प्रेमात अडचण ठरल्याने तीन वर्षीय मुलीचा मातेने केला खून, असा उघड झाला प्रकार
सोमवारी आणि मंगळवारी मध्यरात्री सुनिताने तिची तीन वर्षीय मुलगी किरणचा गळा दाबून खून केला आणि सनीच्या मदतीने तिचा मृतदेह बेडशीटमध्ये गुंडाळून श्रीगंगानगर रेल्वे स्थानकावर गेला.
श्रीगंगानगर : राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यात नात्याला लाजवणारी घटना समोर आली आहे. आईनेच आपल्या तीन वर्षांच्या मुलीची हत्या करून मृतदेह चालत्या रेल्वेमधून फेकला. याप्रकरणी विवाहित महिला आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडीत पाठवले आहे. सुनीता आणि सनी अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांना १७ जानेवारी रोजी हिंदूमलकोट परिसरात रेल्वे स्टेशनजवळ मुलीचा मृतदेह सापडला. पोलिसांना तिची हत्या झाल्याचा संशय आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी आणि मंगळवारी मध्यरात्री सुनिताने तिची तीन वर्षीय मुलगी किरणचा गळा दाबून खून केला आणि सनीच्या मदतीने तिचा मृतदेह बेडशीटमध्ये गुंडाळून श्रीगंगानगर रेल्वे स्थानकावर गेला.सुनिता व सनी सकाळी ६.१० वाजता रेल्वेमध्ये चढले. रेल्वे फतुही रेल्वे स्टेशनच्या आधी कालव्यावरील पुलावर पोहोचली तेव्हा त्यांनी चालत्या ट्रेनमधून मृतदेह खाली टाकला. त्यांनी मृतदेह कालव्यात फेकून द्यायचा होता, मात्र तो रेल्वे रुळाजवळ पडला. १८ जानेवारी रोजी मुलीचा मृतदेह सापडला.
सुनिताला पाच मुले
सुनिता यांना पाच मुले आहेत. ती सनी आणि तिच्या दोन मुलींसोबत राहते, तर तीन मुले त्यांच्या पतीसोबत राहतात. मुलीची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले. त्यानंतर सुनीताचा शोध घेतला आणि तिला चौकशीसाठी बोलावले. चौकशीत त्याने आपल्या मुलीची हत्या केल्याची कबुली दिली, त्यानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.