Ram Mandir | जेलमध्ये झाडू लावून मुस्लिम कैद्याने राम मंदिरास दान दिली पूर्ण कमाई

Ayodhya Ram Mandir | राम मंदिरात दर्शनासाठी आधी 20 ते 25 हजार भाविक येत होते. परंतु त्यात आता मोठी वाढ झाली आहे. ही संख्या आता लाखोंच्या घरात गेली आहे. दोन ते अडीच लाख रोज दर्शनासाठी येत आहे. यामुळे अयोध्या भाविकांच्या गर्दीने गजबजून गेली आहे.

Ram Mandir   | जेलमध्ये झाडू लावून मुस्लिम कैद्याने राम मंदिरास दान दिली पूर्ण कमाई
Follow us
| Updated on: Feb 29, 2024 | 3:18 PM

अयोध्या | दि. 29 फेब्रुवारी 2024 : राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होऊन आता महिन्याभरापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. 22 जानेवारी रोजी रामलल्ला विराजमान झाले आहेत. त्यानंतर मंदिरात आता लाखो भाविक दर्शनासाठी रोज येत आहेत. यामुळे राम मंदिराच्या दानभेटीत धनवर्षा सुरु आहे. ऑनलाईन पद्धतीने मंदिरासाठी मोठ्या प्रमाणावर दान येत आहेत. रामभक्त आपल्या श्रद्धेनुसार दागदागिने, भेटवस्तू, धनादेश, रोकड रक्कम पाठवत आहेत. परंतु काही देणग्या आगळीवेगळ्या ठरत आहेत. राम मंदिर ट्रस्टकडे एक वेगळ्याच प्रकारचा धनादेश आणि पत्र आले आहे. एका मुस्लिम भाविकाने हा धनादेश आणि पत्र पाठवले आहे.

कारागृहात झाडू लावला अन्…

फतेहपूर कारागृहातील कैदी जियाउल हसन याने राम मंदिरासाठी धनादेश पाठवला आहे. कारागृहात झाडू लावून मिळालेली दीड महिन्याची कमाई त्याने राम मंदिरासाठी दिली आहे. जियाउल हसन याने केलेल्या विनंतीनंतर कारागृह प्रशासनाने त्याच्या कमाईचा धनादेश राम मंदिर ट्रस्टकडे पाठवला आहे. त्यासोबत हसन याचे पत्रसुद्धा आहे. 1075 रुपयांचा हा धनादेश आहे. घनादेश प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी 17 जानेवारी रोजी लिहिला गेला आहे. आता तो राम मंदिर ट्रस्टने खात्यात जमा केला आहे. राम मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना हा धनादेश आणि पत्र पाहून सुखद आश्चर्य वाटले. तसेच भाविकाचे कौतूक वाटले.

राम मंदिरासाठी कैदी जियाउल हसन याने पाठवलेला धनादेश

आतापर्यंत किती देणगी

प्राणप्रतिष्ठान सोहळ्याच्या महिन्याभरानंतर 25 किलो सोने आणि चांदीचे दागिन्यांसह 25 कोटी रुपये दानामध्ये आले आहेत. राम मंदिर ट्रस्टचे प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी सांगितले की, 25 कोटी रुपयांचा धनादेश चेक, ड्राफ्ट आणि मंदिर ट्रस्टच्या कार्यालयात जमा झाला आहे. विदेशातून आलेल्या दानराशीचा यामध्ये समावेश नाही. कारण विदेशातून ट्रस्टच्या बँकेच्या खात्यात मोठ्या प्रमाणावर दान मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

भाविकांची संख्या वाढली

राम मंदिरात दर्शनासाठी आधी 20 ते 25 हजार भाविक येत होते. परंतु त्यात आता मोठी वाढ झाली आहे. ही संख्या आता लाखोंच्या घरात गेली आहे. दोन ते अडीच लाख रोज दर्शनासाठी येत आहे. यामुळे अयोध्या भाविकांच्या गर्दीने गजबजून गेली आहे. ठिकाठिकाणी जय श्रीरामचे नारे देताना भाविक दिसत आहेत. भाविकांची संख्या वाढल्यानंतर मंदिरात येणाऱ्या देणग्याही वाढल्या आहेत. बँक कर्मचारी दान केलेल्या पैशांची मोजणी करतात आणि दान केलेले पैसे दररोज संध्याकाळी राम मंदिर ट्रस्टच्या कार्यालयात जमा करतात. ही संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली होते.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.