Chandrayaan-3 update | चांद्रयान 3 मिशनमधील अवघड टप्पा यशस्वी, यानाची दोन भागात विभागणी, पुढे काय?
Chandrayaan 3 update | यशस्वी सेप्रेशननंतर आता आठवड्याभराने 23 ऑगस्टला चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगची योजना आहे. किती वाजता लँडिंग होणार? ते जाणून घ्या. चंद्राच्या पुष्ठभागापासून काही किलोमीटर अंतरावर घडलेली ही घडामोड खूप महत्त्वाची आहे.
नवी दिल्ली : चांद्रयान-3 मिशनसाठी आज महत्त्वाचा दिवस होता. तब्बल महिनाभर एकत्र राहिल्यानंतर चांद्रयान-3 च आज विभाजन झालं. चांद्रयान 3 वर बुधवारी चंद्राच्या कक्षेतील शेवटच मॅन्यूव्हर परफॉर्म करण्यात आलं होतं. चांद्रयान 3 ला 153km x 163km कक्षेत स्थापित करण्यात आलं होतं. इस्रोच्या वैज्ञानिकांनी यशस्वीरित्या लँडिंग मॉड्युलला प्रॉपल्शन मॉड्युलपासून वेगळं केलं. चंद्राच्या पुष्ठभागापासून काही किलोमीटर अंतरावर घडलेली ही घडामोड खूप महत्त्वाची आहे. प्रॉपल्शन मॉड्युल आणि लँडिंग मॉड्युलचा आता स्वतंत्र प्रवास सुरु होईल.
हे दोन्ही मॉड्युल चंद्रपासून 100 किमीच्या कक्षेत भ्रमण करतील. यावेळी दोघांमध्ये टक्कर होऊ नये, यासाठी समान अंतर ठेवलं जाईल. प्रॉपल्शन मॉड्युल आणि लँडिंग मॉड्युलच सेप्रेशन ही मिशन चांद्रयान 3 मधील एक अवघड आणि महत्त्वाची प्रक्रिया होती.
इस्रोकडे सेप्रेशनचा अनुभव कसा होता?
आज 17 ऑगस्टला दुपारी 1 वाजून 8 मिनिटांनी चांद्रयान 3 च्या दोन भागांमधील विभाजनाची प्रक्रिया सुरु झाली. चांद्रयान-2 मिशनमुळे सेप्रेशन प्रोसेस हाताळण्याचा इस्रोकडे अनुभव होता. त्यावेळी इस्रोने यशस्वीरित्या लँडिंग मॉड्युलला ऑर्बिटरपासून वेगळं केलं होतं. आता तेच त्यांनी प्रॉपल्शन मॉड्युलला लँडिंग मॉड्युलपासून वेगळं केलं.
Chandrayaan-3 Mission:
‘Thanks for the ride, mate! 👋’ said the Lander Module (LM).
LM is successfully separated from the Propulsion Module (PM)
LM is set to descend to a slightly lower orbit upon a deboosting planned for tomorrow around 1600 Hrs., IST.
Now, 🇮🇳 has3⃣ 🛰️🛰️🛰️… pic.twitter.com/rJKkPSr6Ct
— ISRO (@isro) August 17, 2023
चंद्रावर सॉफ्ट लँडिंग किती वाजता?
यशस्वी सेप्रेशननंतर आता आठवड्याभराने 23 ऑगस्टला चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगची योजना आहे. 23 ऑगस्टला संध्याकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी सॉफ्ट लँडिंग होऊ शकतं. भारताच्या तिसऱ्या चांद्रयान 3 मोहिमेला 14 ऑगस्टला सुरुवात झाली होती. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रारुन चांद्रयान-3 ने यशस्वीरित्या अवकाश कक्षेत प्रवेश केला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने चांद्रयान 3 चा कक्षा विस्तार करण्यात आला. लँडिंग मॉड्युलवर वेगवेगळे मॅन्यूव्हर
यानाला पृथ्वीपासून लांब नेण्यात आलं. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी चांद्रयान 3 ने यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. त्यावेळी डि-ऑर्बिटिंगची प्रोसेस सुरु झाली. चांद्रयान 3 ला टप्प्याटप्प्याने चंद्राच्या जवळ नेण्यात आलं. शेवटच्या मॅन्यूव्हरमध्ये चांद्रयान 3 चंद्रपासून 150-160 किलोमीटरच्या कक्षेत स्थापित करण्यात आलं. आता मिशनचा अवघड टप्पा सुरु झाला आहे. लँडिंगच्या दिवसापर्यंत लँडिंग मॉड्युलवर वेगवेगळे मॅन्यूव्हर करण्यात येतील.