Chandrayaan-3 | भारत नवा इतिहास घडवणार… चांद्रयान-3 आता चंद्रापासून फक्त 25 किलोमीटरवर; फक्त तीन दिवसाची प्रतिक्षा

भारताचं चंद्रावर पाऊल ठेवण्याचं स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या अत्यंत जवळ पोहोचलं आहे. इसरोने दुसरे आणि अखेरचे डिब्यूस्टिंग ऑपरेशन यशस्वी पार पाडले आहे.

Chandrayaan-3 | भारत नवा इतिहास घडवणार... चांद्रयान-3 आता चंद्रापासून फक्त 25 किलोमीटरवर; फक्त तीन दिवसाची प्रतिक्षा
Chandrayaan 3Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 20, 2023 | 7:30 AM

नवी दिल्ली | 20 ऑगस्ट 2023 : भारताचं मून मिशन यशस्वी होण्याची शक्यता आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या अत्यंत जवळ पोहोचलं आहे. इसरोने दुसरे आणि अखेरचे डिब्यूस्टिंग ऑपरेशन यशस्वी पार पाडले आहे. या ऑपरेशननंतर चंद्रापासून चांद्रयान-3चं अंतर अत्यंत कमी झालं आहे. लँडर मॉड्यूल आता चंद्रापासून 25 km x 134 km किलोमीटरच्या अंतरावर आहे. या मॉड्यूलला आता इंटरनल चेकिंगमधून जावं लागणार आहे. लँडिंग साईटवर सूर्योदयाची वाट पाहावी लागणार आहे. सर्व काही सुरळीत राहिलं तर 23 ऑगस्ट रोजी हे यान चंद्रावर उतरेल. तसे झाल्यास भारत जगात इतिहास निर्माण करेल.

इसरोने 1 वाजून 50 मिनिटांनी चांद्रयान-3चे दुसरे डिब्यूस्टिंग ऑपरेशन पूर्ण केले. स्पेस एजन्सीने ट्विट करून त्याबाबतची माहिती दिली. लँडर मॉड्यूलने आपलं दुसरं आणि शेवटचं डिब्यूस्टिंग ऑपरेशन यशस्वीपणे पूर्ण केलं आहे. आता त्याची कक्षा कमी होऊन 24 किलोमीटर x 134 किलोमीटर राहिली आहे, असं ट्विट स्पेस एजन्सीने केलं आहे. गती कमी करण्याच्या प्रक्रियेला डिब्स्यूस्टिंग म्हटलं जातं. लंडर मॉड्यूलचं पहिलं डिब्यूस्टिंग ऑपरेशन 18 ऑगस्ट रोजी झालं होतं.

हे सुद्धा वाचा

23 ऑगस्ट रोजी इतिहास घडणार

भारताचं मून मिशन चांद्रयान-3 आतापर्यंतच्या प्लानिंग नुसार सुरू आहे. जर सर्व काही व्यवस्थित राहिलं तर 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 हे चंद्रावर 5 वाजून 47 मिनिटांनी लँड करेल. लँडिंग यशस्वी झाल्यास भारत इतिहास रचेल. रशिया, अमेरिका आणि चीननंतर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा चौथा देश बनेल.

14 जुलै रोजी लॉन्च

चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर लँडरच्या आतील रोव्हर ( 26 किलोग्रॅम) एक रँपच्या माध्यमातून बाहेर जाईल. त्याच्या आसपासच्या परिसराचा शोध घेईल. इसरोने चांद्रयान-3 ला 14 जुलै रोजी लॉन्च करण्यात आलं होतं. 5 ऑगस्ट रोजी पहिल्यांदा यानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. 16 ऑगस्ट रोजी यानाने आपला शेवटचा मॅन्यूवर पूर्ण केला. 17 ऑगस्ट रोजी प्रोपल्शन मॉड्यूलहून लँडर वेगळा झाला.

स्वप्न पूर्ण होणार

चंद्रावर पाऊल ठेवण्याचं भारताचं अधुरं स्वप्न पूर्ण होणार आहे. भारताने 2019मध्ये चांद्रयान-2 मिशन लॉन्च केलं होतं. हे मिशन सॉफ्ट लँडिंग पूर्वीच फेल गेले होतं. त्यामुळे चंद्रावर जाण्याचं भारताचं स्वप्न अर्धवट राहिलं होतं. तेच मिशन आता भारत पूर्ण करत आहे. चांद्रयान 3 चे काम चंद्राच्या दक्षिणी ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणे आहे, चंद्रावर फिरणे आणि संशोधन करणं आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.