Chandrayaan-3 : चंद्रयान-3 च्या रोव्हरच्या पुढे आली बिकटवाट, मग प्रज्ञानने असा तोडगा काढला
चंद्रावरील चंद्रयान-3 च्या प्रज्ञान रोव्हरने या सहा चाकांच्या छोट्या बग्गीने आतापर्यंत आठ मीटर म्हणजे 26 फूटापेक्षा जास्त अंतर कापले आहे.
नवी दिल्ली | 28 ऑगस्ट 2023 : चंद्रयान-3 च्या विक्रम लॅंडरच्या आतून रोव्हर प्रज्ञान बाहेर पडून चंद्राच्या पृष्ठभागावर फिरु लागला आहे. रोव्हरच्या प्रवासात चार मीटर व्यासाचा एक क्रेटर ( खड्डा ) समोर आल्यानंतर त्याच्यावरील पाच मीटर रेंज नेव्हीगेशन कॅमेऱ्याने त्याला वेळीच ओळखले आणि रोव्हरने त्याचा रस्ता बदलला. या खड्डा रोव्हरच्या समोर तीन मीटरवर असताना त्याला रोव्हरने पाहीले आणि आपला रस्ता बदलला. रोव्हर चंद्रावरील छोटे खड्डे सहज पार करु शकतो, परंतू खूप मोठे खड्डे आल्यास तो आपला मार्ग बदलणार आहे.
चंद्रावरील चंद्रयान-3 च्या प्रज्ञान रोव्हरने या सहा चाकांच्या छोट्या बग्गीने आतापर्यंत आठ मीटर म्हणजे 26 फूटापेक्षा जास्त अंतर कापले आहे. त्याच्यावर दोन पेलोड म्हणजे उपकरणे कार्यरत आहेत. प्रॉपल्शन मॉड्यूल, लॅंडर आणि रोव्हरवरील सर्वच उपकरणे काम करीत डाटा गोळा करीत आहेत. तिघांचे कम्युनिकेशन बंगळुरुस्थित केंद्राशी आहे. इस्रोने याआधीच काल चंद्रावरील तापमान मोजले आहे. सर्वसाधारण आजपर्यंतच्या सर्वसाधारण धारणेपेक्षा चंद्रावरील तापमान जास्त आढळले आहे. चंद्रावर पृष्ठभागावर 50 ते 70 डीग्री सेल्सिअस तर क्रेटरमध्ये मायनस 10 इतके कमी तापमान पाहायला मिळाले आहे.
इस्रोने या संदर्भात ट्वीटरवर माहिती दिली –
Chandrayaan-3 Mission:
On August 27, 2023, the Rover came across a 4-meter diameter crater positioned 3 meters ahead of its location. The Rover was commanded to retrace the path.
It’s now safely heading on a new path.#Chandrayaan_3#Ch3 pic.twitter.com/QfOmqDYvSF
— ISRO (@isro) August 28, 2023
रोव्हर कोणते पेलोड आहेत ?
चंद्रावरील प्रज्ञान रोव्हरवर दोन पेलोड आहेत. लेझर इंड्यूस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप हा एलिमेंट कंपोझिशनचा अभ्यास करणार आहे. मॅग्नेशियम, एल्युमिनियम, सिलिकॉन, पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोह यांचा पृष्ठभागावर तपास करणार आहे. दुसरा पेलोड अल्फा पार्टीकल एक्स रे स्पेक्ट्रोमीटर असून हे चंद्राच्या पृष्ठभागातील केमिकल्सचे प्रमाण आणि गुणवत्ता तपासेल. खनिजांचा तपास करेल.
रोव्हरचा आकार किती
चंद्रावरील रोव्हरचा आकार 26 किलोग्रॅम आहे. तो तीन फूट लांब आणि 2.5 फूट रुंद आहे. आणि 2.8 फूट उंचीला आहे. याला सहा चाक आहेत. कमीत कमी 500 मीटर म्हणजेच 1600 फूटापर्यंत चंद्रावर प्रवास करु शकतो. त्याचा वेग 1 सेंटीमीटर प्रतिसेंकद आहे. याचे आयुष्य 14 दिवसांचे आहे. भारताच्या चंद्रयान -3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर बुधवार 23 ऑगस्ट 2023 रोजी सफल लॅंडींग करुन इतिहास घडविला आहे.