गलवान खोऱ्यात चार सैनिक मारले गेले, चीनने वर्षभरानंतर दिली कबुली

लडाखच्या गलवान खोऱ्यात गेल्या वर्षी जूनमध्ये चीन आणि भारतीय जवानांमध्ये हाणामारी झाली होती. त्यात चीनचे सैनिकही मारले गेले होते. (China Admits Casualties In Galwan Valley Clash; Details Of 4 PLA Soldiers Killed Disclosed)

गलवान खोऱ्यात चार सैनिक मारले गेले, चीनने वर्षभरानंतर दिली कबुली
Follow us
| Updated on: Feb 19, 2021 | 8:57 AM

नवी दिल्ली: लडाखच्या गलवान खोऱ्यात गेल्या वर्षी जूनमध्ये चीन आणि भारतीय जवानांमध्ये हाणामारी झाली होती. त्यात चीनचे सैनिकही मारले गेले होते. पण चीनने या वृत्ताला दुजोरा दिला नव्हता. मात्र, आता वर्षभरानंतर चीनने त्यावर मौन सोडलं आहे. चीनने या हाणामारीत त्यांचे चार सैनिक मारले गेल्याचं स्पष्ट केलं आहे. ग्लोबल टाइम्स या सरकारी वृत्तपत्रातून चीनने ही माहिती दिली आहे. पीपुल्स लिबरेशन आर्मीच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे. तसचे सीमेवरील तणावाला भारतच जबाबदार असल्याचं तर्कटही चीनने मांडलं आहे. (China Admits Casualties In Galwan Valley Clash; Details Of 4 PLA Soldiers Killed Disclosed)

चीनबरोबर झालेल्या हाणामारीत 20 भारतीय जवान शहीद झाले होते. अमेरिकेच्या एका गुप्त अहवालात या हाणामारीत चीनचे 40 सैनिक मारले गेल्याचं म्हटलं होतं. मात्र, नऊ महिन्यानंतर चीनने या हल्ल्यात केवळ चारच जण मारले गेल्याचं म्हटलं आहे. भारतीय जवान नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी हा हल्ला झाल्याचा दावा चीनने केला आहे. तसेच भारताने नियंत्रण रेषेवर भारतीय जवानांची कुमक वाढवल्याचा दावा करतानाच चीनच्या सैनिकांचं या वृत्तात गुणगान करण्यात आलं आहे.

45 वर्षात पहिल्यांदाच सीमेवर संघर्ष

मेच्या सुरुवातीलाच चीनच्या सैनिकांनी नियंत्रण रेषेवर जमावजमव सुरू केली होती. त्यामुळे भारतीय जवान सतर्क झाले होते. चीनच्या या आक्रमक पावित्र्यामुळे दोन्ही देशाच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्याचा परिणाम म्हणजे 15 जूनच्या मध्यरात्री दोन्ही सैनिकांमध्ये धुमश्चक्री उडाली. गलवान खोऱ्यातीही ही धुमश्चक्री म्हणजे गेल्या 45 वर्षातील दोन्ही देशांमधील अत्यंत भयंकर संघर्ष होता. या हाणामारीत 20 भारतीय जवान शहीद झाले होते. तर चीनचे सैनिकही मोठ्या प्रमाणावर मारले गेले होते. मात्र, चीनने त्याला पृष्टी दिली नव्हती.

चीनची माघार

दरम्यान, आता दोन्ही देशांमधील तणाव निवळत आहे. दोन्ही देशांनी नियंत्रण रेषेवर तैनात केलेले सैनिक माघारी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून सुरू असलेला तणाव कमी होताना दिसत आहे. असं असलं तरी भारताने चीनच्या प्रत्येक कृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. भआरताने मंगळवारी काही छोटे छोटे व्हिडिओ जारी केले आहेत. त्यात पूर्व लडाखमध्ये पेगाँगसोच्या आसपासच्या ठिकाणांहून चीनने त्यांचे सैनिक कमी केल्याचं दिसून येत आहे. तसेच या परिसरातील बंकर, तळ आणि इतर सुविधाही चीनने नष्ट केल्याचं दिसून येत आहे. तसेच हा परिसर समतल करण्यासाठी चीनच्या पीपुल्स लिबरेशन आर्मीने बुलडोझर फिरवल्याचंही दिसून येत आहे. तसेच वाहने आणि इतर उपकरणेही चीन मागे घेताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात बुधवारपासून चीनने त्यांचे सैनिक मागे घेण्यास सुरुवात केली होती. (China Admits Casualties In Galwan Valley Clash; Details Of 4 PLA Soldiers Killed Disclosed)

संबंधित बातम्या:

6 लग्न आणि 30 मुलं, शेवटची राणी घाबरुन लंडनला पळाली, पोटच्या पोरीला कैद करणाऱ्या दुबईच्या राजाची क्रूर कहाणी

ना सैन्य कारवाई, ना गोळीबार, अफगाणिस्तानमध्ये अजब पद्धतीने 30 तालिबानी दहशतवाद्यांचा मृत्यू, कारण काय?

नेपाळ सरकारचं नव फर्मान काय? महिला का उतरल्या रस्त्यावर?

(China Admits Casualties In Galwan Valley Clash; Details Of 4 PLA Soldiers Killed Disclosed)

अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.