूव्हर पार पडलं.
सध्या चांद्रयान 3 च वजन किती?
प्रॉप्लजन मॉड्युलमध्ये असलेल्या चांद्रयान 3 च वजन 2145 किलो आहे. यात विक्रम लँडर आणि रोव्हर आहे. चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर प्रॉप्लजन मॉड्युलपासून लँडर वेगळा होणार आहे. चांद्रयान 3 ला ट्रान्सलुनार ऑरबिटमध्ये पोहोचवण्यासाठी यानाला गती देणं आवश्यक होतं. त्यासाठी ठराविक वेळेमध्ये चांद्रयान 3 च इंजिन प्रज्वलित करण्यात आलं.
Chandrayaan-3 Mission: Chandrayaan-3 completes its orbits around the Earth and heads towards the Moon.
A successful perigee-firing performed at ISTRAC, ISRO has injected the spacecraft into the translunar orbit.
Next stop: the Moon ?
As it arrives at the moon, the… pic.twitter.com/myofWitqdi
— ISRO (@isro) July 31, 2023
चंद्राच्या कक्षेत चांद्रयान 3 कुठे स्थापित होणार?
चांद्रयान 3 येत्या 5 ऑगस्टला चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर इस्रो पृथ्वीवरुनच वेगवेगळे मॅन्यूव्हर करणार आहे. चांद्रयान 3 ला चंद्राच्या अपेक्षित 100 किमीच्या सर्क्युलर ऑरबिटमध्ये स्थापित करण्याच लक्ष्य आहे. चंद्राच्या कक्षेत चांद्रयान 3 वर इस्रोकडून चार मॅन्यूव्हर करण्यात येतील. 14 जुलैला श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन चांद्रयान 3 च यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं होतं. LVM 3 रॉकेटने चांद्रयान 3 ला अपेक्षित कक्षेत स्थापित केलं होतं. आता चांद्रयान 3 पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडलं आहे.