पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत करता येणार What’s App वर चॅट, फक्त इतकंच करावं लागणार
PM Modi Joins WhatsApp Channel: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन केले आहे. ते काय आहे आणि तुम्ही पंतप्रधानांशी कसे संपर्क साधू शकाल ते पाहू या.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी व्हॉट्सअॅप चॅनलवर जोडले गेले आहेत. इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मने लॉन्च केलेले हे एक नवीन फीचर आहे. व्हॉट्सअॅप चॅनलच्या मदतीने एकाच वेळी अनेक लोकांसोबत कनेक्ट होता येतं. आता तुम्हाला व्हॉट्सअॅपवरही पीएम मोदींशी संबंधित अपडेट्स आणि पोस्ट दिसणार आहेत. बघूया हे फीचर कसं काम करतं आणि पंतप्रधानांनी याबद्दल काय म्हटलं?
ब्रॉडकास्ट स्टुलमधून एडमिन टेक्स्ट, फोटो, व्हिडिओ, स्टिकर आणि पोलच्या माध्यमातून अनेक लोकांशी जोडता येईल. यामध्ये नव्या Updates तुम्हाला मिळतील.
PM मोदींकडून पोस्ट
पीएम मोदी यांनी What’s App चॅनेलवर पोस्ट देखील केली आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलंय की, या कम्युनिटीमध्ये सहभागी होण्यासाठी मी एक्साईटेड आहे. या येथे जोडले जाऊयात. नव्या संसद भवनाचा एक फोटो आहे.

PM Narendra Modi WhatsApp Channel
PM मोदी यांच्या व्हॉट्सअप चॅनेलसोबत कसे जोडले जाल
- जर तुम्हाला पीएम मोदींच्या या चॅनेलवर जोडले जायचे असेल तर तुम्हाला येथे क्लिक करावे लागेल.
- येथे तुम्हाला चॅटिंग इंटरफेस दिसेल
- नंतर तुम्हाला Follow ऑप्शनवर क्लिक करावे लागेल
सध्या हे हे चॅनल फीचर फक्त iOS डिवाइसेसाठीच आहे. अँड्रॉईड युजर्सला थोडी वाट पाहावी लागणार आहे.