पतीने पत्नीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले तरी तो बलात्कार नाही, छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
छत्तीसगड उच्च न्यायालयाने एका खटल्याची सुनावणी करताना मोठा निर्णय दिलाय. यात पतीने पत्नीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले तरी तो बलात्कार नाही, असं म्हटलंय. याचिकाकर्त्या पीडित महिलेने आपल्या पतीने इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध ठेवल्याची तक्रा करत वैवाहिक बलात्काराचा आरोप केला होता.
रायपूर : छत्तीसगड उच्च न्यायालयाने एका खटल्याची सुनावणी करताना मोठा निर्णय दिलाय. यात पतीने पत्नीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले तरी तो बलात्कार नाही, असं म्हटलंय. याचिकाकर्त्या पीडित महिलेने आपल्या पतीने इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध ठेवल्याची तक्रा करत वैवाहिक बलात्काराचा आरोप केला होता. याशिवाय लग्नानंतर सासरच्यांकडून छळ होत असल्याचाही आरोप होता. न्यायालयाने यावर सुनावणी करताना आरोपी पतीला निर्दोष मुक्त केलंय. या निर्णयानंतर देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.
न्यायालयानं नेमकं काय म्हटलं?
छत्तीसगड उच्च न्यायालयाने या खटल्याचा निकाल सुनावताना म्हटलं, “या प्रकरणात तक्रारदार महिला आरोपीची कायदेशीर पत्नी आहे. त्यामुळे आरोपीने पीडितेसोबत लैंगिक संबंध ठेवणं हा बलात्काराचा गुन्हा ठरत नाही. पतीने जबरदस्तीने इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध ठेवले तरी तो बलात्कार असू शकत नाही.”
दरम्यान, याआधी मुंबईतील सत्र न्यायालयाने देखील एका प्रकरणाची सुनावणी करताना असाच निर्णय दिला होता. त्यावेळीही निकालावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.
मुंबईतील प्रकरणात न्यायालयाचा निकाल काय?
मुंबईतील अतिरिक्त सत्र न्यायालयात दाखल एका खटल्यात न्यायाधीश संजश्री जे. घरत यांनी पतीने इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध ठेवणं कायद्यानं गुन्हा ठरु शकत नाही असं म्हटलं होतं.
या प्रकरणात पीडित महिलेचं मागील वर्षी 22 नोव्हेंबरला लग्न झालं होतं. “लग्नानंतर पती आणि सासरचे लोक पीडितेवर बंधनं टाकायला लागली. याशिवाय शेरेबाजी, घालून पाडून बोलणं आणि इतर प्रकारे शोषण करत होते. इतकंच नाही तर पैशांचीही मागणी करण्यात आली,” असा आरोप पीडितेने केला. तसेच लग्नानंतर महिनाभरातच पीडित महिलेने पती जबरदस्ती इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध ठेवत असल्याची तक्रार केली.
महाबळेश्वरमध्ये पतीने जबरदस्ती लैंगिक संबंध ठेवल्यानंतर पीडितेला अर्धांगवायूचा झटका
हे जोडपं 2 जानेवारी महाबळेश्वर येते फिरायला गेलं. तेथे पतीने पीडित पत्नीच्या इच्छे विरुद्ध लैंगिक संबंध ठेवले. यानंतर पीडित महिलेला डॉक्टरांकडे जावं लागलं. तपासणीत पीडितेला लैंगिक संबंधा दरम्यान कंबरेखाली अर्धांगवायूचा झटका आल्याचं स्पष्ट झालं होतं. यानंतर पीडित महिलेने मुंबईत पती आणि सासरच्या लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणी पतीने अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली. यावरच न्यायालयाने हा वादग्रस्त निर्णय सुनावला.
हेही वाचा :
मुली रात्रभर बीचवर फिरतात, त्याची जबाबदारी सरकार आणि पोलिसांवर टाकू शकत नाही : गोवा मुख्यमंत्री
‘बलात्कारासाठी भारतीय संस्कृती जबाबदार’, इम्रान खान बरळले, वक्तव्याविरोधात पाकिस्तानमध्येही तीव्र प्रतिक्रिया
‘रिक्षाचालकाचा बनाव, पोलिसांकडून चालढकल’, रायगडमध्ये आदिवासी महिलेचा बलात्कार आणि खून
व्हिडीओ पाहा :
Chhattisgarh High court decision on marital rape by husband