Chandrayaan-3 Update : चंद्रयान- 3 चे सध्याचे लोकेशन काय ? आता पुढचा टप्पा काय असणार ? चंद्रभूमीवर कशी उमटतील इस्रोची अक्षरे
पृथ्वीपासून चंद्राचे अंतर हे 3, 84, 400 कि.मी. इतके आहे. हे अंतर पार केल्यानंतर येत्या 23 ऑगस्टला चंद्रयान-3 चंद्राच्या भूमीवर प्रत्यक्षात सॉफ्ट लॅंडीग करीत लॅंडर विक्रमला उतरविणार आहे.
मुंबई | 25 जुलै 2023 : भारताचे चंद्रयान-3 चंद्राच्या भेटीला 14 जुलैच्या दुपारी 2.35 वाजता आंध्रप्रदेशच्या श्रीहरिकोट्टा अंतराळ संशोधन केंद्रातून रॉकेटच्या सहाय्याने अवकाशात झेपावले होते. आता त्याने पृथ्वीच्या पाच प्रदक्षिणा पूर्ण केलेल्या आहेत. आता लवकरच ते पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या कक्षेत ढकलले जाणार आहे. त्यानंतर पुन्हा त्याच्या चंद्राभोवतीच्या प्रदक्षिणा सुरु राहतील आणि 23 ऑगस्ट रोजी चंद्रयान-3 चंद्रावर प्रत्यक्ष लॅंडींग करणार आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची ( इस्रो ) चंद्रयान-3 ही मोहिम जर यशस्वी झाली तर भारत मोजक्याच अमेरिका, रशिया, चीन आणि त्यानंतर चौथा देश ठरणार आहे. मात्र त्यासाठी चंद्रावर सॉफ्ट लॅंडीग करणे महत्वाचे ठरणार आहे. अमेरिका आणि सोव्हीएट रशिया यांना चंद्रावर सॉफ्ट लॅंडींग करताना अनेक अपयशांचा सामना करावा लागला होता. एकट्या चीनला अगदी अलिकडे म्हणजे 2013 मध्ये चंगे-3 मिशनमध्ये पहिल्याच प्रयत्नात चंद्रावर यशस्वीपणे सॉफ्ट लॅंडींग करण्यात यश मिळाले आहे.
चंद्रयान-3 च्या प्रवासात आणखी खूप घडामोडी शिल्लक आहेत. पृथ्वीच्या कक्षेतून त्याला चंद्राच्या कक्षेत सोडण्याचा टास्कही खूप महत्वाचा टप्पा आहे. चंद्रयान-3 पासून लॅंडर विक्रमला वेगळे करण्याचाही टप्पा अत्यंत नाजू्क आणि महत्वाचा ठरणार आहे. तसेच सॉफ्ट लॅंडींग करताना त्याचा वेग कमी करणे हे ही एक महत्वाचे आणि किचकट काम असणार आहे.
25 जुलै रोजी दुपारी 2 आणि 3 वाजण्याच्या दरम्यान चंद्रयान-3 यानाने पृथ्वी भोवतालची पाचवी फेरी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. आता 1 ऑगस्ट रोजी रात्री 1 वाजता चंद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत ढकल्याचा महत्वाचा टास्क इस्रोच्या शास्रज्ञांना सफल करावा लागणार आहे. चंद्रयान 1,27,609 कि.मी. x 236 कि.मी. च्या कक्षेत पोहचणार आहे.
येथे पाहा ट्वीट –
Chandrayaan-3 Mission:
The orbit-raising maneuver (Earth-bound perigee firing) is performed successfully from ISTRAC/ISRO, Bengaluru.
The spacecraft is expected to attain an orbit of 127609 km x 236 km. The achieved orbit will be confirmed after the observations.
The next… pic.twitter.com/LYb4XBMaU3
— ISRO (@isro) July 25, 2023
पृथ्वीपासून चंद्राचे अंतर हे 3, 84, 400 कि.मी. इतके आहे. हे अंतर पार केल्यानंतर येत्या 23 ऑगस्टला चंद्रयान-3 चंद्राच्या भूमीवर प्रत्यक्षात सॉफ्ट लॅंडीग करीत लॅंडर विक्रमला उतरविणार आहे. त्यात असलेल्या प्रज्ञान रोव्हर या बग्गी गाडीद्वारे चंद्राच्या पृष्ठभागाचे निरीक्षण आणि प्रयोग केले जाणार आहेत.
चंद्राच्या भूमीवर उमटले जाणार इस्रोचे नाव
चंद्राच्या या रोव्हरच्या चाकांवर इस्रोचा लोगो उमटविला असल्याने चंद्राच्या पृष्टभागावर इस्रोचे नाव कोरले जाणार आहे. इतर देशांनी चंद्राच्या आपल्याला नेहमीच दिसणाऱ्या भागात सॉफ्ट लॅंडींग केले आहे. भारत चंद्राच्या कधी न दिसणाऱ्या दक्षिण गोलार्धात आपले चंद्रयान-3 उतरविणार आहे.