Chandrayaan-3 Update | आपलं चांद्रयान 3 चंद्राच्या कक्षेत पोहोचलं, पण दक्षिण ध्रुव अजून किती लांब?
Chandrayaan-3 Update | जाणून घ्या मिशन चांद्रयान 3 बद्दल महत्त्वाची अपडेट. चांद्रयान-3 चंद्रयान सीरीजमधील तिसरं यान आहे. 2008 मध्ये चांद्रयान 1 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याचे अंश शोधून काढले होते.
बंगळुरु : चांद्रयान 3 आता चंद्राच्या पुष्ठभागापासून थोड्याच अंतरावर आहे. इस्रोने पुन्हा एकदा यानाच ऑर्बिट म्हणजे कक्षा बदलली आहे. जेणेकरुन चांद्रयान 3 ला अजून चंद्राच्या जवळ नेता येईल. आता 9 ऑगस्टला पुन्हा चांद्रयान 3 च ऑर्बिट बदलण्यात येईल. चांद्रयान 3 जसं जसं चंद्राच्या पुष्ठभागाजवळ पोहोचतय, तसं तसं इस्रोकडून चांद्रभूमीचे फोटो शेअर करण्यात येत आहेत.
चंद्राच्या ऑर्बिटमध्ये प्रवेश करताना चांद्रयान 3 ने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. इस्रोने सोशल मीडियावर मनमोहक दुश्य शेअर केलय. चांद्रयान 3 आता चांद्रभूमीपासून 170KM x 4313KM अंतरावर आहे.
लँडिंगआधी डी-ऑर्बिटिंग
17 ऑगस्टपर्यंत चंद्राच्या जवळ जाण्यासाठी चांद्रयान 3 ची ऑर्बिट बदलण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असं भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोकडून सांगण्यात आलं. यानाच्या लँडिंग मॉड्यूलमध्ये लँडर आणि रोव्हरचा समावेश आहे. प्रोपल्शन मॉड्यूलपासून लँडिंग मॉड्यूल वेगळं होईल. त्यानंतर लँडर आपल्या शेवटच्या टप्प्यात पोहोचेल. लँडिंगच्या आधी डी-ऑर्बिटिंगची प्रक्रिया सुरु होईल. त्यानंतर काहीवेळाने लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल.
The orbit achieved is 164 km x 18074 km. pic.twitter.com/FLlqQT3jvS
— LVM3-M4/CHANDRAYAAN-3 MISSION (@chandrayaan_3) August 5, 2023
सॉफ्ट लँडिंग कधी?
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा इस्रोचा हा दुसरा प्रयत्न आहे. इस्रोला यश मिळालं, तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणार भारत पहिला देश ठरेल. 23 ऑगस्टला चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंगच टार्गेट आहे. 14 जुलैनंतर पाचवेळा चांद्रयान 3 वर मॅन्यूव्हर करण्यात आले. यानाला चंद्राच्या जवळ घेऊन जाण्यासाठी हे सर्व मॅन्यूव्हर करण्यात आले. चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा इस्रोचा प्रयत्न आहे. मागच्या चांद्रयान 2 मोहिमेत अखेरच्या टप्प्यात क्रॅश लँडिंग झालं होतं. सॉफ्ट लँडिंगनंतर खऱ्या अर्थाने काम सुरु होईल. चंद्राचा साऊथ पोलच का?
चांद्रयान-3 चंद्रयान सीरीजमधील तिसरं यान आहे. 2008 मध्ये चांद्रयान 1 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याचे अंश शोधून काढले होते. त्यानंतर 2019 मध्ये चांद्रयान 2 मिशन लॉन्च करण्यात आलं. त्यावेळी सुद्धा दक्षिण ध्रुवावर शोध घेण्याच टार्गेट होतं. पण मोहिम लँडिंगच्या अखेरच्या टप्प्यात फसली होती. आता पुन्हा एकदा त्याच क्षेत्रात लँडिंगच उद्देश आहे. इथे खूप अंधार असतो. ज्यामुळे लँडिंगमध्ये अडचणी येतात. चांद्रयान 3 यशस्वी होईल अशी अपेक्षा आहे.