छत्तीसगडमध्ये लाल संघर्ष… नक्षलवाद्यांचा हल्ला, 3 जवान शहीद; 14 जखमी

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला आहे. त्यात तीन जवान शहीद झाले आहेत. तर 14 जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना हेलिकॉप्टरने रायपूरला आणण्यात आलं आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात घेराबंदी करण्यात आली असून सर्च ऑपरेशन करण्यात आलं आहे.

छत्तीसगडमध्ये लाल संघर्ष... नक्षलवाद्यांचा हल्ला, 3 जवान शहीद; 14 जखमी
CRPFImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 30, 2024 | 8:24 PM

बिजापूर | 30 जानेवारी 2024 : छत्तीगसगडच्या बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. नक्षलवाद्यांनी जवानांवर केलेल्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले आहेत. तर 14 जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना तात्काळ रामपूरला उपचारासाठी नेण्यात आले आहे. नक्षलवाद्यांनी कोब्रा एसटीएफ-डीआरजी जवानांवर हल्ला केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यानंतर जवानांनी नक्षल्यांना शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. तीन वर्षांपूर्वी म्हणजे 2021मध्ये नक्षलवाद्यांनी याच जागेवर जवानांवर हल्ला केला होता.

सुकमा पोलिसांनी आज टेकूलगुडम येथे जवानांचे कॅम्प सुरू केले होते. या कॅम्पमधील कोब्रा, एसटीएफ आणि डीआरजीचे जवान कँम्पच्या जवळच जोनागुडा- अलीगुडा येथे सर्चिंगसाठी निघाले होते. त्याचवेळी नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यात तीन जवान शहीद झाले. यातील काही जखमी जवानांना सिलगेर कँप येथील प्राथमिक उपचार केंद्रात नेण्यात आलं. तिथे त्यांच्यावर उपचार करून रायपूरला हलविण्यात आलं. अनेक जवान गंभीर जखमी असल्याने त्यांना हेलिकॉप्टरने रायपूरला नेण्यात आलं आहे. 2021मध्ये नक्षलवाद्यांनी याच परिसरात जवानांवर हल्ला केला होता. त्यात 22 जवान शहीद झाले होते.

नक्षलवादी फरार

दरम्यान, या हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर बॅकअपसाठी सीआरपीएफने कोब्रार कमांडो आणि छत्तीसगड डीआरजीचे जवान पाठवले होते. अजूनही या भागात नक्षलवाद्यांची चकमक सुरू आहे. तर, दुसरीकडे जखमींवर उपचार सुरू आहेत. हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन या परिसराची घेराबंदीही केली आहे. तसेच सर्च ऑपरेशनही सुरू करण्यात आली आहे. माओवादींच्या फायरिंगला जशास तसे उत्तर देण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर नक्षलवादी जंगलात फरार झाल्याचं सांगितलं जात आहे.

तेव्हा 22 जवान शहीद

2021च्या एप्रिल महिन्यात छत्तीसगडच्या बीजापूर येथे नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला होता. त्यात 22 जवान शहीद झाले होते. हा हल्ला त्यावेळचा सर्वात मोठा हल्ला मानला जात होता. या हल्ल्यानंतर चौकशी केली असता स्थानिकांनीच नक्षलवाद्यांना मदत केल्याचं समोर आलं होतं. हल्ला करण्यासाठी नक्षलवाद्यांनी एलएमजी म्हणजे लाइट मशीन गन लावली होती. त्याचद्वारे हा हल्ला करण्यात आला होता.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.